Advertisements

६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन ः भंते चन्दिमा थेरो, डॉ. राज शेखर वृंडू प्रमुख पाहुणे
-मुख्य सोहळ्यानंतर ‘संविधान’ महानाट्याचा प्रयोग
नागपूर, ता. २९ सप्टेंबर २०२५: तथागताचे धम्मतेज घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माची नव्याने मांडणी करीत धम्मदीक्षा दिली. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतने सामाजिक उत्त्थानाचे नवे पर्व सुरू झाले. त्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा ६९ वा वर्धापन दिन दीक्षाभूमीवर गुरुवारी (ता.२) सायंकाळी ६ वाजता साजरा होणार आहे, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात मंगळवारी (ता.३०) धम्मदिक्षा सोहळयाने सुरवात होणार आहे. पुढील ३ दिवस दीक्षाभूमी परिसरात २२ प्रतिज्ञांसह धम्मदीक्षा सोहळा चालेल. गुरूवारी (ता.२ ) सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळा असून उत्तर प्रदेशातील सारनाथ येथील धम्म लर्निग सेंटरचे संस्थापक अध्यक्ष भदंत चन्दिमा थेरो, चंदीगढ येथील परिवहन व मत्स्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. राज शेखर वृंड्रू असतील. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई असतील.
पत्रकार परीषदेला समितीचे सदस्य सुधीर फुलझेले, डॉ. प्रदीप आगलावे, विलास गजघाटे, एन.आर. सुटे उपस्थित होते.
धम्मदीक्षा सोहळा, धम्मपरिषद –
मंगळवारी (ता.३०) सकाळी ८ वाजतापासून धम्मदीक्षा सुरु होईल. २ ऑक्टोबरपर्यंत स्मारक समिती अध्यक्ष व पूज्य भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्यातफें बौध्द धम्माची दीक्षा देण्यात येईल. दीक्षाभूमीवरील धम्म परिषदेला जपान, मलेशिया, थायलंडच्या प्रतिनिधीसह अखिल भारतीय धम्मसेनेचे सरचिटणिस डॉ. ए. नथीप्रकाशम (तामिलनाडू), जी. पांडीयन, डॉ. भारती प्रभू, के. संपत, अंबुरोज, अंबू धसन, सी. बाबू, मनी, शेट्टी, आनंद वेलू, मगउ पासगा, भंते मौर्य बुध्द, भंते प्रकाश, भंते आर्यब्रम्हा, राहुल आनंद उपस्थित राहतील.
इतिहासाचे स्मरण, बुधवारी ध्वजारोहण –
दीक्षाभूमीवर १९५६ साली बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली, त्यावेळी सकाळी ९ वाजता पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण झाले होते. त्या इतिहासाची आठवण म्हणून सातत्याने ६९ वर्षापासून दीक्षभूमीवर ध्वजारोहण होते. बुधवारी (ता.१) सकाळी ९ वाजता पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण भदंत आर्य सुरेई ससाई यांच्या हस्ते होईल. यावेळी स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहतील. समता सैनिक दलातफें यावेळी मानवंदना देण्यात येईल. गुरूवार, २ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता भदंत ससाई यांच्या उपस्थितीत २२ प्रतिज्ञा व सामुहिक बुध्दवंदना देतील. सायंकाळी ६ वाजता मुख्य सोहळा झाल्यानंतर ‘संविधान’ हे महानाटय सादर करण्यात येईल.
शहरात एकाच वेळी व्हावी बुद्ध वंदना –
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीवर सकाळी १० वाजता महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून त्रिशरण व पंचशील ग्रहण करून धम्मदीक्षा घेतली. त्या प्रसंगाची आठवण म्हणून गुरूवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध वंदना होईल. यावेळी शहरातील सर्व बुद्ध विहारात एकाच वेळी बुद्ध वंदना व्हावी असे आवाहन स्मारक समितीतर्फे करण्यात आले आहे.
………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
