फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनसुंदरकांडच्या संगीतमय सामूहिक पठणाने ऊर्जालहरींचा प्रसार

सुंदरकांडच्या संगीतमय सामूहिक पठणाने ऊर्जालहरींचा प्रसार

Advertisements
(खासदार सांस्कृतिक महोत्सव)

 ‘जय हनुमान’, ‘जय श्रीराम’ च्या जयघोषाने परिसर दुमदुमला  
 ‘जागर भक्तीचा’ मध्ये श्री हनुमान भक्तांची गर्दी 
संपूर्ण विश्वाचे ऊर्जा दाता तसेच भक्ती आणि शक्तीचे प्रतीक असलेल्या भगवान हनुमान यांच्या संगीतमय सामूहिक सुंदरकांड पठणाने शनिवारच्या सकाळी ऊर्जा लहरींचा प्रसार अनुभवण्यात आला.
हनुमान नगरच्या ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरात खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ उपक्रमात आज  संगीतमय सुंदरकांड पठणाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुन्नाजी ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण चमूने व्यासपीठावरून मार्गदर्शन करून उपस्थितांकडून सुंदरकांडचे अत्यंत मनोभावे पठण करून घेतले. जय श्रीराम, जय हनुमान, सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय याचा एकच जय घोष याठिकाणी होत असल्याने परिसर दुमदुमून गेला.
तत्पूर्वी, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जागृतेश्वरपिठाचे शिवानंद बाबा महाराज यांच्यासह संस्कार भारतीच्या  विदर्भ प्रांत प्रमुख कांचन गडकरी, परशुराम सेवा समितीचे मुन्नाजी छांगाणी, कार्यक्रमाचे संयोजक मुन्नाजी ठाकूर, रंजना गुप्ता, विनोद सोवी या सर्वानी दीपप्रज्वलन करून आणि भगवान हनुमनाच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची रीतसर सुरवात केली. यावेळी मान्यवरांचा आदर सत्कार करणायात आला.

दररोज सुंदर अश्या बासरी वादनाने परिसरात सकारात्मकता आणि अध्यात्मिकता पसरविणारे अशोक मोटघरे तसेच, परिसर रांगोळीने सुशोभित करणाऱ्या अपर्णा जोशी, गायत्री वाशिमकर व रंजना जावंजाळ यांचा देखील याठिकाणी आवर्जून उल्लेख करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
मुन्नाजी ठाकूर आणि त्यांची संपूर्ण चमूने सुरवातीला भगवान हनुमान आणि भगवान श्रीराम यांच्या नामाचा गजर केला. त्यानंतर किशकिंदा कांड मधील हनुमान स्तुतिचे पठण झाले आणि त्यांनंतर सर्वांनी एक सुराने एक तालाने सुंदरकांडचे पठण केले आणि परिसर ऊर्जा, शक्ति आणि भक्ति लहरींनी न्हाऊन निघाला. हनुमान आरती आणि प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली.
सुरुवातीला सहजयोग तर्फे योगाभ्यास घेण्यात आला.  यावेळी हातातून आणि टाळूमधून चैतन्य लहरी निर्माण होण्यासाठी आवश्यक योग्य क्रिया समजावून सांगण्यात आली.  यावेळी आकृतीच्या माध्यमातून शरीरात होणाऱ्या कुंडलिनीच्या चलन-वळणा बद्दल सांगण्यात आलं.  कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या