


-प्रशांत पवार यांचे आवाहन
ईव्हीएम विरोधात आठ संघटना करणार ९ ऑगस्ट रोजी ‘ईव्हीएम हटाओ-देश बचाओ’ आंदोलन
नागपूर,६ ऑगस्ट २०१९:: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय धाडसी निर्णय घेऊन काश्मीर संबंधित ३७० कलम हटवले त्याचप्रमाणे त्यांनी आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेऊन देशातून ईव्हीएम निवडणूक प्रणाली हटवून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणूका घेण्याचा ऐतिहासिक व धाडसी निर्णय घेण्याचे आवाहन जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी सोमवारी पत्र-परिषदेत केला.
पुढे बोलताना ते म्हणाले,की देशांच्या नागरिकांच्या मनात मतदानाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांचे मत नेमके कोणाला जातंय हे जाणून घेण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. त्यांच्या मतदानाचा हक्कच ईव्हीएम प्रणालीमुळे हिरावल्या जात असल्याची भावना जनतेची झाली असून फक्त महाराष्ट्रातील विधान सभेच्या निवडणूकीतच नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी निवडणूका होतील तिथे ‘जय जवान जय किसान’ ही संघटना देशातील इतर राजकीय पक्ष् तसेच संघटनांसोबत मिळून आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर पहीले आंदोलन काँग्रसे, राष्ट्रवादी काँग्रेस,बामसेफ,भिम पँथर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,समता सैनिक दल, वंचित आघाडी इ. संघटनेसोबत मिळून येत्या ९ ऑगस्टच्या क्रांती दिनी संविधान चौकात दुपारी १ वा. करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दिवशी फक्त संविधान चौकातच नव्हे तर मुंबई,हरियाणा इ. ठिकाणी देखील ईव्हीएम विरोधात जन आंदालन करणार असल्याचे ते म्हणाले. विरोधाची ही प्रक्रिया आता बॅलेट पेपर लागू झाल्याशिवाय थांबणार नाही असे ते म्हणाले.
हे आंदोलन या पुढे निरंतर चालणार आहे. आमच्या आंदोलनाला यश मिळायला वीस वर्षांचा कालावधी लागला तरी निवडणूक आयोग जोपर्यंत ईव्हीएम देशातून घालवत नाही, आम्ही आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाले. युवा मतदारांनी देखील देशातील लोकशाही वाचवण्यासाठी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. ९ ऑगस्ट रोजी संविधान चौकातून निघणारी विशाल रॅली ही उपजिल्हाधिकारी यांच्या कक्ष्ापर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर ही दोन विरोधी वैचारिक भूमिका घेणारे विचारधारेची जननी असल्याचे याप्रसंगी तक्ष् शिला वाघधरे यांनी सांगितले. नागपूर हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा बालेकिल्ला होता. ज्यांनी या देशालाच संविधान दिले त्यांच्याच बालेक्ल्यिातून आंदोलनाला सुरवात करणार असल्याचे त्या म्हणाल्या. सर्वसामान्य मतदाराच्या मनात ईव्हीएमविषयी आता विश्वास उरला नाही.
व्हीव्हीपॅटमध्ये त्यांचे मत कोणाला पडले हे दिसत असले तरी ती मतेच मोजण्यात आली नसल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. ही बाब संवैधानिक लोकशाहीला अतिशय घातक असल्याचे त्या म्हणाल्या. ईव्हीएम हटवून बॅलेट पेपर आणण्यासाठी ९ ता.ला जन आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगामध्ये क्रांती ही जन आंदोलनातून घडल्या असे त्या म्हणाल्या.
ॲड.स्मिता कांबळे यांनी देखील आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली. सध्यास्थितीत भारतामध्ये अघोषित आणिबाणिची परिस्थिती लागू असल्याचे त्यांनी सांगितले. देशात अराजकता माजली असून त्यात ईव्हीएम नावाचे मतदान यंत्र लोकशाहीला मारक ठरत आहे.सामान्य जनतेची मतदान प्रक्रियेवरची विश्वाशहर्ता संपली आहे. याच संदर्भात रविभवन येथे रविवार दि.४ ऑगस्ट रोजी बैठक पार पडली.बैठकीत अनेक सामाजिक,राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक संघटनांनी सहभाग नोंदवला. बैठकीत सर्वानुमते ईव्हीएम हटवून पुन्हा बॅलेट पेपर वर भारतातील निवडणूका घ्यावा असा ठराव करण्यात आला. संपूर्ण भारतात हे जन आंदोलन पोहोचवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रविवारी पार पडलेल्या बैठकीत काँग्रेसतर्फे नरेंद्र जिचकार, ॲड.नंदा पराते,नितीन कुंभलकर,तक्ष् शिला वाघधरे, जय जवान जय किसानतर्फे प्रशांत पवार, राष्ट्रवादीतर्फे जावेद हबीब, महेंद्र भांगे, बामसेफतर्फे वाहने, भिम पँथरतर्फे मडके,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे घनश्याम फुसे,संजय पाटील, समता सैनिक दलातर्फे राजेश लांजेवार, आनंद तेलंग, सुनिल जवादे, अानंद पिल्लेवान, अनिल भांगे,राजरतन कुंभारे,निलेश बागडे, निखिल कांबळे, प्रफुल मेश्राम,प्रज्वल बागडे,सुखदार बागडे,प्रदीप गणवीर, वंचित आघाडीतर्फे रोशन बेहरे, विशाल गोंडाणे आदी उपस्थित होते.




आमचे चॅनल subscribe करा
