फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजजागतिक दर्जाचे मेट्रो स्टेशन ‘गळणारे!

जागतिक दर्जाचे मेट्रो स्टेशन ‘गळणारे!

Advertisements

पहील्याच पावसात कोट्यावधीची यंत्रे पाण्यात

नागपूर: नुकतीच पावसाने नागपूरात हजेरी लावली आणि पहील्याच पावसात नागपूरातील तथाकथित जागतिक दर्जाच्या मेट्रो स्टेशनची दशा जय जवान जय किसान संस्थेच्या केमेऱ्यानी टिपली. देशातीलच नव्हे तर जागतिकस्तरावरील सर्व प्रसार माध्यमे व वृत्तपत्रात नागपूरातील निमार्णाधीन मेट्रो स्टेशन हे कश्‍याप्रकारे जागतिक दर्जाचे आहे याचा गाजावाज करण्यात आला मात्र पहील्याच पावसात मेट्रो स्टेशनमधील कोट्यावधीची अद्यावत यंत्रे, एक्सीलेटर, रेल्वे रुळ पाण्याखाली बुडाले याचे छायाचित्रे जय जवान जय किसानने बुधवारी पत्र-परिषद घेऊन प्रसिद्ध केली. मेट्रोमधील भ्रष्टाचाराचा एक साक्षीदार म्हणून वरुण राजानेही नोंद केली असल्याचे विधान जय जवान जय किसानचे अध्यक्ष् प्रशांत पवार यांनी केले. पहील्याच पावसात दैना उडालेल्या मेट्रो स्टेशनचे हाल बघता जागतिक दर्जा नव्हे तर एखाद्या खेडे गावातील बस स्थानकाच्या गळणारे टिनांचे स्थानक असल्याचा भास होतो,असे ते म्हणाले.

कोट्यावधीच्या अद्यावत मशीन्स या अक्ष् रश: झाकून ठेवण्यात आल्या आहेत. स्टेशनच्या मध्य भागात पाणी साचले आहे. भिंतींवरुन पाणी झिरपत आहे. रेल्वे रुळ हे पाण्याखाली गेलेत,लाखो रुपयांचे सीसीटीव्ही कॅमरे हे देखील पावसाच्या पाण्यात टप्प्यात आले आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे न्यू एअर पोर्टच्या पंप रुम स्टेशनमध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. पंप रुममधील पाणी ‘डेमो‘साठी शिरवले का?अशी उपरोधीक टिका यावेळी पवार यांनी केली. बृजेश  दीक्षित यांच्या अनेक घोटाळ्यांपैकी मेट्रो स्टेशनच्या दर्जाहीन कामाचा आणखी एक महाघोटाळा असल्याचे ते म्हणाले.  दीक्षित यांची सखोल चौकशी करुन त्यांना त्वरीत निलंबित करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. मेट्रो स्टेशनविषयी प्रोपोगंडा करताना कश्‍याप्रकारे जाहीराती मिळतील, मेट्रोला महसूल मिळेल असे ‘ईमले’ त्यांनी घोषित केले होते मात्र  प्रत्यक्षात भ्रष्टाचाराच्या ‘जागतिक’स्टेशनची निर्मिती त्यांनी केली असल्याचे ते म्हणाले. अजून तर मेट्रो सुरुच झाली नाही,सर्वाधिक अपघात हे मेट्रोच्या एक्सीलेटरमुळे झाले असल्याचा जागतिक अहवाल आहे, नागपूरात तर एक्सीलेटरच पाण्याचा आत गेले आहे, प्रवाश्‍यांचा जीव  दीक्षित यांनी धोक्यात घातला असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. स्टेशनमधील फ्लोरिंगवर तसेच पायऱ्यांवर मार्बलच्या टाईल्स लावण्यात आल्या आहेत,यात देखील प्रवाश्‍यांच्या  सुरक्षेचे निकष पाळण्यात आले नाही.  दीक्षित हे नेहमीच अमूक प्रकल्पातून कोट्यावधी रुपये वाचवल्याचा दावा करतात तोच पैशा प्रवाश्‍यांच्या  सुरक्षेक्ष्साठी का वापरण्यात आला नाही,असा प्रश्‍न पवार यांनी उपस्थित केला. नागपूर रेल्वे स्टेशनच्या फलाट क्र.८ ची चौकशी सीबीआयतर्फे होत आहे त्याच धर्तीवर मेट्रो स्टेशनच्या निकृष्ट कामांची सीबीआयद्वारे चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली.मेट्रोने ज्या कंपनीची चौकशी होत आहे त्याच कंपनीला काम देण्यामागील कारणे  दीक्षित यांनी स्पष्ट करावी,अशी मागणी केली.

नुकतेच सीएमआरचे तीन सदस्यीय पथकाने मेट्रोच्या कामाची पाहणी करुन ‘अप’मार्गावर प्रवाशाची परवानगी दिली. पथकातील जनक कुमार गर्ग हे पूर्वी महामेट्रोमध्ये होते मग रेल्वेत गेले, त्यांच्या अहवालावर देखील प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकतो, लवकरच आम्ही या विरोधात एविऐशन मंत्रालयात तक्रार दाखल करणार असल्याचे पवार हे म्हणाले. पत्र परिषदेला विजय शिंदे, अरुण वणकर, मिलिंद महादेवकर,रविंद्र इटकेलवार, टि.एच.नायडू, अविनाश शेरेकर आदी उपस्थित होते.

 

 

 

 

मेट्रो स्टेशन पाण्यात.. दीक्षित कोट्यावधीच्या घरात!

नियमानुसार मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून  दीक्षित यांना आनंद नगर येथील प्रशस्त घर नागपूर सुधार प्रन्यासने अलॉट केले असताना शिवाजी नगर येथील विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये त्यांनी आलिशान ‘मेट्रो हाऊस ’थाटले असल्याचा गंभीर आरोप प्रशांत पवार यांनी केला. या घराचे महीन्याचे घडभाडे ९० हजार रुपये असून कोणतेही अधिकार नसताना  दीक्षित यांनी एक कोटींचे रिनोव्हेशन या गेस्ट हाऊसचे केले असल्याचे ते म्हणाले. हा सगळा पैसा शेवटी जनतेच्या खिशातून जात आहे. विद्यापीठाला ही जागा दानशूर कोरके या महीलेनी मुलींचे वसतीगृह बांधण्यासाठी दिली असताना विद्यापीठाने वसतीगृह न बांधता विश्राम गृहासाठी या जागेचा उपयोग केल्याचे दस्तावेज यावेळी पवार यांनी पत्रकारांसमोर सादर केले. एकीकडे जागतिक दर्जाचे मेट्रो स्टेशन पाण्यात असताना दीक्षित हे कोट्यावधीच्या घरात राहत असल्याची टिका त्यांनी केली.

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या