Advertisements

‘वाड्यावर’विरोधी पक्षाच्या उमेदवारांची नावे ठरतात का?यावर उत्तर देणे टाळले

नागपूर,ता.२८ जून २०२५: Supriya Sule समृद्धी महामार्गाचा तीव्र विरोध राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.शेतक-यांच्या विरोधातील हा प्रकल्प होऊ देणारच नाही,अशी भूमिका त्यांनी घेतली होती मात्र,भूमिपूजन झाल्यानंतर विरोधी पक्षांचा विरोध का मावळतो?भूमिपूजन हाेईपर्यंतच विरोधकांचा विरोध प्रकल्पांना का असतो?भूमिपूजन होईपर्यंत पडद्या मागे नेमकं काय गौलबंगाल घडतं?असा प्रश्न महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना पडत असतो तसेच खासगीत देखील कुजबजल्या जात असतो,या विषयी प्रश्न केला असता,एकमेव समृद्धी महामार्ग सोडला तर आम्ही कधी,कोणत्या प्रकल्पाला विरोध केला याचा डेटा आहे का,आम्ही समृद्धीचा विरोध यासाठी नंतर केला नाही, कारण समृद्धीसाठी जमीन हस्तगत करण्याचा फॉमुला सरकारने बदलला तसेच,शेतक-यांना नुकसान भरपाईचा निधी वाढवून दिला,त्यामुळे आमचा विरोध मावळला असे उत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.त्या प्रेस कल्ब येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.पत्रकार जेव्हा आमच्यावर आरोप करतात तेव्हा आम्ही कोणकोणत्या प्रकल्पाला विरोध केला,त्यांनी डेटा ठेवावा,असा अनाहूत सल्ला ही त्यांनी याप्रसंगी दिला.केदार कुटूंबातील एका सदस्याच्या लग्न सोहळ्यासाठी त्या नागपूरला आल्या होत्या.
शक्तीपीठ महामार्गाला तुमचा पक्ष विरोध करीत आहे,समृद्धीसारखाच भूमिपूजन झाल्यानंतर तो मावळणार का?असा प्रश्न केला असता,शक्तीपीठ महामार्गाला विरोध हा फक्त आमच्या पक्षाचा नसून सरकारच्याच वित्त विभागाने जो अहवाल दिला आहे ,जे सगळे आक्षेप या महामार्गाला घेऊन त्यांनी नोंदवले ,ते सगळे प्रसिद्धी माध्यमात देखील उमटले आहे.हे सरकार कोणाचे आहे?हे तुम्हाला देखील माहिती असल्याचे त्या म्हणाल्या.तुमच्या पक्षाची भूमिका शक्तीपीठ महामार्गाला घेऊन काय आहे?असा प्रश्न केला असता,जे आक्षेप व निरीक्षण वित्त मंत्राल्याने नोंदवले आहे ते अत्यंत गंभीर आहेत कारण ते सरकारचे आक्षेप आहे आणि हा सरकारचाच प्रकल्प आहे.
