Advertisements

४४०७ अधिसंख्य सफाई कर्मचा-यांना होणार लाभ
नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेने मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार
नागपूर,९ ऑक्टोबर २०२५: नागपूर महानगरपालिकेच्या आकृतिबंधातील ४४०७ अधिसंख्य सफाई कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारसी लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे ४४०७ अधिसंख्य सफाई कर्मचाऱ्यांच्या घरात आनंदाची दिवाळी साजरी होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले असून संघटनेचे अध्यक्ष ॲड. राहूल झांबरे व सरचिटणीस लोकेश मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले आहे.
नागपूर महानगरपालिकेतील ४४०७ ऐवजदार कर्मचाऱ्यांकरीता शासन निर्णयान्वये सफाई कर्मचाऱ्यांची अधिसंख्य पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या विविध संवर्गातील १७९८१ पदांकरीता शासन निर्णयान्वये आकृतीबंध मंजूर करण्यात आला आहे. सदर आकृतीबंधात सफाई कर्मचा-यांची ८५६० पदे मंजूर करण्यात आली आहेत. यात शासन निर्णयान्वये मंजूर ४४०७ अधिसंख्य सफाई कर्मचाऱ्यांच्या पदांचा समावेश आहे, यासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने गुरुवारी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केले आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त यांनी नागपूर महानगरपालिकेतील अधिसंख्य पदावर सामावून घेण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना लाड पागे समितीच्या शिफारसीनुसार वारसाहक्काचा लाभ देण्यास मान्यता देण्याकरिता प्रस्ताव सादर केला. राज्य सरकारचा हा निर्णय सरकारच्या सफाई कर्मचाऱ्यांप्रति संवेदनशीलतेची प्रचिती देणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच नागपूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र्रातील गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या सन्मानासाठी आणि स्वाभिमानी जीवनासाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे नागपूर महानगरपालिकेतील ४४०७ अधिसंख्य सफाई कर्मचाऱ्यांच्या परिवारात आशेचा नवा प्रकाश निर्माण झाला आहे, अशा शब्दांत नागपूर जिल्हा महानगरपालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष ॲड. राहूल झांबरे, सरचिटणीस लोकेश मेश्राम, मंगेश गोस्वामी, भोलाजी खोब्रागडे, आशीष पाटील व संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.
अनुसूचित जाती जनजातीआयोगाचे उपाध्यक्ष होण्यापूर्वी ॲड. धर्मपाल मेश्राम हे या संघटनेचे अध्यक्ष असतांना पासून ही मागणी युनियनने लावून धरली होती. आज त्याला यश मिळाल्याने ही त्याला अधिक आनंद असल्याचे ही राहूल झांबरे म्हणाले.
……………………………………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
