फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमिटर रिडींग व बिल वाटप कर्मचा-यांचे १ फेब्रुवरी पासून बेमुदत काम बंद...

मिटर रिडींग व बिल वाटप कर्मचा-यांचे १ फेब्रुवरी पासून बेमुदत काम बंद आंदोलन

Advertisements
एम.एस.ई.डी.सी.एल मिटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेची घोषणा
नागपूर,ता.२० जानेवरी २०२५: मिटर रिडिंग घेणारे व विज बिल वाटप करणा-या कर्मचा-यांच्या एम.एस.ई.डी.सी.एल मिटर रिडर कंत्राटी कामगार संघटनेतर्फे १ फेब्रुवरी २०२५ पासून बेमुद्दत काम बंद आंदाेलन करण्यात येणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत या संघटनेचे अध्यक्ष रमेश जांगळे यांनी दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की,मिटर रिडींग घेणारे व वीजबिल वाटप करणारे कामगार यांच्या मागण्यासंदर्भात महावितरण कंपनी प्रशासन तसेच राज्य शासन यांना विविध स्तरावर कामागारांच्या मागण्यांचे निवेदन वारंवार देण्यात आले याशिवाय राज्याच्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान २७ जून २०२४ रोजी एक दिवसीय साखळी उपोषण देखील करण्यात आले.हिवाळी अधिवेशनादरम्यान देखील १९ डिसेंबर २०२४ ते २१ डिसेंबर दरम्यान तीन दिवसीय उपोषण करण्यात आले.मंत्री अतुल सावे यांना निवेदन देखील सादर करण्यात आले.त्यांनी उर्जामंत्री व मुख्यमंत्री यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा-बैठक आयोजित करण्याचे आश्‍वान देखील त्यांनी दिले परंतु, एका महिन्याचा कालावधी लोटून देखील बैठकीसाठी कुठलाही पुढाकार घेण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
या उलट फॉल्टी तसेच नादुरुस्त मीटरच्या जागी राज्यभरात स्मार्ट प्री-पेड मीटर लावण्याचा सपाटा सुरु झाला आहे.यामुळे मिटर रिडर व वीजबिल वाटप करणा-या कर्मचा-यांच्या मनात बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली अाहे.या सर्व कर्मचा-यांचे समायोजन राज्य शासन कसे करणार आहे?या विषयी ३० जानेवरी पूर्वी संबंधित विभागाशी चर्चा करुन संघटनेच्या पदाधिका-यांना कळवण्यात यावे अन्यथा,१ फेब्रुवरी पासून कर्मचारी बेमुद्दत काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा जांगळे यांनी दिला.यामुळे महावितरण कंपनीच्या महसुलावर तसेच सर्वसामान्य वीज ग्राहकांवर जो काही परिणाम होईल त्याची सर्व जबाबदारी संबंधित विभागाची असेल,असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी त्यांनी मिटर रिडर हे पद आऊट सोर्सिंग कामगार म्हणून समाविष्ट करण्याची मागणी केली तसेच या कामगारांची वेतन निश्‍चिती करुन त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.मिटर रिडर कामगारांना शासनाने देय भत्ते लागू करावे व त्याची अंमलबजावणी करावी,वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत रोजगाराची हमी द्यावी इत्यादी मागण्या केल्या.
पत्रकार परिषदेला संघटनेचे सचिव दिपक बघेले,कोषाध्यक्ष सुधीर बारसागडे,उपाध्यक्ष मंगेश कवडे,मंगेश खोब्रागडे,कार्याध्यक्ष नंदकिशोर आकोटकर,सहसचिव प्रकाश पंचघाटे,प्रकाश भोंगाडे आदी उपस्थित होते.
(संबंधित बातमीचा व्हिडीयो Sattadheesh official you tube चॅनलवर बघता येईल)
…………………………….
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या