फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपाओसीडब्ल्यू हा सरकारचा ‘जावई’- नाना पटोले

ओसीडब्ल्यू हा सरकारचा ‘जावई’- नाना पटोले

Advertisements

जनतेला शुद्ध पाणी देणे ही महापालिकेची जबाबदारी

नागपूर,२० जुलै २०१९: पाणी हा जनतेचा अधिकार आहे. प्रत्येक मानीव जीवनाचा अधिकार आहे. महापालिकेने प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी दिले पाहीजे. पण आज नागपूरात सगळीकडे पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. लोकांना आंघोळीला पाणी नाही, पिण्यासाठी पाणी नाही, केंद्रिय मंत्र्यांच्या शहरात लोकांना आज घाण पाणी मिळत आहे. सामान्य माणूस ‘बिसलरी’ घेऊन तहान भागवणार आहे का? ओसीडब्ल्यू या सर्व परिस्थितीत काय करत आहे? सरकारचा ‘जावई’ असल्यामुळेच गरीब,सामान्य जनतेवर पाणी कर देऊन सुद्धा पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ या सरकारने व सरकारच्या ओसीडब्ल्यू नावाच्या जावयाने आणली असल्याचा आरोप माजी खासदार व काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला.

शनिवारी पत्र-परिषदेत त्यांनी पाण्याच्या प्रश्‍नावर सरकारला व शहराला पाणी पुरवठा करणाऱ्याओसीडब्ल्यूला धारेवर धरले. गेल्या वर्षी पावसाचे सारखेच प्रमाण असताना ११ एप्रिल २०१८ ला नागपूर शहराला ५६५ एमएलडी पाणी पुरवठा करण्यात आला,या वर्षी ११ एप्रिल रोजी मतदान असल्यामुळे ७५३ एमएलडी ओसीडब्ल्यूने का सोडले? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. शुद्ध पाणी २४ तास उपलब्ध करुन देण्याचा कोट््यावधीचा करार या सरकारने ओसीडब्ल्यूसोबत केला आहे.

यासाठी पहीले ५०० कोटींचे कर्ज मग पुन्हा २०० कोटींचे कर्ज घेण्यात आले. या २०० कोटींपैकी आणखी ५० कोटींची देयक ओसीडब्ल्यूला देण्याचा करार झाला. पाण्यावर काँग्रेस पक्ष् ाला राजकारण करायचे नाही मात्र महापालिका आणि सत्ता पक्ष् हे पाण्यासारख्या ज्वलंत प्रश्‍नावर राजकारण करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. हे सरकार म्हणजे ‘पाणी चाेर’,पाणी माफियांचे’सरकार असल्याचा घणाघाती हल्ला त्यांनी याप्रसंगी चढवला.या सरकारने लोकांच्या तोंडचे पाणी सुद्धा चोरले असल्याचे ते म्हणाले. एकीकडे महापालिका आयुक्त हे शहराला ५० टक्के पाणी उपलब्ध करुन देण्याचे सांगत असताना ओसीडब्ल्यू मात्र भीषण पाणी कपात करत आहे. धरणांमध्ये पाणीच नाही असे सांगताना धरणांमधून शहराला पाणी पुरवठा करताना ५० टक्के पाण्याची जी नासाडी होते ती थांबवण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत कोणतेच प्रयत्न का केले नाही?

कोराडीत नव्या थर्मल पॉवरसाठी पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची चर्चा आहे मात्र पाण्यावर आधी जनतेचा,मग जनावरांचा नंतर उद्याेगांचा हक्क असल्याचे ते म्हणाले. केवळ पाणीच नाही तर या सरकारने संपूर्ण शहरच समस्यांचं शहर करुन ठेवल्याचा आरोप त्यांनी केला.विद्ुत वितरण कंपनी हे सरकारचे दूसरे जावई असल्याचा आरोप त्यांनी केला.भारी बहूमताने जनतेने जिंकून दिलेले भारी मंत्री हे एसएनडी संबधी का कारवाई करीत नाही,असा सवाल त्यांनी केला. पत्र परिषदेला काँग्रेस शहर अध्यक्ष विकास ठाकरे ,काँग्रेस प्रदेश सचिव विशाल मुत्तेमवार आदी उपस्थित होते.

