फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्र्याचा नागपूरात हगवणे भाग -२!

मुख्यमंत्र्याचा नागपूरात हगवणे भाग -२!

Advertisements

भाजप आमदाराच्या कुटूंबातील सुनेचा परिणय फूके कुटूंबियांवर गंभीर आरोप

फडणवीसांच्या पोलिस विभागाची करामात: तक्रारीवर कारवाई करण्या ऐवजी पिडीतेलाच पाठवले शेकडो सूचनापत्र

लग्नापूर्वीच किडनीचा गंभीर आजार फूके कुटूंबियांनी लपवला!३४ वर्षीय प्रिया फूकेंची व्यथा! 

संकेत फूकेंचा मृत्यू होताच दोन चिमुकल्यांसह फ्लॅट व संपत्तीतून केले बेदखल

सूनेवर केला खोटा अट्रासिटीचा गुन्हा दाखल!

सुषमा अंधारे, रोहिणी खडसे यांची नागपूरात पत्रकार परिषद

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांवरही घणाघात

नागपूर,ता.२८ मे २०२५: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पिंपरी -चिंचवड येथील मुळशीच्या हगवणे कुटूंबियांची धाकटी सून वैष्णवी हगवणे यांच्या काैटूंबिक हिंसाचारातून हत्या किंवा आत्महत्येचे प्रकरण प्रचंड गाजत आहे.दररोज नवनवे हगवणे कुटूंबियांचे कारनामे माध्यमाद्वारे समाेर येत आहे.संपूर्ण राज्यातीत जनमानसात हगवणे कुटूंबियांच्या धन लोलुपतेच्या हव्यासातून, वैष्णवी या अवघ्या २४ वर्षीय सूनेसोबत करण्यात आलेले क्रोर्य याविरुद्ध प्रचंड रोष आहे.याच श्रृंखलेत आज राज्याची उपराजधानी नागपूरात एका मोठ्या सत्ताधारी राजकीय कुटूंबात घडलेला कौटूंबिक अत्याचार व सत्तेच्या आश्रयातून गेल्या दीड वर्षांपासून न्यायासाठी संघर्षरत असलेल्या पिडीतेचे प्रकरण, आज सकाळी शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारेशरद पवार गटाच्या राज्य महिला अध्यक्षा रोहीणी खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन समोर आणले.मुख्यमंत्री यांच्याच मतदारसंघातील आमदार तसेच त्यांचे अत्यंत विश्‍वासू समजले जाणारे भाजपचे आमदार परिणय फूके यांच्या कुटूंबातील धाकटी सून प्रिया फूके यांनी आज माध्यमांसमोर आपली व्यथा मांडली.

