फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशपहलगाम येथील भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू

पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू

Advertisements

#Pahalgam दिनांक २३ एप्रिल २०२५: पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांना आपले प्राण गमवावे लागले. पुण्यातील कौस्तुभ गणबोटे  व संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे.या हल्ल्यात एकूण २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.यात महाराष्ट्राचे एकूण सहा पर्यटक असून डोंबिवलीतील तिघे,पुण्यातील दोन व पनवेलमधील एका पर्यटकाचा समावेश आहे.
डोंबिवलीतील तीन पर्यटकांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला असून एका लहान मुलाच्या बोटाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे.संजय लेले(वय ४४),अतुल मोने (वय ५२(आणि हेमेत जोशी असे तिघे या दहशतवादी हल्ल्यात ठार झाले असून संजय लेले यांचा मुलगा हर्षल याच्या हाताला गोळी चाटून गेल्याने तो देखील जखमी झाला आहे.
अतुल मोने हे डोंबिवली पश्‍चिमेकडील ठाकूरवाडी परिसरात राहतात.मोने हे पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम येथे गेले होते.अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते.त्यांच्या बरोबर हेमंत जोशी व संजय लेले हे देखील पहलगामला पर्यटनासाठी गेले होते.त्यांचाही या हल्ल्यात दूर्देवी मृत्यू झाला.
पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या दोन पर्यटकांचा देखील या भ्याड हल्ल्यात दूर्देवी मृत्यू झाला.कौस्तुभ आणि संतोष हे आपल्या कुटूंबियांसोबत काश्‍मीर पर्यटनासाठी गेले होते.बैसरन भागात फिरत असताना दहशतवाद्यांनी आधी त्यांना धर्म विचारला,त्यानंतर त्यांना कलमा पढायला लावला.तो म्हणता न आल्याने दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यात,काना मागे व पाठीवर गोळ्या घातल्या.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना त्यांच्या कुटूंबियांनी स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेले मात्र,उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
पनवेलमधील दिलीप भोसले(वय ६०)यांचा देखील मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत पर्यटनासाठी गेलेले सुबोध पाटील (वय ४२)हे जखमी असून त्यांच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरु आहे.
नागपूरातील सिमरन रुपचंदानी व त्यांच्या कुटूंबियांनी गोळीबाराचा आवात ऐकून तिथून पळ काढला.जवळच्या एका टेकडीवरुन त्यांनी उड्या मारल्याने सिमरन रुपचंदानी यांचा पायाला फ्रॅक्चर झाला.त्यांच्यावर देखील श्रीनगरच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात आले .हे विमान श्रीनगर येथून दुपारी १२.१५ वाजता निघाले. पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. ६ वा.श्रीगरवरुन पुण्यात आणण्यात आले. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी १.१५  वाजता श्रीनगर येथून विमान निघाले आणि मुंबईत पोहोचले.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी उपस्थित होते, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
.
इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून व्यवस्था करण्यात येत आहेत.
…………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या