



सिम्बॉयसिस संस्थेचा लोकापर्ण सोहळा
नागपूर,२८ जुलै २०१९: आमच्या नागपूरमध्ये पुलापलीकडील व अलीकडील असा भेद मानला जात होता.पश्चिम नागपूरच्या तुलनेत पूर्व नागपूरात कोणतेही प्रकल्प नव्हते त्यामुळे सतत ओरड होत होती मात्र नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांच्या जिद्दीने नागपूरने आज जागतिक पातळीवर नावलौकीक मिळावले असे आतंरराष्ट्रीय दर्जाचे सिम्बॉयसिस संस्था पूर्व नागपूरमध्ये उभारली,यासाठी खूप मेहनत घेतली, मात्र झालेल्या करारामध्ये एक चूक ही राहून गेली.या संस्थेत फक्त नागपूरच्या विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के राखीव जागा ठेवण्यात आला त्या पूर्ण विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात यावी अशी विनंती मी संस्थेचे संस्थापक मुजुमदार यांना करतो अशी विनंती केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
सिम्बॉयसिस या जागतिक कीर्तीच्या संस्थेेचा लोकापर्ण सोहळा रविवारी दूपारी वाठोडा येथे पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर वावणकुळे, आ.कृष्णा खोपडे, महापौर नंदा जिचकार, संस्थेचे संस्थापक एस.बी. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर,माजी खासदार विजय दर्डा आदी उपस्थित होते. पुढे बोलताना गडकरी म्हणाले,की सिम्बॉयसिसमुळे विदर्भातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्ष् णाची उत्तम सोय झाली, पूर्व नागपूरात १२० एकर जागेवर असेच जागतीक किर्तीचे ‘स्पोट्स साई काँम्पलेक्स’ बांधण्यात येणार असून यासाठी पालकमंत्री बावणकुळे यांनी मुख्यमंत्री यांच्या आदेशाने ५० कोटी मंजूर केले. सिम्बॉयसिकचे संस्थापक मुजुमदार यांच्या मी खूप मागे लागलो होतो,नागपूरची मुले शिक्ष् णासाठी पुण्यात येतात त्यांना नागपूरातच विद्येची सोय उपलब्ध करुन द्या, त्यांनी ती विनंती मान्य केली,आज ते स्वप्न साकार झाले. जागेचा प्रश्न ही महापालिकेच्या सहकार्याने आम्ही सोडवला. संस्थेसाठी ७२ एकर जागा आम्ही ३० वर्षांसाठी फक्त १ रु.लीज वर दिली.या मोबदल्यात स्थानिकांना २५ टक्के राखीव जागा तसेच शुल्कामध्ये १५ टक्के सवलतीची अट घातली. मात्र या भव्य कॅम्पसचा उपयोग नागपूरच नव्हे तर विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी देखील व्हावा अशी आमची ईच्छा आहे. यासाठी जास्तीचे वर्ग वाढवावे लागले तरी तशी तडजोड करण्याची सूचनाही गडकरी यांनी केली. नागपूर हे शैक्ष् णिक हब व्हावे हेच आमचे स्वप्न आहे.आजचा लोकार्पण सोहळा हा त्या स्वप्नातील मानाचा तुरा असल्याचे ते म्हणाले. केंद्राच्या २० कोटींच्या अनुदानातून या ठिकाणी सिमेंट रोड बनत आहेत.५ मिनिटांच्या अंतरावर मेट्रो स्टेशनची सुविधा असणार आहे. वनमंत्री मुनगंटीवार यांना विनंती करतो त्यांनी महाराष्ट्रात ३३ कोटी वृक्ष् लागवडची जी मोहिम सुरु केली त्यातील एक लाख झाडे तरी या परिसरात लावण्याची जबाबदारी घेऊन हा परिसर हिरवागार व आल्हादायी करावा. मिहानमध्ये पाच वर्षात ५० हजार तरुणांना रोजगार देण्याचे वचन आम्ही दिले होते,२६ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. एससीएल कंपनीने जागा परत केली होती ती पुन्हा घेतली. लवकरच या कपंनीत देखील १० हजार तरुणांना रोजगार मिळेल. इन्फोसिस, महेन्द्रा, आयसीएस, एव्हिऐशन मॅनिफिओल हब, एअर बस, रोसल्ट अंतर्गत येणारे राफेल विमानाचे सुटे भाग बनवणारी कंपनी इ.