सोमवारी ३ वा. मनपात धरणे-आंदोलन
पाणी हा आमचा अधिकार आहे. पाण्यासाठी काँग्रेस पक्ष् हा सोमवारी महापालिकेत दूपारी ३ वा.धरणे आंदोलन करणार आहे. कायदा सुव्यवसथेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास याला महापालिका जबाबदार राहील असे नाना पटोले यांनी सांगितले.माजी जिल्हा परिषद अध्यक्ष् निशा सावरकर यांनी ठराव मांडला होता एक थेंब ही पाणी देणार नाही मात्र हा ठराव त्यांना मागे घ्यायला लावला,महापालिकेत महापौर राहीलेले मुख्यमंत्री,२५ वर्षांपासून राजकारणात असून देखील पाण्याचा प्रश्‍न त्यांना सोडवता आला नसल्याचे ते म्हणाले. ‘खेकड्यांचे सरकार’ बनवून ठेवले असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाधिकारींनी केली पालकांचीच तक्रार!
राज्य सरकारने खाजगी शाळांच्या फी संबधी कायदा आणला मात्र नागपूर शहरात अनेक खाजगी शाळा हे पालकांकडून ८० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत केजी-१ साठी प्रवेश शुल्क घेतात आहे. या विरोधात पालक संघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता जिल्हाधिकारी यांनी पालकांनाच केबिन बाहेर घालवले. महिलांशी हुज्जत घातली. या पालकांची तक्रार पोलीस आयुक्तांकडे केली असल्याचा आरोप नाना यांनी याप्रसंगी केला. एकीकडे महापालिकेच्या शाळा बंद केल्या जात आहे दूसरीकडे खाजगी शाळा भरमसाठ फी घेत आहे,गरिबांच्या मुलांनी शिकूच नये हे मोदी सरकार व फडणवीस सरकारचे धोरण आहे का? असा सवाल त्यांनी केला. पालकांच्या विरोधात तक्रार करण्याचे औचित्य जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट करण्याची मागणी यावेळी नाना यांनी केली.

पक्ष्ाचा आदेश असल्यास विधानसभा ही लढणार-
येत्या विधानसभेची निवडणूक ही लढवणार आहे का?या प्रश्‍नाचे उत्तर देत पक्ष्ाचा आदेश असल्यास विधान सभाही लढणार असल्याचे ते म्हणाले.नागपूरमधील गूटबाजीसंबधी विचारले असता गुटबाजीचा पक्ष्ात लवलेषही नसल्याचे ते म्हणाले.

भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात!
राज्यातले अनेक मंत्री,आमदार, मोठे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते हे आमच्या संपर्कात असल्याचा खुलासा याप्रसंगी नाना यांनी केला. माझी लढाई ही देशाचे लोकतंत्र वाचवण्यासाठी आहे. सत्तेसाठी नाही किवा खूर्चीसाठी नाही. भाजपा ही वारंवार विकास ठाकरे यांच्या विरोधात जनतेचे लक्ष् केंद्रित करते व पाण्याच्या प्रश्‍नावरुन जनतेचे लक्ष् विचलित करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. मराठा,ओबीसी, अनुसूचित जाती,जमाती,आदीवासी या सर्वांच्या शिक्ष् णाचे, बढतीच्या प्रश्‍नांचा या सरकारने बट््याबोळ केला. मूळ प्रश्‍नाला बगल देऊन विकास ठाकरे यांच्याकडे लक्ष् केंद्रित करतात. आज भाजपमध्ये एक फडणवीस आणि गडकरी सोडलेत तर सर्व पाचही आमदार अगदी भाजपच्या इंचार्ज सरोज पांडे यासुद्धा मूळ काँग्रेसीच आहेत. येत्या निवडणूकीत नागपूरातील सहाही जागांवर काँग्रेस पक्ष्ाचाच विजय होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या