काटोल,सावनेर,रामटेक,हिंगणा,पूर्व नागपूर,दक्ष्ण नागपूर इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्ष्ण-पश्चिममध्येच एक अदृष्य रोष जनतेच्या मनात धगधगत होता.निश्चितच हे भाजपच्या सर्व्हेमध्ये ही दिसून आले असावे.मात्र,ईव्हीएम मशीन्समधून जनतेच्या मनातला हा रोष उमटलाच नाही उलट,या सर्व ठिकाणी आश्चर्यजनकरित्या ‘कमळ’फूलले.दया…कुछ तो गडबड है!‘पण याचा शोध लागणार कसा?महत्वाचे म्हणजे लावणार कोण?विरोधक?जनता?ईव्हीएम मशीन्सवर आपल्या निकालपत्रातून विश्वास दाखवणारे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड कि सर्वोच्च न्यायालय?
२०१५ साली देशभरातील ईव्हीएम मशीन्सविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या .ईव्हीएम मशीन्स या पारदर्शक असून यात वेळोवेळी मात्र त्यातीत तंत्र व मतदानाची प्रक्रिया ही ‘अपडेट’करण्याचा सल्ला(आदेश नव्हे)निवडणूक अायोगाला न्यायालयानी दिला.या सल्लानंतर देशातील अनेक राज्यात तसेच २०१९ च्या लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या परंतु ईव्हीएम मशीन्समध्ये अधिक पारदर्शिता आणण्यासाठी व एकाही मतदाराचे मत चोरी होऊ नये यासाठी अद्यावत तंत्रज्ञान वापरण्याची तसदी केंद्रिय निवडणूक आयोगाने घेतलीच नाही,हे महत्वाचे.
गुजरातमधील ईव्हीएम मशीन्सनेच महाराष्ट्रात दिग्गजांचा घात केला.प्रहारचे बच्चू कडू हे ‘अपराजित’होते त्यांना अगदी नवख्या उमेदवाराने पराभूत केले!यशोमती ठाकूर,पृथ्वीराज चव्हाण,बाळासाहेब थोरात या दिग्गजांचा घात झाला तर नाना पटोले अवघ्या २०८ मतांनी साकोलीतून विजयी झाले.महत्वाचे म्हणजे ते २०८ मते बॅलेट पेपरमधून त्यांना मिळाली होती व बॅलेज पेपरमध्ये फेरफार शक्य नाही!दया…मग संपूर्ण देशाचीच निवडणूक बॅलेट पेपरवर का घेतली जात नाही?दया कुछ तो..गडबड है!
या निवडणूकीने राज्यातील अनेक जिल्हेच
‘काँग्रेसमुक्त’केले(आपसूक झाले नाहीत)वर्धा जिल्हा उदाहरणादाखल सांगता येईल.गोंदिया जिल्ह्याची देखील तीच स्थिती आहे.कहर तर हा आहे महाराष्ट्राच्या निवडणूकीत ईव्हीएमच्या महाविजयाला,महायुतीची बाजी म्हणून सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या काळात नाही का मतपेट्या पळवल्या जायच्या?असे प्रतिउत्तर जरी मिळणार असले तरी संपूर्ण देशात अवघ्या काही ठिकाणी अश्या घटना घडायच्या,येथे तर संपूर्ण निवडणूकच हायजॅक करण्यात आल्या आरोप होत आहे!
नागपूरची गोष्ट सांगावयची झाल्यास,पूर्व नागपूरमध्ये अपक्ष आभा पांडे यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्या प्रभागात संघसेवकांच्या तब्बल ६० बैठकी झाल्या.मतदारसंघात तर अगणिक बैठका घेण्यात अाल्या.आभा पांडे महिला चांगली आहे परंतू,त्या जर निवडूण आल्या तर तुमच्या मतदारसंघात ‘बटेंगे तो कटेंगे’होईल…याशिवाय त्या हिंदी भाषिक आहेत..आमदार म्हणून मराठी माणसाला काय न्याय देईल?हा नॅरेटीव्ह पसरविण्यात आला,याशिवाय पैशांचा महापूर या मतदारसंघातील प्रत्येक बूथवरच वाहिला,वरुन सव्वा लाखांच्या मताधिक्याचा विजय, उजळ माथ्याने साजरा करायचा!दया…हे कोणत्या नीतीमत्तेत बसतं?अपक्ष आभा पांडे अश्या जनाधार असलेल्या नेत्याला त्यांच्याच प्रभागातून मते पडली नाहीत!मतदारांनी त्यांना घरी येऊन सांगितले,आम्ही तुम्हाला मत दिले होते,गेले कुठे?त्यांची मते चोरीला गेल्याने अनेक मतदार ढसाढसा रडले..दया…कोणत्या ईव्हीएम मशीनमध्ये ती सापडतील रे?
