Advertisements

सक्करदरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
नागपूर,ता.२१ मे २०२५: राज्यात विधान सभा निवडणूकीपूर्वी अबोध चार ते पाच वर्षांच्या शालेय विद्यार्थिंनींसोबत आरोपी अक्षय शिंदे याने माणूसकीला काळीमा फासणारे कृत्य केले होते.ते प्रकरण संपूर्ण देशात गाजले.अखेर आरोपीला अटक करण्यात आली मात्र,पोलिस चकमकीत अक्षय शिंदेला आपला जीव गमवावा लागला.त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात पराकोटीचा रोष निर्माण झाला होता मात्र,तरी देखील अश्या विकृतीला कोणताही आळा बसला नसल्याचे नागपूरात घडलेल्या आणखी एका घटनेने सिद्ध झाले.
आज सायंकाळी १२ वर्षीय विद्यार्थिनी ही व्हॅनचालकासोबत स्पोर्ट कॉम्पॅलक्सला खेळासाठी गेली असता,४० ते ४५ वर्षीय व्हॅन चालकाने तिच्यासोबत अश्लील चाळे केले.त्याने आधी व्हॅनमधील पाच ते सहा अश्या सर्व विद्याथ्लीर्थ्यांना घरी सोडले त्यानंतर या चिमुरडीला एकटे ठेऊन तिला अश्लील व्हिडीयोज दाखवले व घृणित चाळे केले.ही घटना रेशीमबाग ते बीडीपेठ मार्गावर घडली.
भेदरलेल्या मुलीने घरी आल्यावर पालकांना याची माहिती दिली.परिणामी संतप्त पालक सक्करदरा पोलिस ठाण्यात पोहोचले व अद्याप देखील रात्रीच्या साढे बारा वाजता तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
महत्वाचे म्हणजे हा व्हॅन चालक पिडीतेच्या घराच्याच मागे राहत असून पिडीता लहानपणापासून त्याच्या व्हॅनमध्येच येणे-जाणे करीत होती. पिडीतेच्या नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार मागील आठ वर्षापासून पिडीता या व्हॅन चालकासोबत येणे जाणे करीत असल्याने व व्हॅन चालक पिडीतेच्या घराच्या मागेच राहत असल्याने पालकांचा व्हॅन चालकावर विश्वास होता मात्र,वासनेला वय नसतं व नैतिकताही नसते,या उक्तीप्रमाणे पुरुष नावाच्या या नराधमाला त्याच्याच डोळयासमोर लहानाची मोठी झालेल्या व पौंगडावस्थेत असलेल्या शालेय मुलीमध्ये आपली विकृत वासना शमविण्याची संधी दिसली.
पिडीतेच्या नातेवाईकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे.
…………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
