फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपासर्व झोनमधील ओसीडब्ल्यू कार्यालये बंद करु!-विकास ठाकरे

सर्व झोनमधील ओसीडब्ल्यू कार्यालये बंद करु!-विकास ठाकरे

Advertisements

पाण्यासाठी काँग्रेसचा महापालिकेत विराट मोर्चा 

नागपूर,२२ जुलै २०१९: पाण्याचा प्रश्‍न हा शहरात,घरा-घरात चांगलाच पेटला आहे. गेल्या आठवड्यात १५ जुलै रोजी महापालिकेने शहराला एक दिवसा आड पाणी देण्याचे धोरण अंगीकारले मात्र एक दिवसाच्या ऐवजी अनेक झोनमध्ये तीन-तीन दिवस पाणीच पोहोचत नसल्याची ओरड आहे. एसआरए न्यू म्हाडा कॉलनी,प्रभाग क्र.२० तांडापेठ इत्यादी भागात तर शुक्रवारपासून पाणीच नाह, फक्त पंधरा मिनिटांसाठी पाणी सोडल्याची ओरड आज काँग्रेस पक्ष्ातर्फे महापालिकेत पोहोचणाऱ्या मोर्च्यातील महिलांनी केली. सोमवार दि. २२ जुलै रोजी मनपा आयुक्तांच्या कक्ष्ात अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, सह आयुक्त रोम जोशी आदी पदाधिकाऱ्यांसोबत  झालेल्या चर्चेत कॉंगेसचे शहर अध्यक्ष् विकास ठाकरे यांनी नागरिकांना पाणी मिळत नसल्यास सर्व झोनमधील ओसीडब्ल्यूची कार्यालये बंद करण्याचा इशारा दिला.

विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात महापालिकेत पाण्याच्या ज्वलंत प्रश्‍नावर आज मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी यांनी धडक दिली. ओसीडब्ल्यू यांच्या कार्यालयात मोर्चा नेला असता दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, आेसीडब्ल्यूने नागरिकांना पाण्याचे जे अवासत्व वाढीव बिले पाठवली त्यात सुधारणा करावी व नागपूर शहरातील जनतेला नियमितपणे पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार व अभिजित वंजारी यांनी केली. आंदोलनात विविध झोनचे नागरिक व काँग्रेसचे सर्व नगरसेवक सहभागी झाले होते. ओसीडब्ल्यूतर्फे शहरातील अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा आरोप यावेळी या नेत्यांनी केला व अधिकाऱ्यांना जाब विचारला. ज्या वस्तीत ३० हजार पाण्याचे बिल येत होते तिथे ७० हजारांचे बिल कसे पाठवण्यात आले? आेसीडब्ल्यू करीत असलेली ‘लृटमार’ तात्काळ थांबवण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात शहराला ५०० एमएलडी पाणी पुरवठा करण्यात आला मात्र ऐन मतदानाच्या दिवशी ११ एप्रिल रोजी ७५३ एमएलडी पाणी ओसीडब्ल्यूने कोणत्या नियमा अंतर्गत पुरविले याचे उत्तर मोर्चेकरींनी पदाधिकार्या…ना विचारले.यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, नगर अभियंता मनोज तालेवार, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, ओसीडब्ल्यूचे केएनपी सिंग आदी उपस्थित होते.

संजय महाकाळकर यांनी टँकरमध्ये देखील घोटाळा होत असल्याचा आरोप केला. फेब्रुवरी-मार्चपासूनच पाणी कपात केली असती तर जनतेवर आज अशी वेळ आली नसती, प्रशासकीय अधिकारी म्हणून महापालिकेचं हे अपयश असल्याचा आरोप त्यांनी केला.शहरातील मोठ-मोठे अर्पाटमेंट व सिमेंट रोडला ओसीडब्ल्यूने पाणी पुरवठा केला, ‘पाण्यानीच मेट्रो बनवली’आणि दूसरीकडे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी तडफडत ठेवले असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. पाणी मागायला आल्यास आमच्यावर एफआयआर दाखल होतात, पाणीच मागायला येतो ना? पैसे मागायला येत नाही,असा सूर त्यांनी आवळला.

डिसेंबरमध्येच सभागृहात पाण्यावर विस्तृत चर्चा झाली होती. सहा-सात तासांच्या चर्चेत तेव्हाच शहरात पाण्याचे दूर्भिक्ष्याची जाणीव ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना करुन देण्यात आली होती तेव्हा शहरातील विहीरी साफ करु, बोअरवेल दुरुस्त करु अशी पोकळ आश्‍वासने देण्यात आली प्रत्यक्ष्ात शहरातील जनतेला पाणीच मिळत नाही किंवा दूषित पाणी पुरवठा केला जातोय,याला जबाबदार कोण? असा सवाल नगरसेवक मनोज सांगोले यांनी केला. दरवेळी ओसीडब्ल्यू दूषित पाण्याची पाईप लाईन बदलायला महापालिकेकडून पैसा घेते मात्र पाईप लाईन बदलत नाही तो पैसा जातो कुठे? असा प्रश्‍न काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. शहराला ६४० एमएलडी पाणी सोडण्यात आले मात्र पाण्याचा वापर ३२० एमएलडीच झाला मग बाकीचे पाणी गेले कुठे? असा प्रश्‍न काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके यांनी केला.या ३२० एमएलडी पाण्याचा वापराचे बिलात रुपांतर का नाही केले असा प्रश्‍न उपस्थित करुन आता जनतेने पदाधिकाऱ्यांना ‘लखाणी’चे जोडे मारावे का?असा संताप व्यक्त केला. पाण्याचा प्रश्‍न तातडीने न सोडवल्यास झोनमधील आेसीडब्ल्यूचे सर्व कार्यालये बंद पाडण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला.

पोलिसांची संख्या चारशे!

महापालिकेच्या इतिहासात आजवर कधीही एवढे पोलिस मनपा मुख्यालयात आले नाहीत मात्र काँग्रेसचा मोर्चा येणार म्हणून चारशे पोलिसकर्मी बंदोबस्तासाठी लावण्यात आल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी केला. आम्ही काय चोर आहोत का? महापालिकाच ‘पाणीचोर’असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या काळात भारतीय जनता पक्ष् महापालिकेवर मोर्चा आणायची तेव्हा कधीही एवढा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला नसल्याची चर्चा आयुक्त कक्ष्ाच्या बाहेर मनपा कर्मचाऱ्यांमध्येही रंगली होती. यावेळी ओसीडब्ल्यूच्या विरोधात नारेबाजींनी मनपा मुख्यालय दणाणून गेले.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या