Advertisements

सारे पटांगण एक सुरात गाऊ लागले
खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा हाऊसफुल्ल गर्दीचा दहावा दिवस
नागपूर, २२ डिसेंबर : आप हमारी जान बन गये, तुम्हारा दिल या हमारा दिल, कोई इतना खूबसुरत कैसे हो सकता है, गायक के के चे मैं चाहू तुझको बेपनाह, क्या मुझे प्यार है, वो बरसाते अशी लोकप्रिय गाणी तो गाऊ लागला आणि त्याच्या सोबत सारे पटांगण एक सुरात गाऊ लागले…
प्रसंग होता गायक, संगीतकार, युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या विशाल मिश्रा च्या ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ चा. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या दहाव्या दिवशी ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर सुप्रसिद्ध गायक, संगीतकार विशाल मिश्रा यांची ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ पार पडली.
नागपूरकरांनी खूप प्रेम दिले, येथे आलो की आपल्या घरी आल्यासारखे वाटते, खूप दिवसानंतर मला इतके छान वाटते आहे, असे म्हणत गायक, संगीतकार, युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या विशाल मिश्राने कबीर सिंग चित्रपटातील ‘ पहला पहला प्यार है तेरा…. ‘सादर केले. नागपूरकरांनी त्याच्या स्वरात स्वर मिसळत त्याच्यावरील आपले प्रेम व्यक्त केले. त्याने धिम धीम ताना ना, की पहली बार मोहब्बत की है, अंबर सरिया, आप प्यार में हम सवरने लगे अशी अनेक गीते सादर केली.
विशाल ने ‘ आज गली गली अवध सजायेंगे … राम आयेंगे ‘ हे भजन गाताना आपले शूज काढून ठेवत संस्कारांचे दर्शन घडवले.
मराठी वरील प्रेम –
मराठी लोक, मराठी भाषा, मराठी गाण्यावरील प्रेमामुळे मुंबईत आलो असे सांगत विशाल ने आतापर्यंत मराठीत २६,२७ मराठी गाणी केली असल्याचे सांगितले. त्याने या वेळी ‘मागू कसा मी ‘ हे मराठी गीत सादर केले.
तत्पूर्वी, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत प्रमुख कांचन गडकरी, राष्ट्र सेविका समितींच्या विभाग संपर्कप्रमुख वसुधा खटी, ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’च्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर, रेणू अग्रवाल, नचिकेत जामदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कुळकर्णी यांनी केले.
********
हाऊसफुल्ल…. हाऊसफुल्ल…
सायंकाळी ६ वाजताच ईश्वर देशमुख शारिरीक शिक्षण महाविद्यालयाचे पटांगण पूर्णतः भरून गेले होते. त्यामुळे सर्व दरवाजे बंद करण्यात आले. पटांगणच्या बाहेर लावलेल्या स्क्रीनवर सुरू असलेल्या तसेच, विविध सोशल माध्यमावरील लाईव्ह कार्यक्रमाच्या हजारो प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला.
……..

[विशाल ने गडकरींना नमस्कार करून त्यांचा आशिर्वाद घेतले]
ढोलताशा वादनाने दणाणला परिसर-
स्थानिक ‘कलावंत’ या ढोलताशा पथकाच्या वादकानी सादर केलेल्या ढोलताशा वादनाने व जय भवानी, जय शिवाजी महाराजांच्या घोषाने ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या परिसर दणाणून गेला.
……..
उद्या समारोप ….
मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा सोमवार, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रसिद्ध गायक जूबिन नौटियाल यांचे लाईव्ह इन कॉन्सर्ट ने समारोप होत आहे.
…….
संस्कार यज्ञ यशस्वी – नितीन गडकरी
दोन विश्वविक्रमांची झाली नोंद
मुलांवर संस्कार व्हावे, समाजात सांस्कृतिक मूल्यांचा विकास व्हावा म्हणून सुरू करण्यात आले खासदार सांस्कृतिक महोत्सवात शहरातील १७५ शाळांमधील तब्बल २८,३२९ विद्यार्थ्यांनी समर्थ स्वामी रामदासांचे ५१ ‘मनाचे श्लोकां’चे पठण आणि वंदे मातरम गायन केले. त्याची जागतिक स्तरावर विश्वविक्रमांच्या रुपात दखल घेण्यात आली. त्यामुळे हा संस्कार यज्ञ यशस्वी झाला, असे उद्गार नितीन गडकरी यांनी काढले.
खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत आयोजित जागर भक्तीचा या उपक्रमात शुक्रवारी २० डिसेंबर रोजी सकाळी शहरातील १७५ शाळांमधील तब्बल २८,२९ विद्यार्थ्यांनी समर्थ स्वामी रामदासांचे ५१ ‘मनाचे श्लोकां’चे पठन आणि राष्ट्र सेविका समितींच्या सहकार्याने वंदे मातरम चे गायन करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या दोन्ही विक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद करण्यात आली. या दोन्ही विक्रमांचे प्रमाणपत्र व मेडल ‘वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया’च्या चीफ एडिटर सुषमा नार्वेकर व संजय नार्वेकर, रेणू अग्रवाल, नचिकेत जामदार यांच्या हस्ते नितीन गडकरी, वसुधा खटी यांना प्रदान करण्यात आले.
यावेळीनया उपक्रमाचे संयोजक विजय फडणवीस, अनिल शिवणकर, योगेश बन, नरेश कामडे, हरीश केवटे, किशोर बागडे व विश्वनाथ कुंभलकर यांची उपस्थिती होती.
……
Advertisements

Advertisements

Advertisements