याप्रसंगी बोलताना प्रिया यांनी सांगितले की,मागील दीड वर्षांपासून न्यायासाठी लढतेय.राजकीय पाशर्वभूमी असणा-या भाजपचे आमदार परिणय फूके यांच्या घराण्यातील मी धाकटी सून असून माझं लग्न त्यांचे धाकटे भाऊ संकेत फूके यांच्यासोबत २०१२ साली झालं.२०२२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.लग्ना पूर्वी संकेत यांना किडनीचा गंभीर आजार असल्याचे फूके कुटूंबियांनी आमच्यापासून लपवले.लग्नाच्या दोन वर्षापूर्वीच संकेतचे किडनी ट्रांसप्लान्ट झाले होते ,लग्नानंतर मला संकेतच्या आजाराविषयी कळल्यावर मी त्यांना जाब विचारला.त्यावेळी फूके कुटूंबियांनी मला धमकावले,तू जर हे बाहेर बोललीस तर तुझ्या माहेरचे कुटूंबिय आम्ही अडचणीत आणू आणि तुला ही महागात पडेल.मला फार घाणेरड्या शब्दात,नीच स्तरावर जाऊन त्यावेळी धमक्या देण्यात आल्या.तुझ्या घरी माणसे पाठवून बलात्कार घडवून आणू,इथपर्यंत धमकी देण्याची त्यांची मजल गेली होती.
पण,मी नियतीचा हा खेळ स्वीकारुन संसाराला पुढे गेले.माझ्या आईचे संस्कार आहे जे पदरात पडलं त्याला गोड मानून घेणे.मला दोन मुले झाली.अचानक संकेतला लंग्स ट्रांसप्लान्टची गरज भासली,त्यांना मुंबईत उपचारासाठी घेऊन गेले असता,संक्रमण होऊन त्यांचा मृत्यू झाला.यानंतर माझ्या संसाराचे चित्रच पालटले.मला ही मारुन टाकण्याचा धमक्या देण्यात येऊ लागल्या! जेव्हा मी संकेतशी संबंधित संपत्तीच्या कारभाराविषयी प्रश्‍न विचारु लागले.हे सगळं करण्याची गरज काय,आपण एकसोबत एकाच घरात तर राहतोय,असे मी बोलले तेव्हा,हे प्रश्‍न करण्याचा तुझा अधिकार काय?तू होते कोण?अश्‍या शब्दात मला सासरे रमेश फूके यांच्याकडून उत्तर मिळाले.
संपत्ती संबंधी माझ्या प्रश्‍नामुळे फूके कुटूंबातील पुरुषांमधील पुरुषी अहंभाव दूखावला गेला आणि रात्रीच्या साढे दहा वाजता त्यांनी मला माझ्या लहान-लहान मुलांसोबत घराबाहेर काढले!मी गेल्या दीड वर्षांपासून आपल्या माहेरी राहत असून, न्यायासाठी नुसती अंबाझरी पोलिस ठाण्याच्या चकरा मारत आहे.मी अनेक तक्रारी दिल्या,गुंड प्रवृत्तीचे काही लोक सतत हातातील बॅगेत शस्त्र घेऊन माझा पाठपुरावा करीत असतात.आज ही पत्रकार परिषदेत दोन अनोळखी माणसे इथपर्यंत माझ्या मागावर होती,असा धक्कादायक आरोप प्रिया फुके यांनी केला.माझ्यावरच ॲट्रासिटी,खंडणीसह इतर अनेक गुन्हे माझ्यावरच दाखल करण्यात आले आहे.रमेश फूके व रमा फूके या माझ्या सासरे व सासू यांनी माझ्या मुलांचा ताबा मागितला असून यासाठी न्यायालयात खटला दाखल केला आहे!
मी जिवंत असताना आजी-ओजाबा म्हणून ते कसे काय माझ्या लहानग्यांचा ताबा मागत आहे?असा सवाल प्रिया यांनी केला.मी तर माझा हक्क मागतेय.फूके घराण्याची सून म्हणून माझा व मुलांचाही त्यांच्या संपत्तीत वाटा आहे.मात्र,साम,दाम,दंड,भेदाच्या नीतीतून माझा आवाज यंत्रणांना हातात घेऊन दाबला जात आहे,असा गंभीर आरोप याप्रसंगी प्रिया फूके यांनी केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन ते चार वेळा मी जाऊन भेटले,आमचं जे हक्काचं आहे त्याची कागदपत्रे देखील मी त्यांना दिली आहे.त्यांच्या व्हॉट्स ॲपवर देखील मी अनेकदा पाठपुरावा केला मात्र,त्यांनी फक्त ‘बघतो’या आश्‍वासना पलीकडे कोणतीही कृती केली नाही.वाईट याचंच वाटतं त्यांना सत्य परिस्थिती माहिती असताना देखील कोणतीही कृती का केली नाही! मी महिला आयोगाला देखील तक्रार नोंदवली आहे मात्र,महिला आयोगाने देखील मला आतापर्यंत मदत केली नाही.माझी तक्रार घेण्यासाठी मला माझ्या दोन लहान-लहान मुलांसह अंबाझरी पोलिस ठाण्यात चार-चार दिवस सकाळी नऊ वाजे पासून तर रात्रीच्या दहा वाजेपर्यंत बसवून ठेवण्यात आले.त्यांनी हा विचार करायला हवा,माझी मुले लहान आहेत.त्यांची शाळा,परिक्षा,आजारपण असतात तरी मला दिवस-दिवसभर बसवून ठेवतात.
