कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके हे अतिशय बालिश वक्तव्य करीत असून, मुंबईत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंसोबत संविधान निर्माते डॉ.बाबासाहेबांच्या अतुलनीय कार्यांची तुलना केली.हा बाबासाहेबांचा घोर अपमान असून दिपके यांनी देशातील संपूर्ण आंबेडकरी जनतेची माफी न मागितल्यास त्यांना धडा शिकऊ असा इशारा आज पत्रकार परिषदेत
यांनी दिला.
या प्रसंगी बोलताना ते म्हणाले,की ज्या काँग्रसेने १९३७ असो किंवा १९५२,लोकसभेच्या निवडणूकीत बाबासाहेबांचा पराभव करण्यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा केली,बाबासाहेबांसाठी संसदेची दारेच नव्हे तर खिडकी देखील उघडणार नसल्याची वल्गना केली,पंडित नेहरुंच्या स्वीय सहायकाला बाबासाहेबांच्या विरुद्ध निवडणूकीत उतरवले अश्या नेहरुंसोबत दिपके, बाबासाहेबांच्या कार्याची तुलना करतात,त्यांची ही भूमिका आम्ही सर्वार्थाने नाकारत असल्याचे ते म्हणाले.
बाबासाहेब स्वत: काँग्रेस हे जळतं घर असल्याची टिका करीत असे.त्यामुळे पं.नेहरुंसोबत बाबासाहेबांच्या वैचारिक भूमिकांची तुलना होऊच शकत नाही.याशिवाय दिपके हे त्याही पुढे जात
१९९९ नंतर जन्माला आलेल्या पिढीला संविधान व संवैधानिक अधिकारांविषयी चुकीची माहिती देत आहेत,असा आरोप त्यांनी केला.
जेव्हा देशात लाेकांना लोकशाही,निवडणूका,मतदानाचा संवैधानिक अधिकार ही समजत नव्हता त्यावेळी पंडित नेहरु व बाबासाहेबांनी त्यांना १९३६ मध्येच मतदानाचा अधिकार दिला,ही पंडित नेहरु व बाबासाहेबांची महानता असल्याची वल्गना दिपकेंनी केली.दिपके जेन-झी पिढीमध्ये फार मोठा संभ्रम निर्माण करीत असून,त्यांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप ॲड.मेश्राम यांनी केला.पंडित नेहरुंच्या रांगेत बाबासाहेब आंबेडकरांना दिपके नेऊन बसवित आहेत.दिपके नेहरुंना मोठे करीत असून बाबासाहेबांना दुय्यम करीत असल्याचा गंभीर आरोप याप्रसंगी मेश्राम यांनी केला. आम्हाला नेहरुंसोबत बाबासाहेबांची तुलना मान्य नाही,यासाठीच आम्ही दिपकेंच्या विवादास्पद भूमिकेचा विरोध करण्यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे मेश्राम यांनी सांगितले.
दिपके केवळ संविधानच नव्हे तर देशातील सर्व संवैधानिक संस्थांविषयी जनतेच्या मनात संशय निर्माण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.जेन-झी पिढीला चुकीच्या आंदोलनांच्या मार्गावरुन तुरुंगात टाकण्याचा विडा त्यांनी उचलला आहे,अशी जहाल टिका त्यांनी केली.त्यांना पैशांचा पुरवठा कुठून होत आहे,याचा खुलासा त्यांनी करावा,अशी मागणी त्यांनी केली.फॉरेन रिटर्न दिपके हे देशातील गल्लीबोळात कोणत्या पक्षाचा अजेंडा चालवित आहेत?असा सवाल त्यांनी केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचीच शिकवण आहे ‘शिका संगठीत व्हा आणि संघर्ष करा‘दिपके हे बाबासाहेबांचीच शिकवण अवलंबित नाही आहेत का?असा सवाल केला असता,संघर्ष करायचा पण तो कोणाविरुद्ध?संविधान आणि देशातील संवैधानिक संस्थांच्या विरोधात अराजकता पसरविण्यासाठी संघर्ष करने बाबासाहेबांना अपेक्षीत नव्हते,असे ते म्हणाले.दूर्देवाने पंतप्रधान मोदी यांच्या विषयीचा एकेरी उल्लेख,त्यांच्या वैयक्तिक चारित्र्यावर हल्ले करने,याला आंदोलन म्हणता येईल का?असा सवाल त्यांनी केला.
दिपके यांच्या हातात संविधानाची प्रत नसते याकडे लक्ष वेधले असता,दिपकेंसाठी संविधानाची गरज संपलेली आहे,असा टोला त्यांनी हाणला.राहूल गांधी एक लाल पुस्तक हातात घेऊन फिरतात,संविधान व दिपके यांचा काेणताही संबंध नाही,दिपकेंचे वडील सरकारी नोकर होते,बाबासाहेबांचा संघर्ष दिपकेंच्या सरकारी अधिकारी राहीलेल्या वडीलांच्या व पर्यायाने दिपकेंच्या वाट्याला आलेला नाही,त्यामुळे निदान दिपकेंनी संघर्ष आणि संविधानाची भाषा बोलू नये,असे धर्मपाल मेश्राम म्हणाले.
या देशातील किमान २२ राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे,भाजपनेही विरोधी पक्षात असताना आंदोलने केली व सत्तेपर्यंतचा मार्ग सुकर केला मग दिपकेंच्या आंदोलनाला विरोध का?असा प्रश्न केला असता,आमच्या आंदोलनाला एक दिशा होती,एक भूमिका होती.जेव्हा-जेव्हा काँग्रेस विजयी होत होती भाजपने त्याच ताकदीने जनतेसमोर येऊन विषय मांडले.आज काँग्रेस ज्या ईव्हीएम विरुद्ध गळे काढतेय, भारतात ईव्हीएम आणण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे.आम्ही तर चौका-चौकात ईव्हीएम मशीन्स ठेऊन वाेटचोरी करुन दाखवण्याचे आव्हान केले मात्र,काँग्रेस पुढे आलीच नाही,काँग्रेससारख्या पक्षाला संविधान मूळातच मान्य नसल्याचा टोला त्यांनी हाणला.
एसआयआरविषयी देखील दिपके जनतेमध्ये भ्रम निर्माण करीत असल्याचा आरोप मेश्राम यांनी केला.१३ कोटी मतदारांची नावे गहाळ करण्यात आल्याचा त्यांचा दावा खोटा असून मतदान यादीतील नावे,अक्षरांच्या चुका दुरुस्त केल्या जात आहेत.एसआयआर ही देशासाठी अतिशय महत्वाची प्रक्रिया असून,अफगाणी,तालिबानी विचारांची व बांग्लादेशी घूसखोर मतदारांना भारताने का पोसायचे?असा सवाल त्यांनी केला.या देशाच्या जल,जंगल व जमीनीवर भारतीयांचा हक्क आहे,घूसखोरांचा नाही असे सांगत,मतदार हा देशाचा नागरिक आहे किंवा नाही,हे तपासणे निवडणूक आयोगाचे संवैधानिक कर्तव्य आहे,असे मेश्राम म्हणाले.
पत्रकार परिषदेत उपमहापौर लीला हातीबेड,माजी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांच्या सह अनेक नगरसेवक उपस्थित हाेते.
………………………………………