शक्तीपीठविषयीचे आक्षेप त्याच सरकारच्या वित्त विभागाच्या अधिकृत माध्यमातून आले आहे.परवा मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर सविस्तर नोट मंत्रीमंडळातील मंत्र्यांना वितरीत झाली,ज्याची नोंद सर्व प्रसार-प्रचार माध्यमांनी घेतली आहे.ज्यात चार मोठे आक्षेप आहे त्यात पहीला आक्षेप हा शेतक-यांच्या भूमि अधिग्रहणाचा आहे,ज्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी व अनेक नेते रस्त्यावर उतरतात आहेत.वित्त विभागानेच आक्षेप घेतला आहे की कर्ज घेताना तो ६.३५ टक्क्यांनी घेता या प्रकल्पासाठी तो ८.८० टक्क्यांनी का?अडीच टक्क्यांचं अंतर आहे.याशिवाय अंदाजे हा प्रकल्प ८३ हजार ३०० कोटींचा असून याच दराने हा प्रकल्प झाला तर अर्थसंकल्पातील २२ टक्के रक्कम ही फक्त रि-पेमंटमध्ये जाईल.यातील सर्वात गंभीर बाब म्हणजे माजी पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी यांनी राज्यांच्या विकास प्रकल्पांसाठी जो ‘एफआरबीएम’ म्हणजे फिक्सल मॅनेजमेंट एक्ट गर्व्हमेंट ऑफ इंडिया, हा कायदा तयार केला त्यात आणखी सुधारणा पंतप्रधान मनमाहेन सिंग यांनी केली व फिक्सल मॅनेजमेंट हे तीनच्या खाली ठेवा,त्यावर जाऊ देऊ नका,असा कायदा केला.त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग जर महाराष्ट्र सरकारने केला तर एफआरबीएम कायद्यालाच केराची टोपली दाखवली जात असल्याची टिका त्यांनी केली.या महामार्गामुळे फिक्सल मॅनेजमेंट चार ते साढे चार टक्क्यांवर जाईल जे केंद्र सरकारच्या नियमांच्या बाहेर आहे हा अहवाल आमचा नसून सरकारच्या वित्त विभागाचाच अहवाल आहे,असे त्या म्हणाल्या.
दूसरीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाला विरोध करीत आहे कारण ८६ हजार हेक्टरच्या वर या प्रकल्पात शेतजमीन जात असून, यातील बहूतांश बागायती शेती असल्याचे सुळे म्हणाल्या.मी जरी सत्तेत असते तरी माझं हेच मत असतं कारण एखाद्या प्रकल्पासाठी राज्याच्या फिक्सल मॅनेजमेंटमध्ये तसेच राज्यच दिवाळखोरीकडे जाईल का?ही शंका सरकारच्या वित्त विभागानी अहवालात नमूद केली आहे.हे प्रश्न मी उपस्थित केले नसून सरकारच्याच वित्त विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारच्याच दोन पक्षांची वेगळी मतं या प्रकल्पाविषयी आहे,विरोधकांची नव्हे.
समृद्धी महामार्गाचा विषय वेगळा आहे आणि शक्तीपीठ महामार्गाचा विषय वेगळा आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे प्रकल्प करतात त्यांना आम्ही पूर्ण ताकदीने समर्थन करतो.त्यामुळे ठराविक प्रकल्पांना विरोध करतो हे आमच्यावरील आरोप द्यादांत खोटे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या मूळ प्रस्तावनेत नसलेले मात्र,आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संविधानाच्या प्रस्तावनेत आणिबाणिच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी समाविष्ट केलेल्या ‘धर्मनिरपेक्ष’व ‘समाजवाद’काढून टाकण्याचे विधान याकडे लक्ष वेधले असता,लोकसभेच्या वेळी पण भाजपच्या दोन जबाबदार नेत्यांनी ‘अब की बार चार सौ पार,बदलेंगे संविधान‘चा नारा देऊन संविधान बदलणार असल्याची वल्गना केली होती,हे संविधान जसं आहे तसंच आहे,संविधानावर चर्चा करण्याचे फोरम फक्त संसद आहे,देशामध्ये इतरही आव्हाने आहेत,काश्मीरमधील कलम ३७० निरस्त करताना आम्ही सोबत होतो.भाजपचे वरिष्ठ नेते स्व.अरुण जेटली नेहमी सांगत असत,‘तुम्ही दाखवणं बंद करा ते बाेलणं बंद करतील’सशक्त लोकतंत्रात प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मात्र,संविधान हेच सर्वश्रेष्ठ आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचा आढावा,यावर प्रश्न केला असता,अद्याप निर्णय प्रक्रिया सुरु झाली नाही,उमेदवारांची निवड झाली नाही फक्त बैठक घेऊन स्थानिकांची मते जाणून घेतली.निवडणूक येईल तेव्हा बघू.
‘लाडकी बहीण’योजनेत सरकार बहीणींची फसवणूक करत आहे का?असा प्रश्न केला असता,मी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवते कारण ते फार जबाबदार पदावर आहेत.ते म्हणाले होते,शेतक-यांची कर्ज माफी करु तर ते सरसकट कर्ज माफी करतील,असा टोला त्यांनी हाणला.
