फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजभांडेवाडीत विक्राळ आग!

भांडेवाडीत विक्राळ आग!

Advertisements
अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली भांडेवाडी डम्पिंग यार्ड मधील आगीची गंभीर दखल 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनपा आयुक्तांच्या संपर्कात
नागपूर,१९ एप्रिल २०२५. नागपूर शहरातील भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये आज शनिवार १९ एप्रिल रोजी लागलेल्या आगीबद्दल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी या आगी संदर्भात स्थानिक नागरिकांकडून प्राप्त तक्रारीनुसार बेजाबदार अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांनी दुपारी ४.३० वाजता पर्यंतही घटनास्थळी पोहोचून कोणतेही निरीक्षण केले नाही व या सर्व गंभीर बाबीची कोणतीही दखल घेतली नाही. आज सुटीचा वार असल्याने हे अधिकारी सुटीचा आनंद घेत होते का?या सर्व प्रकारची गांभीर्याने दखल घेत लवकरच या सर्व बाबींचा अहवाल मनपा प्रशासनाकडून मागवू. यात योग्य ती प्रक्रिया पार पाडत जबाबदार अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिला आहे.
भांडेवाडी डम्पिंग यार्ड सभोवतालच्या परिसरात अनुसूचित जाती, जमातीचे गरीब नागरिक मोठ्या प्रमाणात वस्त्या करून राहतात. कचरा डम्पिंग यार्डच्या परिसरात मध्ये-मध्ये लागणारी आग, कचऱ्यातील मिथेन वायू, धूळ, धुलीकण आणि विषोक्त वायू यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान अत्यंत गंभीर झाले आहे. त्यांना श्वसनाचे, फुफ्फुसाचे आजार, पिण्याच्या पाण्यामध्ये आलेला दूषितपणा या सर्वांची तक्रार स्थानिक नागरिकांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्याकडे केली. आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेतली.

भांडेवाडी डम्पिंग यार्डमध्ये लागलेली आग नियंत्रणात आणताना आज प्रशासनाची मोठी दमछाक उडाली. नगरपरिषद ,वाडी ,कामठी ,बहादूरा,नगरपंचायत गोधनी ,नगरपंचायत बेसा ,नगरपंचायत,हिंगणा ,नगरपंचायत मौदा येथील फायर ब्रिगेड सुद्धा भांडेवाडीला आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाठवण्यात आले होते.

आग विझवताना अग्निशम विभागाची एक गाडीच आगीची भक्षण ठरली व क्षणात धू-धू करीत भस्म झाली.हजारो टन कचरा हा किती तरी तास जळत होता,किती तरी किमोमीटर पर्यंत काळाशार धूर आकाशात पसरला होता.नागरिकांना या धूराचा प्रचंड त्रास झाला असून अनेक घरांमध्ये सिलेंडर असल्याने आगीचा धोका अनेक पटीने वाढला होता.जिवितेच्या सुरक्षेसाठी नागरिक आगीची घटना घडताच घरा बाहेर पडले.रात्री साढे दहा वाजताच्या सुमारास पूर्वा या स्वयंसेवी संस्थेतर्फे या भागातील नागरिकांना मोफत जेवण वितरीत करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनपा आयुक्तांच्या संपर्कात-
नागपुरात भांडेवाडी परिसरात लागलेल्या आगीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, ते महापालिका आयुक्तांच्या सपंर्कात होते.घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ११ गाड्या पाठविण्यात आल्या होत्या, आग नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्याने पाण्याचा वापर केला गेला.. या घटनेत सुदैवाने कुठलीही प्राणहानी झालेली नाही. स्वत: महापालिका आयुक्तांनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली .

(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official youtube चॅनलवर उपलब्ध)
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या