इतकंच नव्हे तर फूके कुटूंबिय मला धमकावतात पोलिस प्रशासन किवा न्याय व्यवस्था आम्ही विकत घेऊ शकतो.तुझा आवाज लोकांपर्यंत पोहोचणार नाही,तू वीस वर्ष जरी कोर्टात लढत राहीली तरी तुझी केस आम्ही बोर्डावर येऊ देणार नाही!अक्षरश: या स्तरावर येऊन माझी कुचंबना सुरु आहे,त्यामुळेच मी माध्यमांसमोर येऊन आपली व्यथा मांडत असते.अपेक्षा आहे तुमच्या माध्यमांतून मला व माझ्या मुलांना न्याय मिळेल,अशी अपेक्षा प्रिया यांनी व्यक्त केली.
आम्ही प्रियाच्या माध्यमांना दिलेल्या बाईट्स जेव्हा बघितल्या त्यावेळी त्यांनी हाच सवाल केला की वैष्णवी हगवणेसारखेच माझ्यासाठीही कोणीतरी उभं राहील का?त्यामुळे आम्ही तिच्या मदतीसाठी नागपूरात आलो असल्याचे रोहीणी खडसे यांनी सांगितले.आम्ही कोणतेही पक्षीय राजकारण करण्यासाठी नव्हे तर प्रिया हिच्या न्यायाच्या लढ्यात तिला आमची बहीण समजून साथ देण्यासाठी आलो असल्याचे रोहीणी सांगतात.ती एकटी नाही.मूळात राज्यातील अनेक पिडीतांना त्यांच्यावरील कौटूंबिक हिंसाचाराविरोधात व अन्याया विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून पडतंय.पोलिस विभाग पिडीतांच्या तक्रारीच दाखल करण्यासाठी धजत नाही.प्रिया हिला एक दहा वर्षाचा मूलगा व आठ वर्षांची मुलगी आहे,आम्हाला देखील मुले आहेत त्यामुळेच एक स्त्री म्हणून,एक आई म्हणून आम्ही तिच्या न्यायाच्या लढ्यात तिला साथ देण्यासाठी तसेच तिच्या मुलांचा अधिकार तिला मिळावा यासाठी आम्ही नागपूर गाठले,असे रोहिणी यांनी सांगितले.एक महिला जेव्हा खूप त्रासदायक अडचणीतून जात असते,एक महिला म्हणून आम्हाला तिच्या त्या अडचणींची जाणीव आहे.सरकारने प्रिया फुके या ‘लाडकी बहीणीला’ देखील न्याय देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन याप्रसंगी रोहीणी खडसे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की,नागपूरकरांना प्रियासोबत काय घडतंय हे ब-यापैकी माहिती आहे तरी देखील मी प्रिया यांचं आमदार परिणय फूके यांच्यासोबतचं कायदेशीर नातं सप्रमाण दाखवते,असे सांगून त्यांनी प्रिया व संकेत यांच्या लग्नाची पत्रिका,विवाह नोंदणी प्रमाणपत्र,फूके कुटूंबियांसोबत दहा वर्षांतील सुख-दु:ख,आनंदाच्या प्रसंगाची छायाचित्रे माध्यमांना दाखवली.हे प्रेम प्रकरणाचं प्रकरण नाही किवा माझं लग्न मान्य होत नाही,असे प्रकरण नाही.विधिवत देव,ब्राम्हण,अग्निच्या साक्षीने,नातेवाईकांच्या आर्शिवादासह प्रिया व संकेत यांचं लग्न झालं होतं.हे एक अतिशय आनंदी कुटूंब होतं.मात्र,लग्नाच्या आधी संकेतचं गंभीर आजारपण फूके कुटूंबियांनी प्रियाच्या कुटूंबियांपासून लपवलं.तरी देखील विवाह हा पवित्र संस्कार मानून प्रिया यांनी आजारी असलेले संकेत यांच्यासोबत त्यांच्या मृत्यूपर्यंत संसार केला.त्यांच्या मृत्यूच्या प्रमाणपत्रावरही प्रियाचं नाव पत्नी म्हणून आहे.इतकं सगळं होऊन देखील प्रिया ही फूके कुटूंबियांसोबत त्यांच्या आधाराने राहण्यास तयार आहे.
