फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमेडीकलमध्ये लेप्रोस्कॉपीपेक्षाही अद्यावत रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु

मेडीकलमध्ये लेप्रोस्कॉपीपेक्षाही अद्यावत रोबोटिक शस्त्रक्रिया सुरु

Advertisements
अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांची पत्रकार परिषदेत माहिती

अवघ्या दीड वर्षात केल्या ३५० रोबोटिक शस्त्रक्रिया
२९-३० नोव्हेंबरला राष्ट्रीय रोबोटिक शस्त्रक्रिया परिषदेत होणार प्रात्यक्षिक
नि:शुल्क,वेदनारहीत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे डॉ. अविनाश गावंडे यांचे रुग्णांना आवाहन
नागपूर,ता.२७ नोव्हेंबर २०२५: संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात महागडे रोबोटिक यंत्र हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय(मेडीकल)मध्ये सर्वात आधी लागले.तीस ते चाळीस कोटींच्या या यंत्राची मागणी मेडीकलने शासनाकडे २०१६ सालीच केली होती.मात्र,२०२४ मध्ये हे रोबोटिक यंत्र मेडीकलमध्ये उपलब्ध झाले.त्यानंतर अवघ्या दीड वर्षात साढे तीनशेपेक्षा अधिक ते देखील अत्यधिक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या रोबोटिक यंत्राने अतिशय यशस्वीपणे पार पाडल्या.येत्या २९ व ३० नोव्हेंबर रोजी मेडीकलमध्ये राष्ट्रीय रोबाटिक शस्त्रक्रिया संमेलन पार पडणार असून यावेळी रेसिप्रोकल टेलीसर्जरीचे प्रात्यक्षिक चक्क मोरादाबाद येथून तर मोरादाबादमध्ये होणारी रोबोटिक शस्त्रक्रिया चक्क मेडीकलमध्ये बघण्यास मिळणार आहे.अशी माहिती आज पत्रकार परिषदेत मेडीकलचे अधिष्ठाता डॉ.राज गजभिये यांनी दिली.
याप्रसंगी मेडीकलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अविनाश गावंडे,या संमेलनाचे अध्यक्षपद सांभाळणारे डॉ.भूपेश तिरपुडे,सचिव डॉ.गायत्री देशपांडे व डॉ.हेमंत भानारकर उपस्थित होते.याप्रसंगी बोलताना डॉ.गजभिये यांनी सांगितले की,अत्याधूनिक प्रात्यक्षिक,प्रत्यक्ष प्रशिक्षण(हँड्स-ऑन मॉड्यूल्स) आणि मेडीकल व मोरादाबाद रुग्णाल्यात होणा-या लाईव्ह शस्त्रक्रियेचे प्रसारण या वैशिष्ठांसह ही दोन दिवसीस राष्ट्रीय रोबोटिक शस्त्रक्रिया परिषद देशभरातील प्रख्यात रोबोटिक चिकित्सकांना एकत्रित आनणार आहे.रोबोटिक शस्त्रक्रिया क्षेत्रातील हे वर्षातील एक महत्वाचे शैक्षणिक व तांत्रिक आयोजन ठरणार आहे,असे ते म्हणाले.
मोरादाबाद तसेच मेडीकलमधील रिसिप्रोकल टेलीसर्जरी प्रात्यक्षिक हे सर्वात मोठे आकर्षण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही शस्त्रक्रिया डॉ.राज गजभिये यांच्या मार्फत एस.एस.आय मंत्रा रोबोटिक सर्जरी यंत्रणेच्या साहाय्याने पार पडणार असू,भारताच्या प्रगत होत असलेल्या दूरस्थ रोबोटिक शस्त्रक्रिया क्षमतांचा उत्कृष्ट नमुदा सादर होणार आहे.याशिवाय,या परिषदेदरम्यान जगभरात स्थापित व वापरल्या जाणा-या चार वेगवेगळ्या रोबोटिक प्लॅटफॉर्मवरुन लाईव्ह रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रक्षेपण केले जाणार आहे.या सत्रांमुळे सहभागी चिकित्सकांना विविध अत्याधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रक्रिया पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे.
या राष्ट्रीय रोबोटिक शस्त्रक्रिया परिषदमध्ये(रोबासर्ज २०२५)प्रत्यक्ष प्रशिक्षण मॉड्यूल्सचाही समावेश आहे,ज्याद्वारे चिकित्सकांना विविध रोबोटिक यंत्रणांवर काम करण्याचा अनुभव मिळेल.हा उपक्रम कौशल्यवृद्धीला चालना देईल आणि भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या रोबोटिक शस्त्रक्रिया क्षेत्राची सखोल ओळख करुन देणार असल्याचे डॉ.गजभिये म्हणाले.
