– खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या तृतीय दिनी ‘रामउत्सव’
– पारंपरिक मूल्यांची पखरण
नागपूर,ता.१६ डिसेंबर २०२४: भारतातून विश्व चेतनेला गती प्राप्त होते व नागपूरमधून वैचारिक चेतना गतीशील होते, असे प्रतिपादन विश्व विख्यात कवी, मोटिव्हेशनल स्पीकर, विविध कला निपुण डॉ. कुमार विश्वास यांनी येथे केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कलागुणांचा संगम असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या आज, तिसऱ्या दिवशी ‘अपने अपने राम’ अंतर्गत विवेचनपूर्व प्रवचन देताना ते बोलत होते. हनुमाननगरातील क्रीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. वातावरण कडाक्याच्या थंडीने गारठले असतानाही मोठ्या संख्येने भक्तांनी संगीतमय राम कथेचा आनंद घेतला.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संस्कार भारतीच्या प्रमुख कांचन गडकरी, राजे मुधोजीराव भोसले, रमेश मंत्री, अरुण कोटेचा, डॉ. आनंद संचेती, कृषी शास्त्रज्ञ डॉ सी. डी. मायी, आधार संस्थेचे डॉ. अविनाश रोडे, उद्योगपती रमेश मंत्री, नंदकिशोर सारडा, एलआयसीचे संचालक निलेश साठे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रभू रामचंद्र पूजा व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
डॉ. कुमार विश्वास पुढे म्हणाले की, दुसऱ्यांच्या व्यथेने अस्वस्थ होणाऱ्या व्यक्तींची नावे इतिहासात कोरली जातात. भारतीय संस्कृती चिंता नाही चिंतन शिकवते. हे विश्व संवेदनेने चालते, रघुकुलनंदनाचा मूल गाभा संवेदनशील होता. राजीवलोचनाचे श्रद्धापूर्वक वर्णन असलेल्या आशयसंपन्न गीत, कवनांनी ही अनोखी रामकथा उत्तरोत्तर फुलत गेली. भारत हा प्रश्नांचा देश आहे, सर्व प्रश्नांची उत्तरे जगप्रसिद्ध ग्रंथ गीतेत सापडतात. तसेच मर्यादा पुरुषोत्तम राम बुध्दीकौशल्यात सर्वश्रेष्ठ होते हे राम बिभीषण यांच्या प्रथम भेट-संवादातून अधोरेखित होते. महत्वाकांक्षा अनंत व लोभ शून्य ठेवल्यास परमानंद प्राप्त होतो. रामाला रामाच्याच सहवासाचे आर्जव करावे. रामाची कहाणी नित्यनवीन प्रसन्नता प्रदान करते. वामपथावर जाणाऱ्या पिढीला राममार्गावर आणायचे आहे, असे कुमार विश्वास म्हणाले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे डॉ. कुमार विश्वास यांनी समाधानकारक विस्तृत उत्तरे दिलीत. प्रारंभी डॉ. कुमार विश्वास यांच्या चमुतील नीरजा उपरेती, अंकिता श्रीवास्तव यांनी सुमधुर भजन व रामधून सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी, रेणुका देशकर, रीचा सुगंध, कविता तिवारी यांनी केले.
महोत्सवाच्या सफलतेसाठी आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर, दिलीप जाधव, सचिव जयप्रकाश गुप्ता, कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, सदस्य बाळासाहेब कुलकर्णी, हाजी अब्दुल कदीर, सारंग गडकरी, अविनाश घुशे, डॉ. दीपक खिरवडकर, संदीप गवई, संजय गुळकरी, रेणुका देशकर,गुड्डू त्रिवेदी, किशोर पाटील, चेतन कायरकर, आशिष वांदिले, भोलानाथ सहारे, ऍड. नितीन तेलगोटे, मनिषा काशीकर, विजय फडणवीस, महेंद्र राऊत, दिलीप गौर, शैलेश ढोबळे यांचे सहकार्य लाभत आहे.
**
उद्या महोत्सवात…
सकाळी ७ वा. भक्तिमय वातावरणात परित्त देशना पठण व सायं. ६ वा. ‘अपने अपने राम’ अंतर्गत डॉ. कुमार विश्वास यांचे मर्मज्ञ प्रवचन होईल.
.,…..
दिव्यांग कलाकारांनी जिंकले श्रोत्यांचे मन
खासदार सांस्कृतिक महोत्सव २०२४ च्या तिसऱ्या दिनी, स्थानिक दिव्यांग, अंध कलाकारांचा ‘दिव्यरंग दिव्यांगांचे’ हा संगीतमय कार्यक्रम झाला. “हीच अमुची प्रार्थना अन हीच अमुची मागणी, माणसाने माणसाशी माणसासम वागणे” या हळुवार आर्त सुरांनी मैफिलीला सुरुवात झाली. मेरा मन ये बता दे तू, मितवा, बच्चे मन के सच्चे, ये ना सजणा, नीले नीले अंबर पर, मेरे सपनोंकी राणी, हिरा मोती मैं ना चाहू असे एकाहून एक सरस सुमधुर व सुफी गीत यावेळी सादर करण्यात आले. या समाज प्रबोधनपर कार्यक्रमाची संकल्पना जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर आणि जिल्हा समाज कल्याण कार्यालय अधीक्षक प्रवीण मोंढे यांची होती. मानसोपचार तज्ज्ञ नीता जैन, कैलास सहारे, वर्षा ठाकरे, वैशाली कहू, रीता कऱ्हाडे, अब्दुल रझाक, प्रल्हाद देवघरे, अर्चना श्रावणे यांनी दिव्यांग कलाकारांना मार्गदर्शन केले. या समूहाचा पहिला कार्यक्रम बाबा आमटे यांच्या आनंदवनात व त्यानंतर दिल्ली, सिमला येथे झाला होता. याप्रसंगी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे शोएब शेख, अपूर्वा नामदेव, सुरेश आगडे, विजया कापरकर, तिलोत्तमा इंगळे, लक्ष्मी पांडे, मुकेश गोरले, विवेक लोहकरे यांच्यासह कलाकारांचा सत्कार करण्यात आला.