फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजबाबासाहेबांच्या जयंती दिनी गळ्यात नीळे दुप्पटेच...

बाबासाहेबांच्या जयंती दिनी गळ्यात नीळे दुप्पटेच…

(भाग-३)

उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी चौथ-यावर नव्हे परिसरात नारे लागले
विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह पसरवला
नागपूर,ता.१८ नोव्हेंबर २०२४: भारतीय जनता पक्षाचे नागपूर विधान सभेतील सर्व उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्या पूर्वी संविधान चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला नेहमी प्रमाणेच अभिवादन करण्यासाठी गेलो असता,चौथ-यावर समर्थकांची प्रचंड गर्दी जमली होती,त्यांच्या भाराने कठड्याची रेलिंग वाकली,असे व्हायला नको होते मात्र,चौथ-यावरुन ‘जय श्री राम’चे कोणतेही नारे लागले नाहीत,जे काही नारे लागले ते परिसरात लागले,असा खुलासा उत्तर नागपूरातील भाजपचे उमेदवार व माजी आमदार डॉ.मिलिंद माने यांनी खास ‘सत्ताधीश’सोबत बोलताना केला.
बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर ‘जय भीम’ ऐवजी ‘जय श्री राम’चे नारे लागले,असा आरोप विरोधकांनी केला होता तसेेच या घटनेचे व्हिडीयो उत्तर नागपूरात तूफान व्हायरल केले होते,यावर डॉ.माने यांनी वरील खुलासा केला.
संविधान चौकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्या शिवाय कोणत्याही पक्षाचा व्यक्ती उमेदवारी अर्ज भरत नाही,त्या वेळी भाजपचे कार्यकर्ते तर होतेच परंतू इतर ही उमेदवार उपस्थित होते.प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झाली होती,लोक रेलिंगला टेकून उभे होते.रेटारेटी झाली,अनेक लोक पडले आणि पडलेल्या लोकांच्या वजनामुळे रेलिंग झुकले,कोणीही  जाणूनबाजून रेलिंगला धक्के देऊन तोडले नाही,असे डॉ.माने सांगतात.कोणीही जाणूनबाजून पंचशीलचे झेंडे वाकवले नाहीत.
त्या परिसरात ‘जय श्री राम’चे नारे लागले हे सत्य आहे,परंतू ते बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या चौथ-यावर लागले नाही,ते बाहेर लागले,असा खुलासा माने करतात.बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्या नंतर ’डॉ.बाबासाहेब आंबेडकर की जय ’हेच नारे चौथ-यावर लागले आणि बाहेर परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी जर ’जय श्री राम’चे नारे लावले तर आम्ही कोणाच्या तोंडावर झाकण ठेऊ शकत नाही,ते ‘बाबासाहेब आंबेडकर की जय’पण म्हणनारे होते आणि ‘जय श्री राम’पण म्हणनारे होते.ते हिंदू पण होते,बौद्ध पण होते.जय श्री राम चा जयघोष हा परिसरात झाला,चौथ-यावर नाही,असा दावा डॉ.माने करतात.
अयोध्येच्या राम मंदिराच्या परिसरात कोणी जर ’जय भीम’चे नारे लावले तर तेथील भाविक म्हणतील का,असा नारा या परिसरात का लावता?असा प्रतिप्रश्‍न त्यांनी केला.ज्यांची ज्यांची जशी आस्था असेल तसा जयघोष ते करतील,असे माने सांगतात.
आपला संविधान ‘धर्मनिरपेक्षता’मानतो,मग त्या परिसरात फक्त जय भीमचेच नारे लागले पाहिजे,जय श्री रामचे नाही,विरोधकांची ही सोयीस्कर धर्मनिरपेक्षता नाही का?असा सवाल केला असता,ज्या वेळी बाबासाहेबांची जयंती असते त्यावेळी संविधान चौकात भरपूर गर्दी असते,आम्ही देखील भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी ‘नीळे दुप्पटे’गळ्यात टाकून पुतळ्याला माल्यार्पण करतो,त्या दिवशी आमच्या गळ्यात पक्षाचा दुप्पटा नसतो,नीळा दुप्पटा असतो,नीळा झेंडा असतो आणि मुखात ‘बाबासाहेब आंबेडकर की जय’हा जयघोष असतो,१४ एप्रिल आणि ६ डिसेंबर रोजी आम्ही संविधान चौकात भाजपचे असलो तरी पण ‘जय श्री राम’नारे लावत नाही,त्या दिवशी मात्र,निवडणूकीचं वातावरण होतं.
भाजपचे सगळे मोठे नेते माल्यापर्णसाठी उपस्थित असल्याने प्रचंड गर्दी होती.त्यात सुलेखा कुंभारे होत्या,कवाडे होते,जयदीप कवाडे होते पण विरोधकांनी आम्हाला टार्गेट केलं.चौथ-यावरुन आम्ही परिसरात जयघोष करणा-यांना रोखू शकत नव्हतो,कारण आमच्या हातात ना माईक होता ना भोंगा होता,तिथे नगारे वाजत होते,त्या नगा-यात आमच्या तुतारीचा आवाज कुठे निघाला असता?
जी घटना झाली,नको व्हायला हवी होती परंतू आता ती घडली,त्याचे राजकारण करण्याची गरज नव्हती.बाबासाहेब सर्व धर्मियांना घेऊन चालत होते. धर्मनिरपेक्ष लोकशाहीच त्यांना अपेक्षीत होती आणि संविधानात देखील त्यांनी तीच ठलकपणे अधोरेखित केली आहे.विरोधकांनी फेक नॅरेटिव्ह निर्माण केला,जनतेने त्याला बळी पडू नये,असे आवाहन त्यांनी केले.
……………………….
वाचा भाग-४ मध्ये
उत्तर नागपूरातील मिलिंद इंजिनिअरिंगसाठी शंभर एकर जागेचे गौडबंगाल
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या