फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeसांस्कृतिक / मनोरंजनश्रीसूक्त आणि पुरुषसूक्ताच्या भक्तिमय पठणाने ‘जागर भक्तीचा’ समारोप 

श्रीसूक्त आणि पुरुषसूक्ताच्या भक्तिमय पठणाने ‘जागर भक्तीचा’ समारोप 

Advertisements

(खासदार सांस्कृतिक महोत्सव)

 सहस्त्र स्त्री शक्तीने घेतला भारताला विश्वगुरु करण्याचा संकल्प 
नागपूर: श्रीसुक्ताच्या माध्यमाने हृदयस्थ लक्ष्मीला अभिषेक करतानाच सर्वत्र प्राणशक्ती जागृत करून देशाला विश्वगुरु बनविण्यात योगदान देण्याचा संकल्प आज घेण्यात आला.
हनुमान नगरच्या ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसरात खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘जागर भक्तीचा’ उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी आज भक्तिमय वातावरणात श्रीसूक्त आणि पुरुषसूक्ताचे वाचन -पठण करण्यात आले. तत्पूर्वी बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आणि त्याचबरोबर त्यांच्या संरक्षणाकरीता आणि हिंदू सनातन धर्माच्या अभिवृद्धीकरीता संकल्प सोडण्यात आला.
सुरुवातीला, संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत प्रमुख कांचन गडकरी, आयुर्वेदाचार्य डॉ.राधा कमाविसदार, राष्ट्रसेविका समिती, महिला समन्वय प्रमुख नागपूर, महानगर एड.  पद्मा चांदेकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता मते, हिंदू संस्कृती अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. रमा गोळवलकर आणि राष्ट्रसेविका समितीच्या श्वेतलाना बगाडिया या मान्यवरांनी रीतसर देवीच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून दीप प्रज्वलन केले. या वेळी मंगला देशपांडे, सुजाता काथोटे, दर्शना नखाते, श्रद्धा महाजन, रमा पुराणिक यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
आज आम्ही प्रत्येक उंबरठ्यावर जाऊन मातृशक्तीला जागे केले पाहिजे. आता आम्हाला आमच्या राष्ट्राला विश्वगुरू पदावरती न्यायचे  आहे आणि त्याकरता स्त्री मधील शक्ति जागृत असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन आयुर्वेदाचार्य डॉ. राधा कमाविसदार यांनी केले. ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांचं स्वागत सर्वत्र होत आहे त्या रामचंद्रांचे स्वागत कौशल्या म्हणूनच प्रत्येक घरात व्हावं आणि पुढे प्रत्येक घरी राम जन्माला यावा हाच आशीर्वाद मागावा असे आवाहन त्यांनी उपस्थित स्त्रीशक्तीला केले.
शेवटी, पुरुषसूक्त आणि त्यानंतर आठ वेळा श्रीसूक्ताचे पठण करण्यात आले. कण्वाश्रम महाल आणि राष्ट्रसेविका समिती अहिल्या मंदिर नागपूर यांच्या तर्फे  सुजाता खंबाटा, सुनीता जोशी, सीमा इट्टलवार, मंदा माहुरकर, सीमा सराफ, अंजली बेंद्रे, शुभांगी नाफड, शुभदा पाटील, गौरी नामजोशी, वर्षा काथोटे, वनिता काळे आणि सुजाता काथोटे यांच्या मार्गदर्शनात पठण घेण्यात आले.
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या