

पर्यावरण संरक्ष् ण ही काळाची गरज
सुजाता प्रदीप भानसे
पर्यावरण संरक्ष् णाचे मूल्य बालपणापासून रुजवायला पाहिजे. जेव्हा एखाद्या अबोध बालक आपल्या आसपासच्या नैसर्गिक सुंदरतेने प्रसन्न होतो तर एक परिपक्व मस्तिक त्याच्या विनाशाबद्दल विचार का करतो? त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लोकांना पर्यावरणाचे महत्व व उपयोगिता समजावून सांगितली पाहिजे.
प्राकृतिक सौंदर्याची महत्ती विशद केली पाहिजे. आपण सारे चारही बाजूंनी पर्यावरणाने निर्माण केलेल्या सुरक्ष्ा कवचानी घेरलेले आहोत. म्हणून अभेद्य कवचाला तडा जाईल असे कोणतेही कृत्य करु नये.त्या उलट या संरक्ष् ण कवचाची सुरक्ष्ा कशी ठेवावी यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. भारतीय संस्कृतीत पर्यावरण संरक्ष् ण ही महत्वपूर्ण व सकारात्मक भूमिका बजावते. मुनष्य आणि प्रकृती यांच्यात शत्रु संबंध आहे. आपल्या संस्कृतीत झाडे,पशु,पक्ष्ी,फूल,पहाड,झरणे,जंगली पशु, नद्या,सरोवर,वन,माती,दगड ही पूजनीय आहेत. त्यांच्याप्रती स्नेह सन्मान सांगितलेले आहे.
बुद्धिजीवी लोकांनी पर्यावरण प्रदुषण मुक्तीसाठी विविध प्रयत्न केले पाहिजे. हवा,भोजन,झाडे,जीव,पशु,पक्ष्ी,जंतु यांचे महत्व जेवढं आस्तिक लोकांसाठी आहे तेवढं नास्तिक लोकासांठीसुद्धा आहे. प्रदुषण वातावरण जेव्हा बिघडतं त्याचा दुष्परिणाम सर्वांवर होतो. पर्यावरण संरक्ष् णाची अापली नैतिक जबाबदारी आहे. पर्यावरण संरक्ष् ण करणे म्हणजे स्वत:चे संरक्ष् ण करणे असे आहे. यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वृक्ष् रोपण,वृक्ष् सर्वधन युद्धस्तरावर केले पाहिजे.जगंल तोडणे थांबवले पाहिजे. वन संपदाचे संरक्ष् ण केले पाहिजे. प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळला पाहिजे. भूजल स्त्रोत साठ्यांचा मर्यादित वापर केला पाहिजे. पॉलिथिनवर बहीष्कार केला पाहिजे. कुडा-कचरा एखाद्या खड्ड्यात गाढून खत ंतयार केला पाहिजे.
साफ-सफाई स्वच्छता अभियान रुजविले पाहिजे. रस्त्यांचे सफाई व सौंदर्य टिक़वले पाहिजे. कचरा कुठेही फेकू नये. रद्दी कागदांचा पुर्नवापर केला पाहिजे. पावसातच्या पाण्याचा संचय करुन त्याचा पुर्नवापर केला पाहिजे. महासागरातील पाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पिण्यायोग्य पाण्यात रुपांतर करणे ही काळाची गरज आहे. जनसंख्या नियंत्रण केले पाहिजे. अतिवृष्टि व पुरांच्या पाण्यावर प्रक्रिया करुन त्यांचाही पुर्रवापर केला पाहिजे.अशा प्रकारे पर्यावरण संरक्ष् ण ही काळाची गरज आहे.
……………………..




आमचे चॅनल subscribe करा
