फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजपूनम मॉल'चे छत कोसळण्यामागे महा मेट्रोचा काहीही संबंध नाही, व्हीएनआयटी'ने केले स्पष्ट

पूनम मॉल’चे छत कोसळण्यामागे महा मेट्रोचा काहीही संबंध नाही, व्हीएनआयटी’ने केले स्पष्ट

Advertisements

नागपूर १८: वर्धमान नगर येथे नागपूर मेट्रो प्रकल्पाचे कार्य सुरु नेहमीप्रमाणे सुरु होते. दरम्यान शुक्रवार, दिनांक १६ ऑगस्ट रोजी याठिकाणी पूनम मॉलची छत अचानक कोसळ्याचे समोर आले असून नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या कार्यामुळे सदर घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेशी महा मेट्रोचा काही संबंध नसल्याचे महा मेट्रोने नेमलेल्या विश्वेशराया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(व्हीएनआयटी)च्या तपासणीतून स्पष्ठ झाले आहे.

या संपूर्ण घटनेत वेबसाईट वरील माहिती घटनेसंबंधी छायाचित्रे इत्यादी बाबींची सखोल चौकशी करून या घटनेत महा मेट्रोचा काहीही संबंध नसल्याचे व्हीएनआयटी’ने स्पष्ट केलेआहे. मेट्रो प्रकल्पाच्या कार्यामुळे पूनम मॉलच्या इमारतीवर परिणाम होऊ शकत नाही कारण मेट्रो प्रकल्पाचे कार्य पूनम मॉलपासून लांब अंतरावर होत आहे. प्रकल्पात अंतर्गत निर्माण कार्याच्या कंपनामुळे(वायब्रेशन) सुद्धा याला इजा झालेली नसल्याचे व्हीएनआयटी’ने स्पष्ठ केले आहे.

मेट्रो स्थानकाच्या या पूर्वीच्या बांधकामाबाबत कोणतीही तक्रार आजवर पूनम मॉलकडून महा मेट्रोला प्राप्त झालेली नाही. तसेच प्रकल्पाच्या निर्माण कार्यापासून मॉलपेक्षा ही जवळ असलेल्या अन्य इमारतींकडून व निवासी बहु-मजली अपार्टमेंट यांच्याकडून सुद्धा कोणतीही तक्रार झालेली नाही. यामुळे हे सहज स्पष्ट होते की या घटनेशी महा मेट्रोचा काहीही संबंध नाही.

पूनम मॉल’ची इमारत जीर्ण स्थितीत असून ती मुख्य रस्त्यावर आहे आणि इमारतीच्या मागच्या बाजूला असलेली भिंतला भेगा असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या संपूर्ण घटनेनंतर स्वतःची चूक लपविण्यासाठी महा मेट्रोला दोषी ठरविण्याचे प्रयत्न होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

याठिकाणी गेल्या काही दिवसात महा मेट्रोकडून कोणतेही उत्खनन किंवा अवजड यंत्रसामग्री हालचालीची प्रक्रिया करण्यात आलेली नाही. जवळपासच्या कोणत्याही इमारतींना त्रास होणार नाही, यासाठी महा मेट्रोने नेहमीच काळजीपूर्वक बांधकाम उपक्रम राबविले आहे, भविष्यात ही राबविण्यात येणार आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या