मध्येही लवकरच रोजगारांच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार असून, शैक्ष् णिक क्ष्ेत्रात इतर देशातील विद्यापीठांनी देखील येण्यास तयार असतील तर भारत सरकर त्यासाठी मदत करेल. एवढेच नव्हे तर वैद्यकीय क्ष्ेत्रात देखील दहा मेडीकल डिव्हायसेस मेनिफेक्चरींग हब तयार झाले पाहीजे असे ते म्हणाले. एम्स सुरु झाले असून वैद्यकीय क्ष्ेत्रख एविअेशन, लॉजिस्टिक, जीएसटीमध्ये नागपूर हे कॅपिटल झाले आहे. सिम्बॉयसिसच्या या संस्थेसाठी नागपूर आणि विदर्भाच्यावतीने मी संस्थेचे आभार मानतो, विदेशी विद्यार्थ्यांच्या आजच्या उपस्थितीमुळे नागपूर हे जागतिक नकाशात झळकले याचाही विशेष आनंद झाला असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
प्रास्ताविकेत डॉ. विद्या येरवडेकर यांनी पुणे हे शहर विद्येचे माहेरघर समजले जाते मात्र नागपूरातील सिम्बॉयसिसची ही संस्था पूर्वेतील ऑक्सफोर्ड’ठरणार असल्याचे त्या म्हणाल्या. आहे त्यापेक्ष्ा ही संस्था आणखी दर्जेदार करण्याचे अभिवचन त्यांनी दिली. डॉ.मुजुमदार यांनी जमिनीलाही नशीब असतं,पंढरपूरच्या जमिनीवर विठ्ठलाचे मंदिर उभारले गेले. नागपूरच्या या जमिनीवर विद्येचे मंदिर उभारल्या गेल्याचा विशेष आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.पुण्यातील ३० परदेशी विद्यार्थ्यांना मुद्दामून विद्येेचे हे मंदिर बघण्यासाठी सोबत आणले. पुण्यात ८५ राष्ट्राचे विद्यार्थी शिकतात आहे नागपूरात १०० राष्ट्रांचे विद्यार्थी येतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विनोबा भावे यांची ‘जय जगत’ ही संकल्पना खर्या अर्थाने नागपूरात साकारली गेली. या विद्यापीठाच्या परिसरातून बाहेर पडलेल्या प्रत्येक विद्यार्थी या संस्थेतून ‘वसुधैव कुटुंबकम’ हे संस्कार घेऊन बाहेर पडेल अशी ग्वाही त्यांनी दिली. सूत्र संचालन डॉ.आळतेकर यांनी केले. आभार डॉ.रजनी गुप्ते यांनी मानले.

प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सिम्बॉयसिस हे स्वप्नवत विद्यापीठ-मुख्यमंत्री
आजचा दिवस हा ऐतिहासिक असून जे रोपटं २०१७ साली लावले त्याचे आज विशाल वटवृक्ष्ामध्ये रुपांतर झाले याचा अत्यधिक आनंद आहे. डॉ. मुजुमदार म्हणाले तसे नागपूरला ही संस्था सुरु झाल्यामुळे त्यांची स्वप्नंपूर्ती झाली नसून हे आमचे स्वप्नं होते जे तुम्ही पूर्ण केले त्यासाठी त्यांचे आभार. नागपूरला दूरदृष्टि लाभलेला नेता मिळाला आहे हे नागपूरचे भाग्य. हे स्वप्नं पूर्ण होतंय याचे कारण म्हणजे गडकरी हेच आहेत.विद्युत वेगाने विस्मयचकीत करणारे हे भव्य कॅम्पस बघितल्यावर याचे श्रेय बांधकाम करणारी चमू यांनाही द्यावी लागते. येथे आल्यावर ही संस्था प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ड्रीम विद्यापीठ वाटू लागते. ज्यांना येथे प्रवेश मिळाला ते खरेच नशीबवान आहेत. निवडणूका झाल्यानंतर लॉ च्या शाखेत मलाही फक्त एकदा व्याख्यान देण्याची संधी मिळावी,अशी ईच्छा जागृत झाली असून माझेही हे स्वप्नं पूर्ण करावे अशी विनंती मी संस्थेच्या संचालकांना करतो असे फडणवीस म्हणाले.
