Advertisements

१६ व्या ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे थाटात उद् घाटन
नागपूर,ता.२२ नोव्हेंबर २०२५: नागपूरात ७० कोटींच्या खर्चातून संत्र्याचे क्लिीन प्लांट सेंटर स्थापन होणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांनी शुक्रवारी(ता.२१)ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाच्या उद् घाटन सोहळ्यात केली.अमरावती मार्गावरील विद्यापीठ परिसरात आयोजित ॲग्रोव्हिजनचे उद् घाटन चौहान यांच्या हस्ते झाले.ॲग्रोव्हिजनचे मुख्य प्रर्वतक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे,राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल,डॉ.पंकज भोयर,माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार,एनडीडीबीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.मिनेश शाह,एसएमएलच्या कोमल,नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.माधवी खोडे-चवरे,पंजाबवरात कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.शरद गडाख,माफसूचे कुलगुरु डॉ.नितीन पाटील,ग्लोबल कॉपोर्रेट अँड इंडस्ट्रीजचे सागर कौशिक,महिंद्राचे अध्यक्ष विजयराम नाकरा,ॲग्रोव्हिजन आयोजन समितीचे सल्लागार डॉ.सी.डी.मायी,डॉ.गिरीश गांधी,आयोजन सचिव रवी बोरटकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी चौहान म्हणाले,की शेतक-यांना चांगली रोपे मिळाली तरच चांगले उत्पादन घेऊ शकतील.यासाठी मोठ्या नर्सरीला ४ कोटींपर्यंत अर्थसाहाय्य आणि छोट्या तसेच मध्यम नर्सरीला २ कोटीपर्यंत अर्थसाहाय्य केले जाईल.‘लाडकी बहीण’ही लखपती बहीण बनली पाहिजे.शेतकरी अन्नदाता असून त्यांचे जीवनमान सुधारणे यावर आपला भर असला पाहिजे,असे आवाहन त्यांनी केले.
ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर शेतक-यांचे आर्थिक विकास केंद्र बनणार:गडकरी
स्पेनमधील फार्मर बिझनेस स्केलच्या धर्तीवर अमरावती मार्गावरील पीडीकेव्हीच्या मैदानावर साकारण्यात येणा-या ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जागतिक दर्जाचे फार्मर बिजनेस स्कूल तयार होत असून,त्याचा लाभ विदर्भासह संपूर्ण देशातील शेतक-यांना होईल आणि त्यांचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ शकेल,असा अाशावाद नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.दरम्यान नुकत्याच स्पेन मधील संत्रा तंत्रज्ञानावर घेतलेल्या कार्यशाळेत अनेक शेतक-यांनी लाभ घेतला असून विदर्भासह नजीकच्या क्षेत्रातील शेतकरी येत्या काही वर्षात एकरी दहा ते बारा टन संत्र्याचे उत्पादन घेऊ शकतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षात शेतक-यांच्या आयुष्यात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्न झाला.याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेने उसाच्या शेतीमध्ये मोठे परिवर्तन होऊन प्रती एकर उत्पादन अधिक होऊ शकते.दुग्ध उत्पादन,मत्स्यपालनसोयाबीन उत्पादन या विषयावर देखील त्यांनी विचार मांडले.
राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य:दत्तात्रेय भरणे
शेतीत चांगले प्रयोग करावेत,चांगले वाण वापरावे,शेतीपूरक व्यवसाय वाढावे आणि बदल करावा,असा सल्ला दत्तात्रेय भरणे यांनी दिला.पेरणी ते कापणीपर्यंत राज्य सरकारचा शेती विभाग शेतक-यांना सहकार्य करण्यात तत्पर आहे.कृषी संजीवनीसारख्या योजना राज्य सरकार राबवत असल्याचे माहिती त्यांनी दिली.ॲग्रोव्हिनमधून मिळालेल्या सूचना आणि मार्गदर्शन यावर राज्य सरकार सकारात्मक विचार करेल,असे आश्वासन त्यांनी दिले.
……………………..
Advertisements

Advertisements

Advertisements