ॲड.असीम सरोदे सांगतात,सर्व पराभूत उमेदवारांनी याचिका दाखल केल्या पाहिजे.न्यायालयात न्याय मिळो ना मिळाे तो नंतरचा भाग आहे निदान जनतेमध्ये हा संदेश गेला पाहिजे,त्यांची मते चोरीला गेली आहे,त्यांना हा निकाल मान्य नाही,हा निकाल त्यांना संशयास्पद वाटतो.जनता रस्त्याव उतरणार नाही परंतू निदान पराभूत उमेदवारांनी तरी या निकालाच्या विरोधात कायदेशीर लढा द्यावा.
अडीच कोटी महिला मतदारांनी लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीची त्सुनामी घडवली,असा दावा सत्ताधारी नेते करीत असले तरी,नागपूरातील संगम चाळ या वस्तीतील प्रत्येक घरातील निदान दोन ते तीन महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला होता मात्र,तरी देखील त्यांनी पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार यांच्या ‘पंजा’वर शिक्कामोर्तब केलेव पश्चिम नागपूरात काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांचा विजय झाला.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कोट्यावधी लाडक्या बहीणींनी पैसे घेऊन देखील पंजाला मत दिले आहे मात्र,त्यांची ही मते चोरीला गेली,इतकंच नव्हे तर नागपूरात मृत पावलेल्या मतदारांनी देखील मत दिल्याचे लोकशाहीसाठी ‘भीषण ’ आणि भयग्रस्त असल्याची चर्चा आहे!सोशल मिडीयावर यावर अनेक किस्से व्हायरल झाले असून,साक्षात यमाने त्यांना नागपूरात मत देण्यासाठी विशेष सुटी जाहीर केली असावी,महायुतीच्या सरकारसाठी पृथ्वीलोकात जा आणि मत देऊन या…अनेकांनी तर स्वर्गातूनच मत दिले आणि महायुतीला विजयी केले…दया..हे मीम्स काय दर्शवतात?साढे दहा टक्क्यांनी वाढलेली महागाई,बेरोजगारी,परीक्षांचा घोळ,शेतकरी,सोयाबिन,कापूस,बलात्कार,ईडीच्या कारवाया,छत्रपतींचा पुतळा,महाभ्रष्टाचार,टक्केवारी,कंत्राटे,रेती तस्करी,अम्ली पदार्थांची तस्करी,शासकीय जमीनी लाटणे,पर्यावरणाला ओरबाडणे,खाणी,अवैध उत्खनन,अदानी,महाराष्ट्रातील उद्योग धंधे गुजरातला पळवणे इ.कोणतेच मुद्दे या निवणूकीत नव्हते?केवळ लाडकी बहीण व इतर योजनांची महायुतीला तारले?तारलेच नव्हे तर छप्पर फाडके सत्ता दिली?सत्ताच दिली नाही तर विरोधकांना संपूर्णपणे नेस्तनाबूत केले?दया…कुछ तो गडबड है!
दया…आता या भारत देशात मतदारांचे मतदानच ‘खतरे मे’आहे.आमदार परत बोलावण्याचा अधिकार तर सोडा,मतदारांच्या मनात इतका अविश्वास निर्माण झाला पाहिजे की ते मतदानासाठी बाहेरच पडायला नको.एक दिवस या देशात ‘वन नेशन..नो इलेक्शन ’ही स्थिती(अराजकता)निर्माण करण्यासाठी तर हे गुजराती ईव्हीएमचे षडयंत्र नसावे?२०२६ मध्ये संसदेत ‘वन नेशन वन इलेक्शन’चे विधेयक पारित होणार ते संपूर्ण देशाला लागू होणार यानंतर अवघ्या दोनच वर्षात महाराष्ट्रातील ही महायुतीची सरकार बर्खास्त होऊन पुन्हा नव्याने निवडणूका होतील,अमित शहा यांनी याच निवडणूकीत कार्यकर्तांना दिलेल्या ‘शब्दा’प्रमाणे,पुढील निवडणूक भाजप एकटा लढेल!त्यासाठी तयार रहा,यंदाचा मुख्यमंत्री हा देखील भाजपचाच असेल..!दया…मग शिंदे गट आणि अजित पवार गटाचे काय होणार?संजय राऊतांना विचारायचे का,ते भाजपमध्ये विलीन होतील का?या निवडणूकीत शरद पवार,उद्धव ठाकरे,काँग्रेस पक्षच संपवला,मग महाराष्ट्रात फक्त भाजपच उरेल,याच रणनीतून अमित शहा हे बोलले होते का?दया…काही तर सांग!