विदर्भाचा विकास कसा झाला पाहिजे हे मी आणि गडकरी यांनी पहील्याच दिवशी ठरवले.जगाच्या इतिहासात चांगली विद्यापीठे तयार झाली त्यानंतर तिथे उद्योग आले.यानंतर त्या देशांची प्रगती झाली. पुण्यातही हेच घडले. आता विदर्भातही हेच घडत असल्याचे ते म्हणाले.आम्हाला ‘एक्सपान्शन‘नव्हे ‘एक्सीलेंस’हवे,सिम्बॉयसिस देखील याच गुण वैष्ठिात मोडते.आमचं स्वप्न नवे एव्हीअेशन हब तयार करण्याचे आहे.भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टि मुजुमदार यांच्यात आहे,विदर्भातही ते ही नीती पुढे नेतील अशी आशा आहे यासाठी नागपूरकर नागरिक आणि महाराष्ट्र सरकार आपल्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. या संस्थेमुळे जगात राज्याचा दर्जा वाढला असेही ते म्हणाले.

क्ष् ण चित्रे-
-गडकरी यांनी नागपूरात पुण्यासारखं आखीव-रेखीव
बांधकाम नं करता सगळ कसं भव्य आणि मोठं निर्माण करा,एवढी मोठी जागा दिली आहे, अशी सूचना केली होती,अशी ंआठवण डॉ. दीप्ती येरवडेकर यांनी आपल्या भाषणात सांगितली
– पिनाक देशपांडे या एमबीए प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने कार्यक्रमाच्या सुरवातीला अप्रतिम धून बासरीवर सादर करुन विद्यार्थ्यांची दाद मिळवली
– मंचावर उपस्थित गडकरी व मुख्यमंत्री यांचे स्वागत टीडीया,मनाली, मोझेम्बिक, नेपाल, नायजेरीया, सुमालिया, साऊथ कोरीया,साऊथ सुदाम, श्रीलंका, सिरीया,तर्जनीया, थायलंड, झांबिया, युगांडा, येमेन, झिम्बावीया, इथियोपिया,अफगानिस्तान, बांग्लादेश इ. देशातून आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या देशाचे राष्ट्रध्वज देऊन केले..
-विक्रमी कालखंडात भव्य वास्तू उभारणारे आर्किटेक्चर हफीज कॉन्ट्रेक्टर, नितीन न्याती,केएमवी प्रसाद यांच्यासोबतच असंख्य हात कामगारांचे राबले त्या कामगारांचे प्रतिनिधी म्हणून मंगलसिंग व कविता हलवे यांचे स्वागत मुख्यमंत्री यांनी केले
– भव्य एलईडीवर सिम्बॉयसिसच्या स्थापनेपासून तर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या संस्थेने घेतलेली भरारी यांचा माहितीपट दाववण्यात आला
-अस्सल पुणेकर असल्यामुळे मुजुमदार यांनी त्यांच्या भाषणानंतर मंचावर उपस्थित उर्जा मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना वीज बिलामध्ये सुविधा देण्याची विनंती ही करुन टाकली अशी चर्चा सभागृहात लगेच रंगली
– सिम्बॉयसिसच्या परिसरात एक लाख झाडे हे प्राध्यापक व विद्यार्थ्यांकरवी लावण्यात येणार असल्याची ग्वाही मुजुमदार यांनी दिली
– कार्यक्रमाची सांगता परदेशी विद्यार्थ्यांनी गायलेल्या भारताच्या राष्ट्रगीताने झाली हे विशेष!
-गडकरी,मुख्यमंत्री यांचे स्वागत मुजुमदार यांनी खास पुणेरी पगडी,पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले,आम्ही टोपी घातली नाही असे म्हणायला नको अशी मिश्किली देखील त्यांनी यांनतर केली.
– ऐन वेळेस पावसाने चांगलीच दाणादान केल्यानंतरही सिम्बॉयसिसच्या व्यवस्थापनाने परिसराऐवजी सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात ध्वनिक्ष्ेपकासह मंच, आसन,एलईडी इ. व्यवस्था उत्तमरित्या सांभाळली
-’वसुदैव कुटुंबकम’ ची जाणीव करुन देणारा ध्वज मुख्यमंत्री यांना प्रदान करण्यात आला




आमचे चॅनल subscribe करा
