फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजईव्हीएम हा फेसिझमचा पर्याय बनला आहे: ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन संघटनेचा आरोप

ईव्हीएम हा फेसिझमचा पर्याय बनला आहे: ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन संघटनेचा आरोप

Advertisements

नागपूर: सध्या देशात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. निवडणूकीला उभे राहायचे कि नाही हा यक्ष् प्रश्‍न उमेदवारांसमोर पडला आहे. लोकांचा विश्‍वासच या ईव्हीएम प्रणालीवरुन पार उडाला असून हा आता तांत्रिक प्रश्‍न राहीला नसून राजकीय प्रश्‍न झाला आहे. निवडणूका मनमानेल त्या प्रमाणे जिंकण्याचे ईव्हीएम हे एक हत्यार, एक मार्ग बनला आहे, ईव्हीएम हा आता फेसिझमचाच पर्याय बनला असल्याचा आरोप ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन संघटनेतर्फे करण्यात आला. सोमवार दि.२६ ऑगस्ट रोजी प्रेस क्लब येथे आयोजित पत्र-परिषदेत ते बोलत होते.राजसत्ता व औद्योगिक जगत एकत्र आले की फेसिझम येतो,प्रशासकीय व्यवस्था दुबळी बनते. निवडणूक आयोगाचेही तेच झाले आहे,असे ते म्हणाले.
ईव्हीएम विरोधातीत जनआंदोेलनात देशातील अनेक राजकीय पक्ष्,संघटना व नागरिक सहभागी झाले असल्याचे संघटनेचे फिरोज मिटीबोरवाला यांनी सांगितले.यात राष्ट्रवादीपासून तर आंबेडकरी चळवळीतील नेत्यांचा समावेश आहे.मुंबईहून ही चळवळ सुरु झाली. गेल्या पाच दिवसात आता ही चळवळ प्रत्येक जिल्ह्यात पोहोचली असल्याचे ते म्हणाले.९ दिवसांच्या यात्रेत ३६ जिल्ह्यांपैकी ३१ जिल्ह्यात ही यात्रा पोहोचली असल्याचे ते म्हणाले. ‘ईव्हीएम नको पुन्हा बॅलेट हवे’ही या चळवळीची ब्रिद घोषणा आहे. हे देशव्यापी आंदोलन आहे. महाराष्ट्रात या आंदोलनाची धार आणखी तीव्र करणार कारण विधान सभेच्या निवडणूका जवळ येऊन ठेपल्या आहेत.२०१३ च्या ऑक्टोबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयानेच ईव्हीएम विरोधात निरीक्ष् ण नोंदवले होते. २०१४ च्या निवडणूकीत निवडणूक आयोगाची ही जबाबदारी होती मात्र हा आयोग निष्क्रीय राहीला. २०१७ च्या निवडणूकीत ५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले मात्र प्रत्यक्ष्ात ईव्हीएममधील मतांची संख्या ही जास्त निघाली.
२००९ सालीच हैदराबाद येथील सुप्रसिद्ध तंत्रज्ञ हरिप्रसाद यांनी साध्या मोबाईलने देखील ईव्हीएम कसा हॅक होतो याचे प्रात्याक्ष्कि दाखवले होते.ईव्हीएम मशीन त्यांच्याकडे तपासणीसाठी आली होती तेव्हा त्यांना हे तंत्र कळले. नुकतेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत ३७३ मतदार संघात मतांच्या संख्येत लक्ष् णीय अंतर आढळून आले तरी देखील जनता किंवा राजकीय पक्ष् रस्त्यावर उतरले नाही असे ते म्हणाले.२० लाख ईव्हीएम मशीनच गायब झाले हे निवडणूक आयोगाच्याच बेवसाईटवर होते मात्र नंतर ती माहिती गायब झाली. सगळेच ईव्हीएम व्हीव्हीपॅटशी जोडण्यात आले मात्र निवडणूक आयोग याचाही डेटा देण्यास नकार देत असल्याचे ते म्हणाले. मनोरंजन रॉय यांनी या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली आहे.ललित कुमार यांनी या विषयावर पत्र परिषद घेतली तर हैदराबाद येथील राहूल चिमणभाई यांनी यावर संशोधन करुन आरटीआयच्या माध्यमातून माहिती मागितली व हा सर्व गौडबंगाल उघडकीस आणला. पत्र परिषदेला जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलचे शब्बीर विद्रोही,हिंगणघाटचे माजी आमदार राजू किमांडे, विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष् अनिल जवादे,ज्योती बडेकर तसेच आंबेडकरी चळवळीतील नेते उपस्थित होते.