मात्र,प्रिया सोबत राहीली तर संपत्तीची ती वाटेकरी होऊ शकते या भीतीतून तिला तिच्या मुलांसह रात्रीच्या साढे दहा वाजता घराबाहेर काढण्यात आलं,असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.फार संघर्ष केल्यानंतर प्रिया हिने १४ ऑक्टोबर २०२२ रोजी अंबाझरी पोलिस ठाण्यात पहीली तक्रार नोंदवली.यात २९४,३२३,५०४,५०७,४९८ या कलमा लावण्यात आले आहे.२०२२ मध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरवर अंबाझरी पोलिस ठाण्यातील अधिका-यांनी कोणतीही पुढील कारवाई केली नाही,तक्रारीत दाखल आरोपींना चौकशीसाठी बोलावले नाही.ही सगळी माणसे आजपर्यंत अत्यंत मजेत बाहेर आहे!
४९८ चीतक्रार दाखल असताना ही महिला आयोगाने १९९४ सालीच सांगितलं आहे की आम्ही सू-मोटो दिलं आहे.पोलिसांना कदाचित सू-मोटोचा अर्थच कळत नसावा की त्यांना या कलमांतर्गत स्वत: पुढाकार घेऊन चौकशी करायची आहे,गुन्हा दाखल करायचा आहे,शिक्षा मिळवून द्यायची आहे.१९९३ साली ज्यावेळी आपल्याकडे महिला आयोग आला त्याचवेळी महिला आयोगाने कलम १३,१४ व १६ चे संरक्षण करण्याची सूचना यंत्रणेला केली आहे.२०२२ पासून राज्याचे गृहमंत्री व मुख्यमंत्री व निवडणूकीच्या आधीचे लाडके भाऊ,देवा भाऊ यांना प्रियाने पत्र दिले आहे.हा पत्र व्यवहार चार वेळा झाला,काहीच कारवाई त्यांनी केली नाही.
प्रियाने पोलिस आयुक्तांना देखील पत्र लिहले.पोलिसाचं तर‘ सद्ररक्षणाय खलनिग्रणाय’हे ब्रिद वाक्यच आहे पण अलीकडच्या काळात पोलिस दूर्जनांना सोडून सज्जनांच्याच पाठी लागली असल्याचा टोला त्यांनी हाणला.१६ जुलै २०२२ रोजी पोलिस निरीक्षकांकडे प्रियानी तक्रार दाखल केली.महिला आयोगाने सांगितलं प्रत्यक्ष भेटा.महिला आयोगाच्या अध्यक्षा या तर पक्षाच्या कार्यक्रमातच व्यस्त असतात व व्यासपीठावरच दिसतात त्यामुळे दोन लहान मुलांना घेऊन प्रिया यांनी चाकणकरांच्या मागे पुणे गाठावे की मुंबई?असा सवाल अंधारे यांनी केला.
या पिडीतेला न्याय देण्यापेक्षा अंबाझरी पोलिस यांनी पिडीतेलाच अनेक समजपत्र देण्याचा चमक्कार घडवला.३० डिसेंबर २०२४ रोजी पोलिस ठाणे अंबाझरी इथे दिलेला अर्ज निकाली काढण्याबाबत समजपत्र!पोलिस स्वत: कसे निकाली काढू शकतात?प्रकरण कोर्टात तर जाऊ द्या,सुनावणी होऊ द्या,पुरावे तर तपासू द्या,निकाल तर लागू  द्या,पोलिसच प्रकरण निकाली काढण्यासाठी दबाव आणणार का?असा सवाल अंधारे करतात.१३ जानेवरी २०२५ रोजी प्रिया यांना दिलेल्या सूचनापत्रात सायबर गुन्हे नागपूर येथे प्रिया विरोधात तक्रार आल्याने त्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी बोलावण्यात आले.२४ ऑक्टोबर २०२४ रोजी मनीष अशोक राऊत यांच्या तक्रारीवर प्रिया यांना सूचनापत्र देण्यात आले.
अर्जदार राऊत राहत असलेल्या फ्लॅटमध्ये परिणय अर्पाटमेंट,पहीला मजला,फ्लॅट क्र.१४४,हिल टॉप अंबाझरी नागपूर येथे प्रिया यांनी घूसून त्या फ्लॅटमध्ये मुलांसह त्या राहत होत्या असे सांगून सामानाची फेकफाक केली व धमकावले,असे नमूद होते!पोलिसांनी थोडा तरी हे सूचनापत्र देताना विवेक वापरला का?मयुरी हगवणे यांनी दिलेल्या तक्रारीत देखील तेथील पोलिसांनी असाच विवेक वापरला होता,असा टोला त्यांनी हाणला.

