मात्र,दर वर्षीप्रमाणे या महोत्सवाचे स्वरुप व्यापक व भव्य नसून उन्हाचा तडाखा,उन्हाची काहीली बघता तसेच खेळाडूंच्या आरोग्याची काळती घेत मर्यादित स्वरुप ठेवण्यात आले असून यंदा केवळ १८ क्रीडा प्रकार स्पर्धेत ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली.आता पर्यंत खासदार क्रीडा महोत्सवात ६५ च्या वर खेळ होत होते तसेच एका-एका खेळाच्या संयोजकावर ४-४ क्रीडा प्रकाराच्या संयोजनाचा भार असायचा मात्र,यंदा आमची १८ जणांची चमू असून प्रत्येकाकडे एकाच खेळाचा भार सोपवण्यिात आला असल्याचे त्यांनी सांगितले.खेळाडूंच्या व स्पर्धेसाठी कार्यरत असणा-यांच्या आरोग्याची काळजी घेत ही स्पर्धा केवळ सकाळी व संध्याकाळी होणार आहे.दूपारी कोणत्याही स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नाहीत.त्यात ही खेळाडू व इतर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था,ग्लूकोज,इलेक्ट्रॉल यासह वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाळी तापमानाविषयी जिल्हाधिकारी यांच्या संपूर्ण सूचनांचे पालन करुन खासदार क्रीडा महोत्सव यंदा देखील पार पडणार असल्याचे आमदार संदीप जोशी यांनी याप्रसंगी सांगितले.दरवर्षी हा महोत्सव नागपूर शहर व जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात पार पडत आला आहे. मात्र यावर्षी नागपुरातील वाढते तापमान लक्षात घेता क्रीडा साखळी खंडित न करता महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून, यंदा हा महोत्सव फक्त नागपूर शहरातील खेळाडूंकरिता मर्यादित ठेवण्यात आला आहे.
या पर्वात एकूण १८ क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला असून, शहरातील विविध भागांतील सुमारे २० मैदानांवर स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे सर्व मैदानी स्पर्धा रात्रीच्या सत्रात आयोजित केल्या जाणार आहेत. या महोत्सवासाठी एकूण ५७ लाख ६३ हजार रुपयांची रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून विजेत्यांना ट्रॉफी व पदकेही प्रदान करण्यात येणार आहेत.
या महोत्सवात कुस्ती, मॅरेथॉन, खो-खो, बॅडमिंटन, अॅथलेटिक्स, कबड्डी, स्विमिंग, बास्केटबॉल, बुद्धिबळ (चेस), कॅरम, हँडबॉल, योगासन, जिम्नॅस्टिक्स, स्केटिंग, टेबलटेनिस आणि सॉफ्टबॉल या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. पियुष आंबुलकर, डॉ. पद्माकर चारमोडे, सचिन देशमुख, अशफाक शेख, डॉ. विवेक अवसरे, डॉ. संभाजी भोसले, अमित संपत, नागेश सहारे, नवनीत तुली, सचिन माथने विशाल लोखंडे, संदेश खरे, लक्ष्मीकांत किरपाने, धनंजय उपासनी, सतीश वडे, सुनील मानेकर, डॉ. सौरभ मोहोड, प्रकाश चंद्रायाण आणि नीरज दोन्तुलवार हे सहसंयोजक म्हणून जबाबदारी सांभाळणार असल्याची माहिती आमदार जोशी यांनी दिली.
पत्रपरिषदेला खासदार क्रीडा महोत्सवाचे संयोजक आ. संदीप जोशी यांच्या सह सर्व क्रीडा समन्वयकांनी सहसंयोजक उपस्थित होते.
……………………………….