फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशमहाराष्ट्रात मोदींची लोकप्रियता ‘या ‘कारणाने घटली!

महाराष्ट्रात मोदींची लोकप्रियता ‘या ‘कारणाने घटली!

Advertisements
पवन खेडा यांनी सांगितले या मागील हे ‘लॉजिक!’

मुख्य निवडणूक आयुक्त शेरोशायरीत मशगुल:पवन खेडा यांची टिका 

नागपूर,ता.२५ जानेवरी २०२५: महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणूकीत जनतेने ४८ पैकी ३० जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकल्या,महायुतीपेक्षा लोकसभेच्या निवडणूकीत आघाडीला मिळालेली मतांची टक्केवारी ही देखील किती तरी अधिक होती मात्र,साढे पाच महिन्यात असा कोणता चमत्कार घडला की, आघाडीची मत टक्केवारी कमी होऊन युतीची १४ टक्क्यांनी वाढली?अवघ्या सहाच महिन्यात ७२ लाख अतिरिक्त मते आली कूठून?पाच वर्षात २०१९ ते २०२४ दरम्यान फक्त ३२ लाख नवे मतदार निवडणूक आयोगाला जोडता आले मात्र, अवघ्या साढे पाच महिन्यात ४८ लाख नवे मतदार जोडण्याचा आयोगाने चमत्कार केला कसा?ही अतिरिक्त ७२ लाख मते युतीलाच कशी मिळाली?लोकसभेत तर याच महाराष्ट्राच्या जनतेने पंतप्रधान मोदी प्रचारात उतरले असताना सुद्धा त्यांना जनतेने नाकारले मात्र,त्याच जनतेने त्यांच्या भारतीय जनता पक्षाला भरभरुन मते दिली,याचा अर्थ मोदी यांनी आता हे स्वीकारले आहे का,महाराष्ट्रात त्यांची लोकप्रियता घटली आहे,त्यांना नाकारुन महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पक्षाला अधिक मते दिली?असा खडा सवाल आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत  काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी केला.
लोकसभेत जी २४ लाख मते आघाडीला मिळाली होती विधानसभेत ती २४ लाख मते महायुतीकडे वळती झाली,याशिवाय अतिरिक्त ४८ लाख मते देखील महायुतीला मिळाल्याने आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाला मतदारांची यादी मागतोय मात्र,ती आम्हाला मिळत नाही उलट आमच्या कोणत्याही मागणीवर किवा प्रश्‍नावर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे शेरोशायरी ऐकवायला लागतात!महाराष्ट्राचा मतदार,विपक्ष मॉक पोलिंगची मागणी करतोय ती देखील त्यांनी फेटाळली.लोकशाहीत प्रत्येक विधानसभेच्या प्रत्येक बूथवरील मतदान हे पारदर्शक व्हायला हवे मात्र,असे घडत नाही.आम जनता,मतदार किवा विरोधक कोणालाही मतदानाशी संबंधित कोणतीही माहिती निवडणूक आयोग देत नाही,त्यांची विश्‍वाहर्ता तर पंतप्रधान मोदी यांच्या भाषणापेक्षाही खालच्या स्तरावर पोहोचली आहे,अशी जहाल टिका याप्रसंगी पवन खेडा यांनी केली.
