Advertisements

नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नागपूर,२२ जुलै २०२५: शहराच्या सिव्हिल अभियांत्रिकी क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला, जेव्हा शहरातील दोन प्रख्यात स्ट्रक्चरल सल्लागारांना असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअर्स (इंडिया) या राष्ट्रीय संस्थेकडून गौरविण्यात आले. हे पुरस्कार दिनांक २८ जून २०२५ रोजी पुदुच्चेरी येथे एका भव्य समारंभात प्रदान करण्यात आले.
अभियंता सुनील एस. वोडितेल, टेक्चर व्हर्च्युअल डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन चे संस्थापक, यांना स्ट्रक्चरल अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांचे मोलाचे योगदान आणि व्हर्च्युअल डिझाईन व कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील नवोन्मेषी कार्यासाठी “एमिनेंट इंजिनिअर अवॉर्ड” ने सन्मानित करण्यात आले.
अभियंता सतीश एस. रायपुरे, विघ्नहर्ता कन्सल्टिंग इंजिनीअर्स या संस्थेचे प्रमुख सल्लागार, यांना पारंपरिक “नगारा” या वाद्याच्या प्रेरणेने तयार केलेल्या अद्वितीय व भव्य स्टील स्ट्रक्चरच्या डिझाईनसाठी “मेघ स्टील्स पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हे आकर्षक स्ट्रक्चर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे बांधण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या भटके व वंजारी समाजाच्या सांस्कृतिक संग्रहालयाचा भाग आहे.
हे पुरस्कार पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या गौरवामुळे नागपूरचे नाव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले असून, अभियांत्रिकी क्षेत्रात नागपूरच्या तळपत्या योगदानाची पुनःप्रत्ययाची प्रचिती मिळाली आहे.
…………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
