


नागपूर: मनपाची विशेष सभा मंगळवार दि. २३ जुलै रोजी पार पडली मात्र विरोधकांनी सत्ताधार्यां..चा निषेध करीत सभात्याग केला. ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी पाण्यावर चर्चा करण्याची मागणी केली जी मंजूर करण्यात आली नाही. विषय पत्रिकेवर चर्चा सुरु झाल्यामुळे विरोधकांनी नारेबाजी करीत सभात्याग केला. सत्ताधाऱ्यांना पाण्यावर चर्चा करण्याची ईच्छाच नाही कारण अोसीडब्ल्यूला शहरातील संपूर्ण पाणी व्यवस्था दानात दिली असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधकांनी सभागृहा बाहेर घोषणाबाजी केली.
राज्यशासनाच्या मार्फत महापालिकाच बरखास्त करण्याची मागणी त्यांनी केली. शहराला ५० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला मात्र कोणाशीही चर्चा करण्यात आली नाही,विरोधकांना विश्वासात घेण्यात आले नाही. आठ दिवसांपूर्वी एक्शन टेकन रिपोर्ट सादर झाला मात्र यात ओसीडब्ल्यूच्या संबधीत काय कारवाई करण्यात आली? काय मागणी झाली होती? विलंब का झाला? कशाचीही माहीती सत्ताधारी देत नसून नुसती धूळफेक करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ७०० एमएलडी पाणी पुरवठा शहराला केला जात असल्याचा दावा ओसीडब्ल्यू करतेय, मात्र पाणी वितरणाचे कोणतेही नियोजन नाही, ५० टक्के पाणी कपात करणे क्रमप्राप्त आहे हे एखाद वेळी समजू शकतो मात्र काही भागात ५० लिटरही पाणी मिळत नाही,यावर आमची चर्चेची मागणी होती मात्र चर्चा करु दिली नाही. मुद्दामुन विशेष सभा घेण्यात आली ज्यात प्रश्न उपस्थित करता येत नाही. पर्जन्यमान कमी झाले, मानसून वेळेवर आला नाही,अनेक कारणे असतील तर ती ही आम्ही जनतेला सांगू मात्र आेसीडब्ल्यूने अनेक अटींचा भंग केला त्यावर कारवाई झाली पाहिजे, यावर चर्चाच करु दिली नाही, सभागृहाला सत्तापक्ष्ाने गृहीत धरले एवढेच नव्हे तर जनतेलाही गृहीत धरण्यात आल्याचा अारोप गुडधे पाटील यांनी केला.
नागपूर शहराच्या मंजूर विकास आराखड्यात यशवंत स्टेडियम येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी २ एकरची जागा आरक्ष्ति करण्यात आली.सभागृहानेच याला मंजूरी देखील दिली मात्र विकास योजना नकाशात दर्शविलेल्या या जागेचा जमिन वापर बदलवून उक्त जागा यशवंत स्टेडियमसह वाणिज्यीक वापरासाठी अारक्ष्ति करण्यात आली. यावर देखील सभागृहात चर्चा करु दिली नसल्याचा अारोप मनपा विरोधी पक्ष् नेते तानाजी वनवे यांनी केली. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम आज सभागृहात सत्ता पक्ष्ाने केले असल्याचा आरोप त्यांनी केला. विषय पत्रिकेला आमचा विरोध नव्हता मात्र गंभीर विषय बाजूला सारण्यात येऊन विषय पत्रिका रेटण्यात आली या निषेधार्थ आम्ही सभा त्याग केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने नवा जीआर काढून नव्याने सूचना केल्या. नवीन योजना आखली यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पटवर्धन मैदानातील स्मारकाचा काहीच उल्लेख नसून यावर देखील चर्चा करु दिली नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे दूनेश्वर पेठे यांनी केली. नाग नदी सुंदर करण्यासाठी लाखो लोक बेघर होणार असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजकीय नौटंकी- संदीप जोशी
सभागृहात चर्चा न करता विरोधकांनी कामकाजावर बहीष्कार घातला. ही त्यांची राजकीय नौटंकीच आहे. चर्चा करायची असती तर आधी त्यांनी पत्र दिले असते.




आमचे चॅनल subscribe करा
