फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनविश्वशांती, समृद्धीसाठी महापरित्राण पाठाचे सामूहिक पठन  

विश्वशांती, समृद्धीसाठी महापरित्राण पाठाचे सामूहिक पठन  

Advertisements
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे ‘जागर भक्तीचा’ या अध्यात्मिक मालिकेअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण आयोजन

नागपुर,१६ नोव्हेंबर २०२५:  विपत्ति पटिविहाय, सब्ब सम्पति सिध्दिया || सब्ब योगा विनासाय, भवे दिघायु दायकं || हे स्वर आज ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात गुंजले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे ‘जागर भक्तीचा’ या अध्यात्मिक मालिकेअंतर्गत रविवारी  शेकडो भिक्खुंच्या उपस्थितीत महापरित्राण पाठाचे सामूहिक पठण संपन्न झाले. पूज्य धम्म  गुरु भन्ते संगाणंदजी यांनी सर्वांना त्रिशरण पंचशिलेचा पाठ दिला.

समाजाचे रक्षण आणि कल्याण यासाठी तथागत बुद्धांनी दिलेला करुणा, शांती आणि समता यांचा संदेश   महापरित्राण पाठाद्वारे देण्‍याचा  कार्यक्रमाचा मुख्‍य उद्देश होता. हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव भगिनिंनी  या कार्यक्रमाला  हजेरी लावून पठणात सहभाग घेतला. भगवान बुद्धांची शिकवण कायम आपल्या स्मरणात राहावी, यासाठी या विशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले.

संस्कार भारतीच्या अध्‍यक्षा कांचनताई गडकरी,  धर्मपाल मेश्राम, उषाताई पायलट, सुभाष पारधी, सतीश शिरस्वान, संदीप जाधव, कार्यक्रमाचे संयोजक संदीप गवई, खासदार सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. दीपक खिरवडकर, अविनाश घुशे या मान्यवरांच्‍या हस्‍ते दीपप्रज्‍वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. मान्‍यवरांचे स्वागत संदीप गवई, महेंद्र प्रधान, फुलदास पाटील, संदीप बेले, सचिन घोडेस्वार, शंकर मेश्राम यांनी केले.
तत्पूर्वी, मंचावरील भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन आणि वंदन मान्यवरांनी केले. भन्तेजी यांचे पूजन करून आणि सामूहिक वंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन रेणुका देशकर त्यांनी केले.
भिक्षु संघाने दिले आशीर्वाद-
सामूहिक महापरित्राण पाठ झाल्यावर भिक्षु संघाने सर्व उपस्थितांना आशीर्वाद दिले. जगात शांतता, आनंद नांदावा अशी शुभ कामना त्यांनी केली. भगवान बुद्धांच्या शिकवणीचे पालन व्हावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त करून या आयोजनाचे कौतुक केले.
……………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या