फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमलडको ने कौमपर लगाया धब्बा:दंगलीवर स्थानिक मुस्लिम समुदायच नाराज

लडको ने कौमपर लगाया धब्बा:दंगलीवर स्थानिक मुस्लिम समुदायच नाराज

Advertisements
अखेर दंगलखोर फहीमच्या घरावर चालला बुलडोजर

नागपूर,ता.२४ मार्च २०२५: उपराजधानीतील हिंसाचाराचा प्रमुख सूत्रधार व ‘मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा’ शहराध्यक्ष फहीम शमीन खान(वय ३८,रा.संजयबाग,यशोधरा नगर)याच्या घरावर अखेर महानगरपालिकेचा बुलडोजर चालला.फहीम शेखचे दोन मजली घर हे जेसबीच्या पंजाने भुईसपाट झाले.प्रभाग क्र.३ आशीनगर झोनचे अधिकारी हरीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली.यावेळी संपूर्ण परिसरात चोख पोलिस बंदोबस्त होता.
मनपाच्या अतिक्रमण विभागातर्फे काल रविवारीच फहीम खान याच्या कुटूंबियांना चोवीस तासात घर रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली.फहीम खानचे घर अनाधिकृत असल्याची ’उपरती’मनपाला गेल्या सोमवारी, दिनांक १७ मार्चच्या दंगलीनंतर झाली!मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल यांच्यासोबत पोलिस आयुक्तालयात बैठकीनंतर काल दोषींवर कठोर कारवाईचे संकेत दिले होते.गरज पडल्यास उत्तर प्रदेशच्या धर्तीवर बुलडोजर कारवाई देखील केली जाईल,असा इशारा दिला होता.इतकंच नव्हे तर दंगलीतील आरोपींकडून झालेल्या संपत्तीचे नुकसान वसूल करणार असल्याचे ठणकावले होते.
त्यामुळे आरोपींच्या कुटूंबियांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.दंगलखोरांनी सर्वसामान्य निर्दोष लाेकांच्या घरांवर तूफान दगडफेक करुन ९० च्या वर वाहने पेटवून दिली होती.यासाठी त्यांनी पेट्रोल बॉम्बचा देखील वापर केला होता.

इतकंच नव्हे तर दंगलखोरांनी पोलिसांना लक्ष्य करीत तीन पोलिस उपायुक्तांना जखमी केले.रात्री आठ ते अकरा वाजेपर्यंत दंगलखोरांनी महाल,गवळीपुरा,हंसापुरी,भागदालपुरा इत्यादी भागात धुमाकूळ घालत सार्वजनिक संपत्तीचे अतोनात नुकसान केले.विशेषत: या भागातील फक्त  हिंदूंच्या घरांना टार्गेट करण्यात आले होते.बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेतर्फे गेल्या सोमवारी दूपारी १ वाजता गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांधीबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या  पुतळ्याजवळ औरंगजेबचा प्रतिकात्मक पुतळा जाळला होता.त्या पुतळ्याला हिरवी चादर गुंडाळून जाळल्याचा व्हिडीयो सर्वदूर पसरला व यानंतर मुस्लिम समुदायातील तरुणांची माथी सोशल मिडीयाच्या माध्यमातून भडकवण्याचे काम फहीम खान याने केल्याचे समोर आले.दूपारी दोन्ही गटात गणेशपेठ पोलिसांनी सामंजस्य घडवून आणल्यानंतर वाद शांत झाल्याचा समज पोलिसांचा झाला मात्र,फहीम खानच्या नेतृत्वात कट शिजत गेला व त्याची परिणीती दंगलीत झाल्याचे वास्तव पोलिसांच्या तपासात समोर आले.
नागपूर हे शहर स्वत: राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचे शहर असल्याने देशात वेगळा संदेश गेला.संपूर्ण घटनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी पोलिस मुख्यालयात बैठक घेतली.त्यानंतर त्यांनी कठोर भूमिका घेणार असल्याचा सूतोवाच केला.यानंतर रविवारी मुख्य सूत्रधार फहीम खान याच्या कुटूंबियांना अनाधिकृत बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली होती.फहीम खानने ८६९ चौरस मीटरवर अनाधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाले.दूपारपर्यंत मनपाच्या जेसीबीने फहीम खानचे दोन मजली घर भुईसपाट केले.यावेळी परिसरातील अनेक लोक हे त्यांच्या घराच्या गच्चीवरुन हा नजारा बघत होते.पवित्र रमजानचा महिना सुरु आहे,अवघ्या सहा दिवसांवर ईद आली आहे मात्र,दंगली भडकवून कायदा,सुव्यवस्थेसाठी गंभीर आव्हान उभे करणा-या फहीम खानची ईद, ही आता तुरुंगात साजरी होणार असून त्याच्या कुटूंबियांना मात्र,नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागला आहे. ‘मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पक्षाचा अध्यक्ष हामीद इंजिनिअर याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