या परिषदेचे उद् घाटन रविवार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.प्रमुख पाहूणे म्हणून एस.एस.इनोव्हेशन्स आणि ग्लोबल रोबोटिक सर्जरी पायोनियनचे संस्थापक डॉ.सुधीर श्रीवास्तव उपस्थित राहतील.वैद्यकीय क्षेत्रातील चिकित्सकांनी मोठ्या संख्येने या अत्याधूनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ.गावंडे यांनी केले.लेप्रोस्कॉपी तंत्रज्ञान हे आता कालबार्ह्य झाले आहे.त्यापेक्षाही रोबोटिक तंत्रज्ञान हे अद्यावत असल्याचे डॉ.गावंडे म्हणाले.
या रोबोटची मेडीकलच्या ह्दय,युरोलॉजी,सर्जरी,गायनिक तसेच सुपर स्पेशिलिटीसह विविध विभागात मागणी होत असल्याचे डॉ.गजभिये यांनी सांगितले.मेडीकलमधील व्याप बघता आम्ही आणखी एका रोबोटची मागणी शासनाकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या वीस वर्षांपासून दावेची कंपनीचेच रोबोट त्यांचे पेटेंट असल्यामुळे जागतिकस्तरावर उपयोगात आणले जात होते मात्र,५ वर्षांपूर्वी दावेची कंपनीच्या पेटेंटची मुद्दत संपताच भारतात सर्वस्वी भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यापेक्षाही अद्यावत रोबोट एस.एस.इनोव्हेशनचे श्रीवास्तव यांनी निर्माण केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेड इन इंडिया’या धोरणाचा अतिशय यशस्वी प्रयोग म्हणजे भारतात निर्माण होणारा हा रोबोट आहे,असे डॉ.गजभिये म्हणाले.दावेची कंपनीपेक्षा आर्थिकरित्या परवडणारे हे रोबोट असल्याची माहिती त्यांनी याप्रसंगी दिली.
रोबोटद्वारे शस्त्रक्रिया करताना एरर आल्यास काय उपाययोजना असते?असा प्रश्‍न केला असता असे कधीही घडत नाही मात्र,शस्त्रक्रियेच्या वेळी सर्जन्सची संपूर्ण चमू देखील त्या ठिकाणी उपस्थित असते जी काेतण्याही संकटकाळात शस्त्रक्रियेला ‘टेकओव्हर’करु शकते,असे त्यांनी सांगितले.या रोबोटच्या माध्यमातून फक्त तीन छोटे छिद्र करुन शस्त्रक्रिया केली जाते.ही शस्त्रक्रिया झाल्यावर अवघ्या दोन दिवसात रुग्णाला सुटी दिली जाते.रक्तस्त्रावाचे प्रमाण हे देखील अत्यल्प असल्याचे ते म्हणाले.मेडीकलमधील या रोबोटची यशस्वीता बघता आता देशभरातील शासकीय रुग्णालये शासनाकडे रोबोटची मागणी करीत आहेत.
मेडीकलला स्वायत्तेचा दर्जा,याविषयी प्रश्‍न केला असता ही संस्था आपली अमृत महोत्सवी वाटचाल करीत आहे.देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांनी अमृत महोत्सवी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले.या ७५ वर्षात अनेक उच्चपदस्थ आयएएस,आयपीएस,हजारो निष्णात चिकित्स ज्यांनी देशातच नव्हे तर विदेशात देखील नावलौकिक कमावले,अनेक नेते,मंत्री या संस्थेने दिले आहे.आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वायत्तेसाठीचे पत्र दिले आहे.त्यांनी सचिवांना जे.जे,रुग्णालय मुंबई,नागपूरचे मेडीकल तसेच पुण्याचे बी.जे यांच्यासाठी स्वायत्त समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहे.दोन महिन्यात समितीचा अहवाल आल्यावर यावर निर्णय होणार असल्याची माहिती डॉ.गजभिये यांनी दिली.
बहुप्रतिक्षित कँसर रुग्णालय याच्या प्रगतीविषयी प्रश्‍न केला असता एकूण ७८ कोटी मंजूर झाले असून त्यातील २७ कोटींचे पहीले भुगतान झाले असून ७० टक्के काम कँसर रुग्णालयाचे पूर्ण झाले आहे.२० कोटींचे भुगतान एनएमआरडीए लवकर मेडीकलला देणार आहे.लवकरात लवकर मेडीकलचे कँसर रुग्णालय हे रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज होईल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्युब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या