फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजननागपूरातील संगीत क्षेत्रात उद्या घडणार इतिहास

नागपूरातील संगीत क्षेत्रात उद्या घडणार इतिहास

Advertisements
अवघ्‍या चौदाव्‍या वर्षी ‘सुरमयी’ची संगीत भरारी 

– ‘नयी राहों पे…’ या पहिल्‍या अल्बमचे १० ऑगस्ट रोजी होणार विमोचन
– मा. अमृता फडणवीस यांची प्रमुख उपस्‍थ‍िती  
नागपूर, ७७ ऑगस्ट :  नवी पिढी अनेक व्‍यवधानांमुळे भरकटत चाललेली असतानाच संगीत, खेळ आणि शिक्षण अशा तिनही क्षेत्राची आवड असणा-या अवघ्या १४ वर्षीय सुरमयी साठे हिने संगीत क्षेत्रात उत्‍तुंग भरारी घेतली आहे. तिचा पहिला ओरिजिनल म्युझिक अल्बम ‘नयी राहों पे…’ येत्‍या, १० ऑगस्ट रोजी रसिकांच्‍या भेटीला येत असून त्‍याचे विमोचन प्रसिद्ध गायिका व बँकर  अमृता फडणवीस यांच्‍या हस्‍ते हॉटेल सेंटर पॉईंट, रामदासपेठ  येथे होत आहे.
सुरमयी ही फोटोग्राफर, गायक, गिटार वादक व टेनिसपटू सुबोध साठे व इंटेरियर डिझायनर अरुंधती साठे यांची मुलगी असून सेंटर पॉइंट स्‍कूल, दाभाची नवव्‍या वर्गाची विद्यार्थीनी आहे.
वडिलांकडून संगीत आणि खेळाचे बाळकडू मिळालेल्‍या सुरमयीला लहानपणापासूनच संगीताची गोडी होती. पियानो, ड्रम्स, गिटार, हार्मोनिका अशा विविध वाद्यांवर प्रयोग करत ती मोठी झाली आणि तिने आपली स्‍वतंत्र शैली निर्माण केली. प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी, श्रेया खराबे-टांकसाळे, डॉ. मंजिरी वैद्य-अय्यर, श्रीकांत नायडू (वेस्टर्न पियानो), तनुश्री तामस्कर (हिंदुस्थानी गायन) यांच्याकडून वेळोवेळी मिळालेल्‍या मार्गदर्शनामुळे तिच्‍यातील संगीताची जाण अधिक समृद्ध होत गेली.
प्रसिद्ध संगीतकार एहसान नूरानी यांच्याशी लहान वयात परिचय झाल्‍यानंतर ख-या अर्थाने सुरमयीचा संगीत प्रवास सुरू झाला. सुक्ष्‍म निरीक्षणाच्‍या बळावर तिने संगीतनिर्मितीच्‍या वाटेवरच प्रवास सुरू केला आणि तिने सहा गाणी तयार केली. या गाण्‍यांचा अल्बम ‘नयी राहों पे…’ प्रदर्शनाच्‍या मार्गावर असून त्‍याचे संगीत संयोजन आर्यन फडके  या प्रतिभावंत युवा संगीतकाराने केले आहे.
सुरमयी ही राष्ट्रीय स्तरावरील टेनिसपटू देखील असून ऑल इंडिया टेनिस असोसिएशन, एशियन टेनिस फेडरेशनच्‍या विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अभ्यास, खेळ आणि संगीत अशा तिन्‍ही क्षेत्रात उत्‍कृष्‍ट समतोल राखत सुरमयीने गुरूंचे मार्गदर्शन, पालकांचे पाठबळ आणि मेहनत व चिकाटीच्‍या बळावर अगदी लहान वयातच असामान्य उंची गाठली असून तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरली आहे. संगीत क्षेत्रात स्‍वत:ची वेगळी ओळख निर्माण करणा-या सुरमयीची सर्व गाणी surmayee.com या संकेतस्‍थळावर तसेच, विविध समाजमाध्‍यमांवर रसिकांसाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आलेली आहेत.
……………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या