निवडणूक आयोगाचा ‘हकाॅथॉन’नुसतं एक मजाक-
निवडणूक आयोगाने हकॉथॉन अंतर्गत ईव्हीएम मशीन्स तपासणीचे आव्हान सर्व राजकीय पक्ष्ांना केले होते मात्र मशीन उघडण्याची किवा त्यातील हार्ड डिस्क, सॉफ्ट डिस्क तपासण्याची परवानगी दिली नाही. मशीन्सला हात का लाऊ देत नाही हा प्रश्‍नही विचारु शकत नाही, ना डेटा देतील ना प्रश्‍न विचारु देतील त्यामुळे हकॉथॉन हे फक्त एक मजाक बनून राहीले किंबहूना ईव्हीएम आता केवळ एक ‘अंधश्रद्धा’ बनून गेली असल्याचे ते म्हणाले. सध्या १४ लाख तंत्रज्ञ हे फक्त हॅगिंकसाठीच उपलब्ध आहेत असा आरोपही त्यांनी केला. ऑक्टोबर २०१८ मध्ये एका वाहीनीच्या शो मध्ये केंद्रिय मंत्री पियुष गाेयल यांनी भाजपला २९७ ते ३०३ जागा मिळणार असल्याचे भाकीत केले होते. हे भाकीत त्यांनी कोणत्या आधारावर केले होते?असा प्रश्‍न त्यांनी विचारला.पेन ड्राईव्हने ईव्हीएम मशीन्समधील डेटा बदलत येतो,हे काम ही खाजगी तंत्रज्ञांना देण्यात आले ज्यांना ते काय काम करतात आहे,याची माहितीच नव्हती. मानवाधिकार कार्यकर्ते व्यंकटेश यांनी ओटीपी (वन टाईम प्रोगाम) विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. हा राष्ट्रीय सुरक्ष्ेचा प्रश्‍न बनला आहे.एएक्सपी कंपनीला हे कंत्राट देण्यात आले ज्यात सीआयएचाच सभासद असल्याचा आरोप त्यांनी केला.देशाच्या इतिहासात २०१८ एवढी सर्वाधिक फ्रॉड निवडणूक आजपर्यंत झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. तमिळनाडूचे देवाशंकर यांनी यावर भाष्य करताना ‘मनी,मिडीया व ईव्हीएम’द्वारे जिंकण्यात आलेली निवडणूक असे म्हटले,अशी माहिती फिरोज यांनी दिली. जर्मनीत जी निवडणूक यंत्रणा ही जनतेला कळत नाही ती असंवैधानिक असल्याचे मानले गेले,असे उदाहरण त्यांनी दिले.

अशिक्ष्ति जनतेलाही माहिती आहे‘कूछ तो गडबड है’
नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईव्हीएम विरोधात बोलणारे यांची कीव येत असल्याचे वक्तव्य केले.
मात्र त्यांना कळायला हवे देशातील अशिक्ष्ति जनतेलाही हे माहिती आहे ‘ईव्हीएम में कुछ तो गडबड है’ महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात इतका राग आहे की एक दिवस ते ईव्हीएम मशीनच तोडून टाकतील,असे विधान संघटनेचे रवि विराणे यांनी केले. आम्ही हरायला तयार आहोत मात्र ईव्हीएमने नाही असे ते म्हणाले. अमेठीत राहूल गांधी दीड लाख मतांनी हरतात तर केरळमध्ये ते आठ लाख मतांनी जिंकतात हे कसे घडते?असा प्रश्‍न विचारता हे सर्व ‘सिलेक्टीव्ह टेंपरिंग’असल्याचे ते म्हणाले. आधीच ठराविक ठिकाणी हे टेंपरिंग करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. बॅलेट पेपरमध्ये ही अवैध मतदानाचे प्रकार होत नाही का?या प्रश्‍नावर, चोरी होते मात्र ती कमी प्रमाणात होते,ईव्हीएम प्रणालीत तर पूर्णच चोरी होत असल्याचे ते म्हणाले, मूळात निवडणूका होण्याअाधी चार वर्षे आठ महिने जिल्हाधिकार्यांच्या स्ट्रांग रुममध्ये या मशीन्स ठेवल्या जातात यावेळी ईव्हीएम मशीन्सला कोणती सुरक्ष्ा पुरविली जात नसल्याकडे त्यांनी लक्ष् वेधले.१४ सप्टेंबर रोजी देशभरात ईव्हीएम विरोधात मोठा उठाव करणार असल्याचे ते म्हणाले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या