(छायाचित्र : पोलिस आयुक्त डॉ.रविंद्र सिंघल व इतर अधिकारी बुलडोजर कारवाई दरम्यान असा स्वत: चोख बंदोबस्त राखून होते)
आज सकाळी साढे दहा वाजताच्या सुमारास मनपाच्या जेसीबीने फहीम खानच्या घराचे अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात केली.त्या पूर्वी महावितरण विभागाने वीज तारांना इतरत्र हलवले.पोलिसांचा मोठा फौज फाटा उच्च अधिका-यांसमवेत घटनास्थळी होता.
महालमधील हिंसाचारास पोलिसांनी फहीम खानला अटक करुन त्याच्यावर देशद्रोहाचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे.सध्या तो न्यायालीयन कोठडीत असून त्याच्या समवेत आणखी पाच जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे.फहीम खानचे घर जमीनदोस्त केल्यानंतर इतर देशद्रोहीचा आरोप असणा-यांवर देखील मनपा नोटीस बजावणार का?कारवाई करणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(छायाचित्र: आरोपी फहीम खान)

पोलिसांनी हा परिसर व आजूबाजूच्या चौकांमध्ये आधीच नाकेबंदी करुन ठेवली होती.तरी देखील परिसरातील घरांच्या गच्चीवरुन ही बुलडोजर कारवाई बघण्यासाठी बरीच गर्दी झाली होती.
यासोबतच गवळीपुरा येथील एक आरोपी मोहम्मद युसुफ खान या आरोपीच्या घराचा देखील अतिक्रमणीत भाग आज पाडण्यात आला.याच भागात डीसीपी व एसीपी यांच्या नेतृत्वात लाँग मार्च झाला.सगळे मुख्य चौक हे बंद करण्यात आले होते.आरोपीच्या घरावर सरळ जेसीबीने कारवाई करण्यात आली.गवळीपुरातील मुस्लिम समुदाय स्वत:या दंगलीमुळे तरुणांवर नाराज आहे.‘लडको ने कौम को धब्बा लगाया है‘अशी उघड नाराजी ते व्यक्त करतात.दंगलीमुळे शहराच्या ११ पोलिस ठाण्यांतर्गत अनेक भागात संचारबंदी लागू होती.हे सगळे परिसर हिंदू-मुस्लिम दोन्ही समुदायाच्या व्यवसाय,दुकानदारीचे असल्याने गेल्या सात दिवसांपासून या सर्व परिसरातील दूकाने ही बंद होती.यामुळे दोन्ही समुदायाला आर्थिक फटका बसत होता.
या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर आता गवळीपुरा येथील बहूतांश मुस्लिम समुदायाने येणा-या ‘रामनवमी’च्या शोभायात्रेच्या दिवशी आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही,अशी हमी देण्यास सुरवात केली आहे.
गवळीपुरामध्ये ब्राम्हण,मुस्लिम,ओबीसी समाज मोठ्याप्रमाणात राहत असून आजपर्यंत त्यांच्यात साधे भांडण देखील कधी झाले नाही.मात्र,१७ तारखेला जे काही घडले त्याचा संपूर्ण दोष सोशल मिडीयाला दिला जात आहे.
एकीकडे आरोपी फहीम खानच्या घरावर शासनाचा बुलडोजर चालत होता तर दुसरीकडे फहीम खानच्या आईने बुलडोजर कारवाईवर स्थगिती आणण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.उच्च न्यायालयाने या कारवाईवर ताशेरे ओढत स्थगिती दिली मात्र,तोपर्यंत फहीम खानचे घर भुईसपाट झाले होते.
न्यायालयाने आयुक्तांना १५ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे.दूसरीकडे महाल भागातील जोहरीपुरा भागात राहणा-या आरोपींच्या घराची झाडाझडती देखील पोलिसांतर्फे सुरु आहे.आता दंगलीतील आरोपींचे सोशल मिडीया अकाऊंटसोबतच त्यांची घरे व बांधकाम शासनाच्या रडारवर आले आहे.
आज नागपूरात सर्वदूर फहीम खान व फडणवीस सरकारच्या बुलडोजर कारवाईचीच चर्चा होती.राष्ट्रीय वृत्त वाहीन्यांनी देखील महाराष्ट्रातील या बुलडोजर कारवाईला ठलकपणे प्रसिद्धी दिली.सोशल मिडीयावर देखील या कारवाईबाबत चांगलेच चर्वितचर्वण सुरु होते.अनेकांनी या कारवाईवर आंनद व्यक्त केला तर विरोधी पक्षाने सत्तापक्षावर चांगलेच तोंडसुख घेतले.महाल भागात,ज्यांनी त्या रात्री अक्षरश: मृत्यूचा थैमान अनुभवला होता,ज्यांच्या घरांवर दगडफेक झाली,जाळपोळ झाली,ज्यांच्या संपत्तीचे नुकसान दंगलखोरांनी केले,त्यांनी देखील या कारवाईवर समाधान व्यक्त केले.
(बातमीशी संबंधित सर्व व्हिडीयोज Sattadheesh official youtube चॅनलवर उपलब्ध)
……………………………
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या