आज निवडणूक आयोगाचा ७५ वा वाढदिवस आहे मात्र,आयोगाच्या वाढदिवशी निवडणूक आयोग हा ‘जिवंत’तरी आहे का की आम्ही आयोगाचा वाढदिवस मरणोपरांत साजरा करीत आहोत?अशी कोटी ते करतात.आम्ही जेव्हा पण निवडणूकीच्या प्रक्रियेशी संबंधित प्रश्‍न करतो,मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार ‘वाहियात’शेरोशायरी करायला लागतात.आज आयोगाच्या वाढदिवशी आम्ही पण त्यांना एक शायरी ऐकवतो ’जो कमाया है सालो मे उसे गवांने में एक पल नही लगता,जो उडते है गुरुरु के आसमानो में जमीं पर आने में वक्त नही लगता,हर तरह का वक्त आता हे जिंदगानी में,वक्त के गुजर जाने में वक्त नही लगता’ही आमची निवडणूक आयोगाला ताकीद आहे वेळ आहे, अजूनही सशक्त बना,ताकतवान बना,परंतु आज निवडणूक अायोगाची अशी दशा झाली आहे की वो ‘हांफता है,कांपता है’अश्‍या शब्दात खेडा यांनी निवडणूक आयोगावर टिका केली.
आमचा आक्षेप फक्त ईव्हीएम मशीनवर नाही तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील धांधली वर आहे.मतदारांच्या बोगस यादीवर आहे.उत्तर देण्या ऐवजी ते शेरोशायरी ऐकवतात नाही तर विरोधकांवर तानेबाजी करताना दिसून पडतात.विरोधी पक्ष म्हणून आम्ही प्रश्‍न नाही विचारु शकत का?संविधानानुसार आमच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे त्यांना बंधनकारक आहे पण ते उत्तरे देत नाहीत.केंद्र सरकारच्या कुटूंब कल्याण मंत्रालयाने वयस्कर(Adult) लोकांची जी यादी प्रसिद्ध केली त्यात ९ कोटी ५४ लाख संख्या दिली आहे मात्र,निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हीच वयस्कारांची संख्या ९ कोटी ७० लाख कशी होते?संख्येमध्ये इतक्या लाखांचे अंतर कसे?याचे उत्तर ते देत नाहीत.प्रत्येक मतदार हा लोकशाहीचा पाईक असून प्रत्येक मतदाराचा हा अधिकार आहे त्याच्या मताचे काय झाले,अशी विचारणा करण्याचा,असे पवन खेडा म्हणाले.
दोनच दिवसांपूर्वी देशात निवडणूक व्यवस्थापन संस्थांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त हे संतप्त झाले व निवडणूक पद्धतीवर संशय घेण्यासाठी खोटी विधाने हा उपदव्याप हे निवडणूक प्रक्रियेवरील विश्‍वास डळमळीत करण्यासारखे असल्याचे म्हणाले,यावर