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरच्या अपक्ष उमेदवार डॉ.अभिलाषा गावतुरे यांची ‘केटली’वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या विरोधात जोरदार तापली असतानाच ‘खेला होबे’झाला.गल्लीतले शेंबडे पाेर देखील सांगत होते,काँग्रेसने दिल्लीत सेट होत,डमी उमेदवार दिला.खरी लढत गावतुरे व मुनगंटीवार यांच्यातच आहे.परंतू,केटलीतील वाफ काढण्यासाठी मुनगंटीवार, व काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांनी एका सभेनंतर रात्री दहा वाजता चांगलाच वाद पेटवला अन् जनतेचे लक्ष केटलीवरुन विचलीत करण्याची रणनीती यशस्वी केली.ज्या गावतुरे यांच्या विजयाची खात्री तेथील लहान-मोठे सगळेच उस्फूर्तपणे देत होते,त्यांना अवघ्या वीस हजार मतांच्या जवळपास थांबविण्यात आले तर संपूर्ण बल्लारपूरात ज्यांची ‘डमी’उमेदवार म्हणून चर्चा होती त्यांच्या पंजा समोर ७० हजार पल्ल्याड मते पडली!सव्वा लाख मते घेऊन अर्थातच मुनगंटीवार विजयी झाले.लोकसभेत याच बल्लापूरातून मुनगंटीवारांना जनाधार नव्हता.४६ हजार २०० मतांनी बल्लारपूरच्या जनतेने वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मुनगंटीवार यांना नाकारले होते.मुनगंटीवारांचा ‘विकास’तेव्हाच जनतेने नाकारला होता,अवघ्या पाच महिन्यात त्याच विकासावर सव्वा लाख मते मिळू शकतात का?त्यांच्या सभांना ५० लाेकांची गर्दी जमवणे देखील त्यांना कठीण झाले होते,त्यांच्या पत्नीला देखील लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करताच,पादत्राणे तेथील महिलांनी दाखवले होते…दया..गुजरातच्या ईव्हीएमने या मतदारसंघात देखील कमाल केली का?डॉ.गावतुरे आता या निकालाच्या विरोधात स्वाक्षरी अभियान चालवित आहेत,लवकरच न्यायालयात देखील दाद मागणार आहेत,दया…आता न्यायदेवतेने डोळ्यांवरची पट्टी काढली आहे,तिला लोकशाहीची ही बेअब्रू दिसेल का?
कायद्याच्या नजरेज एक मताची चोरी ही देखील चोरीच असते,येथे तर कोट्यावधी मतदारांच्या मतांवर दरोडा पडला आहे.या निकालावर एकमेव प्रचार व प्रसार माध्यमे सोडता..कोणालाही विश्वास नाही.गुजरातवरुन आलेल्या ईव्हीएममध्ये ॲण्टी हॅकिंग तंत्रज्ञान टाकले की कमळाचेच फूल?दया…या निकालावर जल्लोष करायचा कि आक्रोश करायचा!लाखो लाेकांनी हा असा निकाल पाहता काल दूपारपासूनच टी.व्ही बंद करुन टाकला!त्यांना या त्सुनामीचा आनंद का नाही झाला?माध्यमे किंचाळून-किंचाळून महाराष्ट्राच्या जनतेच्या गळी हा निकाल महायुतीची त्सुनामी म्हणत उतरवित होती मग लोकांनी टी.व्ही का बंद करुन ठवले?ही माध्यमे एग्जिट पोलचा आधार घेत,महाविकासआघाडीला १३५ ते १६० पर्यंत जागा मिळेल सांगत होती,मग आघाडी ही फक्त ४९ जागांवर कशी अडकली?प्रचार-प्रसार माध्यमांना एकदा ही प्रेक्षक-वाचकांना ,राज ठाकरेंप्रमाणे हे सांगण्याची गरज नाही पडली,हा निकाल त्यांच्याहीसाठी ‘अविश्वसनीय’आहे,अनाकलनीय आहे! दया…मोदी मिडीयाला देशातील जनता केव्हापर्यंत लोकशाहीचा चौथा स्तंभ समजत राहील?
ज्या सावनेरमध्ये केदार यांच्या पत्नीला २५ हजार मतांची हमखास लीड मिळणार असल्याचा सर्व्हे होता तिथे त्या पराभूत होतात?रामटेकमध्ये ९० हजार पल्ल्याड मते घेऊन देखील ईव्हीएम मशीनचा कमाल होतो व शिंदे गटाचे आशिष जयसवाल तिस-यांदा विजयी होतात!या निवडणूकीत तर भाजपने ,जयसवाल यांच्याकडून,भाजप कार्यकर्त्यांना मिळत असलेल्या दुय्यम दर्जाच्या वागणूकीने संतप्त होऊन, पडद्या मागून ‘बॅट’(काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र मुळक)यांच्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’केली होती!दया…ईव्हीएम मशीनमध्ये हा ‘स्कोर‘ आला कसा रे?काटोलमध्ये दगडफेकीतून जखमी झालेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जखमेची ठसठस,सलील देशमुखांच्या पराभवातून आणखी वाढली ,अखेरच्या क्षणी भाजपच्या पदाधिका-यांनीच काटोलमधून विजयाची अाशा सोडून दिली असताना,दया…काटोलमध्ये चरणसिंहच्या चरणी विजयाची माळ समर्पित झालीच कशी?हा चमत्कार घडलाच कसा?दया…कुछ तो गडबड है…!
………………………..