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मद्याच्या प्रश्नावरुन सामाजिक समस्या निर्माण झाल्या असून, महिलांचे जीवन प्रभावित होत आहे,अनेक महिला या पतीच्या व्यसनाधीनतेमुळे विधवा झाल्या,इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात देखील दारु बंदी झाली पाहिजे का?असा प्रश्न केला असता,माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी यावर क्रांतीकारक धोरणे राबवली होती.ग्रामपंचायतीस्तरापर्यंत त्यांनी दारुबंदीचे अधिकार स्थानिक महिलांना दिले होते,अशी आठवण त्यांनी करुन दिली.
राज्यात हिंदी भाषा ही पहीलीपासून तृतीय भाषा म्हणून शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे,याकडे लक्ष वेधले असता,मी स्वत: पाचवी पासून तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकले आहे.माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे पुस्तकांचे ओझे हलके करण्याचा निर्णय राबवला होता.माध्यमांमध्येही त्याचे फार कौतूक झाले होते.गुजरात,आंध्र,तमिळ,केरळ,कर्नाटक सारख्या राज्यात हिंदी सक्तीची नाही मग महाराष्ट्रात ती लागू करण्यामागे काय उद्देश्य आहे?असा प्रश्न त्यांनी केला.‘ये आपको किसी की साजिश लगती है क्या?’असा प्रश्न केला असता,’मै खुद साजिश नही करती,मेरा दिमाग इससे दूर है’असे दिलखुलास उत्तर त्यांनी दिले.
नुकतेच अदानी यांनी नागपूरातील भाजपचे आमदार,खासदार असलेले मेघे ग्रुप्ससोबत भागीदारी केली आहे,परिणामी या पुढे आता गरीब रुग्णांना मेघे रुग्णालयांमध्ये नि:शुल्क उपचार मिळतील का?असा प्रश्न केला असता,मुख्यमंत्री आज नागपूरात आहेत,हा प्रश्न त्यांनाच करने योग्य आहे,असे त्या म्हणाल्या.
रोहीणी खडसे यांनी आंदोलनादरम्या चपलेचा हार घातला,याचे तुम्ही समर्थन करता का?असा प्रश्न केला असता,त्या आमच्या पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा आहेत त्यामुळे त्यांच्या कृतीला विरोध असण्याचे कारणच नाही,त्यांच्या या ही कृतीला मला ‘मम्’म्हणावेच लागेत,असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
तुमच्या पक्षात ’इनकमिंग’ची चर्चा आहे,यावर बाेलताना,आज राज्यामध्ये जे काही चालले आहे ते बघता इनकमिंगची आता भीती वाटायला लागली आहे,अशी मिश्किली त्यांनी केली.एकेकाळी भाजप हा अतिशय सुसंस्कृत पक्ष होता.सुषमा स्वराज या आमच्यासारख्या विरोधी पक्षाच्या खासदारांसाठीही हिरो होत्या,प्रेरणादायी होत्या,दूर्देवाने भाजप आता पहील्यासारखी राहीली नाही.‘माल तो वही है पॅकेजिंग बदल गई’असा टोला त्यांनी हाणला.आमच्याकडून ही काही चूका झाल्या हे आम्ही मान्य करतो,अशी स्पष्टोक्ती त्यांनी दिली.
राज्यात प्रभावी विरोधी पक्षच राहीले नाही,नागपूरातील कायकर्तेच आता खासगीत बोलतात विरोधी पक्षाचे आमदार,नगरसेवक हे ‘वाड्या’वरुन ठरतात,व ज्यांना निवडून आणायचं असतं त्यांच्या विरोधात भाजप कमकुवत(डमी)उमेदवार उभे करतात,या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.
(बातमीशी संबंधित व्हिडीयो Sattadheesh official युट्यूब चॅनलवर उपलब्ध)
…………………………………………….
Advertisements

Advertisements

Advertisements