प्रश्‍न केला असता ,ते आम्हाला देशद्रोही देखील ठरवू शकतात,अशी मिश्‍किली पवन खेडा यांनी केली.पंतप्रधानांनी ज्या प्रकारची पंरपरा या देशात सुरु केली आहे ,की जे प्रश्‍न विचारतात तो देशाचा शत्रू आहे,ती परंपरा केंद्रीय निवडणूक आयोग जपत आहे.प्रश्‍न विचारणे हा जनतेचा,मतदारांचा,विरोधी पक्षांचा संवैधानिक अधिकार आहे,ते उत्तर का देत नाही?अनेक वेळा मुख्य निवडणूक आयुक्तांसोबत आमचे शिष्टमंडळ बसले व प्रश्‍न केले मात्र,ते कोणतेही उत्तर देत नाहीत.ते १४० वर्ष जुनी काँग्रेस पक्षावर टिका टिपण्णी करतात,आमची टिंगल उडवतात.
पंतप्रधानांनी नुकतेच संसदेत ,या पुढे निवडणूक आयोग कोणत्याही स्वरुपाचा इलेक्ट्रोनिक डेटा कोणालाही उपलब्ध करुन देणार नाही असा कायदा पारित केला,याकडे लक्ष वेधले असता एनडीएचा अर्थच ‘नो डेटा अवलेबल’असल्याची कोटी त्यांनी केली.
महाराष्ट्राच्या निवडणूकीत देशातील गुजरात व कर्नाटकसारख्या आयआयटीमधील प्रमुखांचा खूप मोठा हात असल्याची चर्चा सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात दिसून पडतेय,यात कितपत तथ्य आहे?असा सवाल केला असता,आमचा तर महाराष्ट्रातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर दाट संशय आहे की त्यात गडबड करण्यात आली आहे,असा स्पष्ट आरोप पवन खेडा यांनी केला.आम्ही कोणताही बेजवाबदार आरोप करणार नाही,जबाबदारीने मागणी करतोय,अचानक इतके लाख मतदार वाढले कसे? याचे उत्तर त्यांनी द्यावे,असे ते म्हणाले.
दिल्लीतही ५ फेब्रुवरी रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे,महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती घडणार का?असा सवाल केला असता,आम्ही सजग आहोत,मिडीया सजग आहे,मतदार सजग आहे,असे ते म्हणाले.गेल्या २७ वर्षांपासून दिल्लीत भाजपची सत्ता नाही.दिल्लीतील जनता ही भाजपला कधीही स्वीकारत नाही.फक्त १९९३ ते १९९५ दरम्यान दिल्लीत भाजपची सत्ता राहीली यानंतर १५ वर्षे काँग्रेसची तर १० वर्षे आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीत आहे.यंदा देखील भाजप दिल्लीत विजयी होणार नसल्याचा दावा त्यांनी केला.
दिल्लीत काँग्रेसच्याही पूर्वी स्वबळावर लढण्याची घोषणा ही आम आदमी पक्षाने केली होती,त्यावेळी तर ‘इंडिया’मध्ये फूटीवर कोणीही प्रश्‍न केला नाही मात्र,आमच्या दिल्लीतील स्थानिक नेत्यांनी काँग्रेसही स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा करताच सर्वांना ‘इंडिया’ची आठवण येते व आम्हाला प्रश्‍न विचारले जातात,असे एका प्रश्‍नाच्या उत्तरात पवन खेडा म्हणाले.कॅगने दोन हजार कोटीचा मद्य घोटाळ्यावर आपल्या अहवालात ठपका ठेवला आहे,ताे घोटाळा काँग्रेसचेच दिल्लीचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी सर्वात आधी उघडकीस आणला.आम आदमी पक्षाच्या विद्यमान आमदारची एक ऑडियो क्लिप दिल्लीत चांगलीच व्हायरल होत असून ,त्यात मनीष सिसोदिया हे निवडणूकीच्या अर्थाजणसाठी ठेके विकत असल्याचे त्या आमदारांना सांगत असल्याचे एेकू येत आहे.अद्याप कोणीही हा ऑडियो खोटा आहे,असा दावा केला नसल्याचे पवन खेडा म्हणाले.
काँग्रेस पक्ष महाराष्ट्राच्या निवडणूक निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला आहे,न्याय मिळेल का?असा प्रश्‍न केला असता,ते एकमेव दार असे आहे जो आम्ही ठोठावू शकतो असे सांगत, सर्वोच्च न्यायालयावर आमचा पूर्ण विश्‍वास आहे ते आम्हाला न्याय देतील,असे उत्तर पवन खेडा यांनी दिले.
महाराष्ट्रात राेहिंग्या मुसलमान सापडणे हे गृहमंत्री अमित शहांचे अपयश-
भाजपचे नेते किरीट सोमैय्या हे अमरावती,अकोला,मलकापूर इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांग्लादेशातील रोहिंगे मुसलमान बनावट कागदपत्रांच्या आधारे राहत असल्याचा आरोप करीत आहे,याकडे लक्ष वेधले असता,यात जर तथ्य असेल तर इतक्या आतपर्यंत त्यांना कोणी घूसू दिले?असा प्रश्‍न ते करतात.मोदी हे तर जीवशास्त्रीयरित्या जन्मले नसल्याने ते याची जबाबदारी घेणार नाही त्यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ती घ्यावी.झारखंड,महाराष्ट्रसारख्या राज्यांच्या सीमा या इतर देशाला लागत नाही,तरी देखील इथपर्यंत घुसपैठी आले कसे?कोणी तर जबाबदारी घेतली पाहिजे,असे ते म्हणाले.
(बातमीशी संबंधित व्हिडीयोज Sattadheesh official you tube वर उपलब्ध)
………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या