कोविडचा काळ आणि डॉ.मानेंची जनतेशी नाळ: जनसेवेचे व्रत ठेवले अखंडीत
नागपूर,ता.१७ नोव्हेंबर २०२४: करोनाकाळात संपूर्ण जग एका वेगळ्याच भयक्रांतामध्ये जगत होते.असा एक ही भू-भाग नव्हता जिथे मृत्यू दबा धरुन बसला नव्हता.अश्यावेळी जनतेचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स हे जनतेसाठी ‘देवदूतच’बनले होते.उत्तर नागपूरात देखील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार डॉ.मिलिंद माने यांनी जनसेवेचा हा शिवधनुष्य लीलया पेलला,यात त्यांना स्वत:ला कोविडचे संक्रमण झाले,पुढे त्यांना ह्दयाघात ही झाला मात्र,या सर्व संकटांतून तावून सुलाखून ते सुखरुप बाहेर पडले आणि वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून आजही त्यांचे हे व्रत अखंडीत सुरु आहे.
‘सत्ताधीश‘ने खास कोविडच्या काळातील त्यांच्या सेवाकार्याचा मागोवा घेतला असता,कोविडच्या काळात शहरातील अनेक डॉक्टर्सनी सुरक्षित अंतर(सेफ डिसटेंस)च्या नावाखाली रुग्णांना दूर ठेवण्याचे काम केले,इतंकच नव्हे तर शहरातील अनेक मोठमोठ्या रुग्णालयांनीही कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे न येता रुग्णालये बंद करुन ठेवली,सेफ डिसटेंसच्या नावाखाली डॉक्टर हा वीस फूटांच्या अंतरावर बसत असे व लांबूनच रुग्णांना औषध सांगत असे,अनेक डॉक्टर्सनी तर रुग्णांसोबत बोलण्यासाठी चक्क माईक लावले होते!असा अनुभव डॉ.माने सांगतात.
अश्या अवस्थेत मी सकाळी १० वा.पासून पहाटे ४-४ वाजेपर्यंत कोविडचे रुग्ण तपासत होतो.कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची रांग माझ्या दवाखान्यासमोर रहात होती.एक-एक रुग्णाचा नंबर लागण्यासाठी ४-४ तास लागायचे,भांडणे व्हायची,पोलिसांची मला व्यवस्था करावी लागली,स्थानिकांनी तर माझे क्लिनिक कोविड पसरण्याच्या भितीने बंद करण्यासाठी तक्रारी केल्या होत्या.परंतू,मी तरीही मी जनसेवा अखंडीत सुरु ठेवली.
माझा दवाखाना हा आजचा नसून गेल्या ४० वर्षांपासून अखंडीत रुग्णसेवा करीत आहे.कोविडच्या भीतीने मी ते बंद ठेऊ शकत नव्हतो.मी कोविडच्या रुग्णांना माझ्या अगदी जवळ डाव्या हाताला बसवून तपासणी करीत होतो.मी अनेकांचे जीव वाचवले मात्र,त्याचे श्रेय घेणे हे याेग्य समजत नाही,असे माने सांगतात.
आम्ही डॉक्टरकीची शपथ घेतो तेव्हा रुग्णसेवा आणि रुग्णांचे प्राण वाचवणे हे आमचे परम कर्तव्य असल्याचे त्या शपथमध्ये म्हणत असतो.परंतू ही माझी मजबुरी आहे मला कोविड काळातील रुग्णसेवा आज सांगावी लागत आहे.रुग्णाला हात लावणे व त्याला बरे करणे हे माझे कर्तव्य होते.मात्र,ही जनसेवा करताना मला देखील कोविडचे संक्रमण झाले.संक्रमणानंतर मला हार्टअटॅक देखील झाला तरी देखील मी ७-८ दिवस रुग्णालयात उपचार घेऊन पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झालो होतो.
कोणाकडूनही पैसे घेतले नाही,एकेका दिवशी शंभर-शंभर रुग्णांची तपासणी मी करीत होतो.माझ्या जीवाची पर्वा न करता मी कोविडच्या काळात रुग्णसेवा केली.माझे जीवन अमूल्य नव्हते का?असा प्रश्न ते करतात.
मी माजी आमदार आहे,नगरसेवक देखील होतो,एक प्रतिथयश डॉक्टर आहे,मला ही कुटूंब आणि नातीगोती आहे.माझी एक मुलगी पायलट आहे,दूसरी मुलगी व मुलगा देखील उच्च शिक्षण घेत होते.माझी पत्नी ही देखील वैद्यकीय सेवेत माझ्या बरोबरीने उभी असते.माझी पत्नी,माझे कुटूंबिय,माझा स्टाफ तासनतास कोविड काळात रुग्णसेवेत व्यग्र होतो,त्यातही चार रुग्ण हे अति गंभीर अवस्थेत माझ्याकडे आले होते. नागपूरातील कोणत्याच रुग्णालयात त्यांना बेड मिळत नव्हते त्यांना मी बेड मिळवून दिले व तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु झाले,मात्र ते चार कोविडचे रुग्ण वाचू शकले नाही,त्यात माझा एक पत्रकार मित्र देखील होता,त्याचा देखील मृत्यू झाला.
कोविड काळातील त्या ह्दयद्रावक आठवणी अश्याप्रकारे डॉ.मिलिंद माने सांगतात.
……………………………….
(वाचा भाग-३ मध्ये
संविधान चौकातील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या चौथ-यावर नारे लागलेच नाही)