ते प्रियाचं घर होतं,त्या फ्लॅटमधून प्रिया यांना मुलांसह हूसकावून लावत चुकीचा माणूस फूके कुटूंबियांनी ठेवला आहे, त्या माणसाला विनंती करायला प्रिया जेव्हा जाते की हे माझे घर आहे,यावर पोलिस शहानिशा न करता,तुम्ही त्यांच्या घरात घसूला असे त्याच माणसाच्या तक्रारीवरुन प्रिया यांना पोलिस सूचना पत्र देतात?प्रिया हिला किती समज पत्र पोलिसांनी दिली,यातील एक तरी समजपत्र पोलिसांनी फूके कुटूंबियांना दिली असती तर ते त्यांच्या कर्तव्याला शोभणारं होतं,असा टोला त्यांनी हाणला.
३ जानेवरी २०२५ रोजी पुन्हा पोलिसांनी प्रियाला समजपत्र पाठवलं.सत्ता,पैसा,माज,,मनुष्य बळ,मनगट बळ त्यांच्याकडे असताना एका विधवेची किती थट्टा करावी?तिला सहा-सात धडाधड समज पत्र द्यावी याचा अर्थ पोलिस कोणाच्या इशा-यावरुन हे विवेकशून्य कार्य करत आहे?तिच्या एफआयआरवर कारवाई न करता ’पुढील चौकशी करीता’या सबबीखाली प्रियाला इतंक बेजार करण्यात आलं की तिने न्याय मागण्याचा हट्टच सोडला पाहिजे.इतकंच नव्हे तर १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलिसांनी प्रियाला सूचना पत्र पाठवून सासरच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीच्या संदर्भात पुरावे सादर करण्यास सांगितले.पोलिसांना भाजप आमदार फूके कुटूंबातील लग्न माहितीच नाही का?इतके साधेभोळे नागपूरचे पोलिस आहेत का?चार-चार पानांचं सूचना पत्र लिहण्यासाठी पोलिसांना वेळ असतो.पोलिस असा दबाव आणतात,अश्‍यावेळी महिला आयोगाकडे प्रिया यांच्या या इतक्या गंभीर तक्रारीकडे लक्ष द्यायला वेळ नाही?
हिंदू कोड बिलनुसार नव-याच्या संपत्तीत बायकोचा अधिकार आहे,तरी देखील तिला तिचा न्याय हक्क देण्या ऐवजी पोलिस जर प्रियावर सतत वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकत असतील व त्यातही महिला आयोगाला याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज वाटत नसेल तर न्याय कोणाकडे मागायचा?महिला आयोगाकडे प्रिया यांनी एकूण सात वेळा पत्र लिहलं आहे,यात कश्‍याप्रकारे पोलिस आणि यंत्रणा कश्‍याप्रकारे एका विधवा महिलेला त्रास देत आहे याचे सखोल विवरण दिले आहे तरी देखील याच्यात महिला आयोगाने काहीही लक्ष दिले नाही.कारण ही बाब सत्ताधा-यांच्या कुटूंबातील पिडीत महिलेची बाब असल्यानेच याकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा थेट आरोप याप्रसंगी सुषमा अंधारे यांनी केला.जर महिला आयोग व सत्ताधारी ,सत्ताधारी आमदाराच्या कुटूंबातील महिलेला न्याय देऊ शकत नसेल तर बाहेरच्या सर्वसामान्य महिलांना कोणता न्याय देणार?नुसती लाडकी बहीणीची जाहीरात ही उपयोगी नसल्याचा टोला त्यांनी हाणला.
नुकतेच २२ मे २०२५ रोजी परत एकदा प्रिया यांना चौकशीला बोलावले.मुलांना सोडून फक्त पोलिस ठाण्यात पळायचं एवढंच काम प्रियाकडे आहे का?६ एप्रिल २०२५ रोजी आणखी एक गंभीर तक्रार प्रियाने पोलिसांत नाेंदवली.ही तक्रार विनयभंगाच्या संदर्भात होती.वैष्णवी हगवणे प्रकरणातील वैष्णवी हिची जाऊ मयुरी हगवणे हिने देखील महिला आयोगात तक्रार दाखल केली होती ज्यात तिचा सासरा व दिर वाईट नजर ठेवीत असून चुकीच्या पद्धतीने स्पर्श करीत असल्याचा उल्लेख होता.त्या अर्जावर महिला आयोगाने लक्ष देण्याची नितांत गरज होती मात्र त्याही प्रकरणामध्ये महिला आयोगाने चक्क दुर्लक्ष केले.अश्‍या गंभीर तक्रारींवर तडजोड होऊच शकत नाही.भांडणे मिटू शकतात मात्र,लैंगिक छळ हा विसरता येत नाही.
