फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहसूल विभाग,मनपाप्रमाणेच नासुप्रच्या जागा ‘फ्री होल्ड’ करा 

महसूल विभाग,मनपाप्रमाणेच नासुप्रच्या जागा ‘फ्री होल्ड’ करा 

Advertisements
आमदार प्रवीण दटके यांची विधान सभेत मागणी

अधिवेशन संपायच्या आत निर्णय देण्यात यावे
नागपूर,ता.१० जुलै २०२५: शासनाच्या महसुल विभागाने नझुलच्या जमीनी फ्री होल्ड केल्या आहेत. महापालिकेने आपल्या ताब्यातील जागा दोन टक्के आकारून फ्री होल्ड केल्या असून ,त्याच धर्तीवर नागपूर सुधार प्रन्यासने देखील त्यांची मालकी असलेल्या आणि लीजवर नागरिकांना दिलेल्या जागा ‘फ्री होल्ड’ करण्याबाबत भूखंड धारकांकडून मागणी होत असल्याचे भाजपचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी आज विधान सभेत केली.
नागपूर सुधार प्रन्यासच्या जागा फ्री होल्ड झाल्यामुळे नागपूर शहरातील पन्नास हजार कुटुंबांना  लाभ होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी शासनाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे व सातत्याने पाठपुरावा सुरु आहे.
मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री यांना लिहिलेल्या पत्रात लोकप्रतिनिधींनी नागपूर शहरातील दोन नियोजन प्राधिकरणांच्या वेगवेगळ्या कार्यपध्दतीकडे लक्ष वेधले आहे. राज्य सरकारने नझुलच्या जागांची मालकी, जनतेला देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापालिकेनेही निर्णय घेतलेला असताना नासुप्रबाबतही असा निर्णय होणेबाबत तीव्र मागणी होत आहे.
नागपूरच्या जनतेला मनपाचा मालमत्ता कर आणि नासुप्रचा भूभाटक कर असे वेगवेगळे कर भरावे लागत आहेत. एकाच शहरात दोन नियोजन प्राधिकरण असल्याने करांचा गोंधळ होत आहे.  नासुप्रची जमीन भाडेपट्टीवर घेतलेले किमान ५० हजार कुटूंब नागपुरात आहेत. त्यांच्याकडून शासकीय नियमानुसार निधी घेऊन, त्यांचे प्लॉट फ्री होल्ड करून नागरिकांना दिलासा देणे कामे शासनाने कार्यवाही शासनाने अधिवेशन संपायच्या आत कार्यवाही करावी अशी विनंती आमदार प्रवीण दटके यांनी केली
५५ हजार ७१९ भूखंडाचा प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाला असून शासनाच्या विचाराधीन आहे, लवकरच प्रस्तावाला मान्यता देणार असल्याचे राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी आश्वासित केले.
……………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या