१२ मे २०२५ रोजी प्रिया हिच्या बेडरुममध्ये येऊन तिच्या परवानगीशिवाय तिचा व्हिडीयो काढणा-याच्या व जवळ येऊन चुकीचा स्पर्श करणारा शुभम गजभिये याच्या विरोधात प्रिया हिने तक्रार देताच, शुभम गजभियेच्या तक्रारीवर प्रिया फूकेंवर ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल होतो आणि पोलिस  गुन्हा दाखल करुन घेतात?सोलापूरमध्ये भाजपच्याच देशमुख नावाच्या जिल्हाध्यक्षांच्या विरोधात निर्मला यादव यांनी तक्रार नोंदवली.निर्मला यादव यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला!रिंकी वत्सलाने भाजपचे आमदार राहूल शेवाळे यांच्या विरोधात तक्रार केली,रिंकीच्या विरोधात ॲट्रोसिटीची तक्रार नोंदवल्या गेली.करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या विरोधात तक्रार केली व आता प्रिया फूके यांनी शुभम गजभियेच्या विरोधात तक्रार केली,यांच्याही विरोधात पोलिसांनी ॲट्रासिटीचा गुन्हा नोंदवला.याचा अर्थ पोलिसांचाच, विश्‍वरत्न डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या समान वागणुकीचा अधिकार व सन्मानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असून त्यामुळेच न्यायालयात ९० टक्के ॲट्रासिटीचे गुन्हे हे खोटे ठरतात व या कायद्याची विश्‍वाहर्ता संपते.पोलिसांनाच ते हवे आहे,असा थेट आरोप अंधारे यांनी केला.कलम १७ बोथट करण्यासाठी राज्यकर्ते किती वाईट पद्धतीने याचा वापर करतेय,प्रियावरील लागलेला ॲट्रासिटीचा गुन्हा हे सिद्ध करतं.
आम्हाला पक्षीय राजकारणाशी घेणे देणे नसून आम्ही फक्त प्रिया हिला तिचा अधिकार देण्यासाठी आलो असल्याची पुश्‍ती त्यांनी जोडली.फूके कुटूंबियांची देखील बाजू ऐकून तातडीने कारवाई करण्याची महिला आयोगाची जबाबदारी असल्याचे अंधारे म्हणाल्या.नुकतेच एका निष्पाप मुलीचा हूंडाबळी गेला,नागपूरात असे होऊ नये.महिलेशी संबंधित प्रकरण असेल तर महिला आयुक्तांनाच प्रश्‍न विचारावा लागेल,पुरातत्व विभागाला तर विचारणार नाही,असा टोला त्यांनी हाणला.प्रिया फूकेचं प्रकरण हे ‘चिल्लर’नसल्याचा देखील उल्लेख अंधारे यांनी केला.वैष्णवी हगवणे हूंडाबळी प्रकरणात रोहिणी खडसे यांच्या आरोपाच्या संदर्भात ’मी चिल्लर लोकांच्या प्रश्‍नांना उत्तर देत नाही’असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या!
रुपाली चाकणकरांची बाजू सावरुन घ्यायला ज्या तत्परतेने सुनील तटकरे धावून आले तीच तत्परता त्यांनी हगवणे प्रकरणातील कस्पटे कुटूंबियांसाठी देखील दाखवायला हवी होती,त्यांची भेट घ्याला हवी होती असे एका प्रश्‍नाच्या उत्तरात अंधारे म्हणाल्या.तिच तत्परता संजय शिरसाट प्रकरणातील त्या पिडीत तक्रारदार महिलेसाठी दाखवायला हवी होती.त्यांची तत्परता निवडक कशी काय असू शकते?असा सवाल त्यांनी केला.
………………………………………..

 

 

Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या