फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजनितीन राऊतांवर नाराज मतदार सांगोळेंसोबत!

नितीन राऊतांवर नाराज मतदार सांगोळेंसोबत!

उत्तर नागपूर स्वाभिमानी मतदाता संयोजन समितीचा दावा
नागपूर,ता. १६ नोव्हेंबर २०२४: उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात धनशक्ती विरोधात जनशक्तीचा हा लढा असून, बहूजन समाज पक्षाचे उमेदवार मनोज सांगोळे यांना आम्ही पाठींबा जाहीर केला आहे,अशी माहिती जर्नादन मून यांनी उत्तर नागपूर स्वाभिमानी मतदाता संयोजन समितीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन दिली.
याप्रसंगी बोलताना मून यांनी सांगितले की,मनोज सांगोळे हे सामान्य कार्यकर्ता असून चार वेळा या प्रभागातून नगरसेवक राहीले आहेत.आमच्या समितीने संपूर्ण उत्तर नागपूरात मतदातांशी संवाद साधला व ते काँग्रेसचे विद्यमान आमदार नितीन राऊत यांच्या ‘साहेबगिरी’वर प्रचंड नाराज असल्याचे कळले.यावर कारण विचारले असता,राऊत हे मतदारांना ‘गृहित ’धरुन मतदारांना आपल्या खिशातील सामग्री समजतात,अशी जहाल टिका मून यांनी केली.राऊत एक मगरुर बादशहासारखे उत्तर नागपूरच्या जनतेशी व्यवहार करतात,भेटीची वेळ घेऊन देखील ते जनतेला भेटण्यास टाळतात,त्यांची भेट देखील त्यांचे स्वीय सहाय्यक ठरवतात तेव्हाच भेट होते,असा आरोप त्यांनी केला.ज्या जनतेच्या मतांवर राऊत हे आमदार झालेत,मंत्री झालेत,त्या जनतेची भेट स्वीय सहाय्यक(पी ए)ठरवतील का?असा सवाल त्यांनी केला.उत्तर नागपूरातील गरीब जनतेपासून तर मोठे नागरिक यांना देखील राऊतांसोबत भेटण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते,असा संताप मून यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
आजपर्यंत राऊत यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या ऐकण्यासाठी विविध वस्त्यांमध्ये बैठक घेतली नाही,येथील जनतेला आपल्या समस्या घेऊन त्यांच्या ‘व्हीआयपी’ कार्यालयात जावे लागते,तेथे ही त्यांचे पीए सांगतात,साहेब बैठकीत आहेत,साहेब मुंबईला गेले आहेत,साहेब मात्र,आतमध्ये मोठमोठे ठेकेदार यांच्यासोबत बैठकीत व्यस्त असतात,असा खरमरीत आरोप जनार्दन मून यांनी केला.
एवढंच नव्हे तर नितीन राऊत यांनी आपल्याच कार्यकर्त्यांवर व पदाधिका-यांवर अन्याय करीत त्यांच्या तोलामोलाचे दूसरे काँग्रेसी नेतृत्वच उत्तर नागपूरात निर्माण होऊ दिले नाही.गेल्या पंचवीस वर्षांपासून उत्तर नागपूरात काँग्रेसी कार्यकर्ता हा सतरंज्याच उचलत असल्याची टिका याप्रसंगी जनार्दन मून यांनी केली.
यावर कहर म्हणजे बापानंतर त्यांचा मूलगा उत्तर नागपूरावर दावेदारी प्रस्थापित करीत आहे.घराणेशाहीची पाळेमुळे आम्हाला याच वेळी उखडून टाकायची आहे,अन्यथा प्रामाणिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बापानंतर मुलाच्या हूजूरेगिरीत आयुष्य कंठावे लागेल,असा इशारा त्यांनी दिला.उत्तर नागपूरातून ‘साहेबगिरी’संपविण्याची वेळ आली असल्याचे मून म्हणाले.
बसपाने उत्तर नागपूरात अतिशय चांगला उमेदवार दिला असून,मनोज सांगोळे हे शाहू,फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे.जनतेचा सेवक म्हणून सांगोळे यांचे काम अतिशय चांगले राहीले आहे,आता आमदारकीची संधी देखील सांगोळे यांनाच मिळायला हवी.ही लढाई ‘धनशक्ती’च्या विरोधात ’जनशक्ती’ची असल्याचे मून यांनी सांगितले.उत्तर नागपूर स्वाभिमानी मतदारांनी एकत्रित येत संयोजन समिती स्थापन करुन मनोज सांगोळे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मून म्हणाले.सांगोळे यांचे व्यक्तित्व आणि कार्य बघूनच आम्ही हा निर्णय घेतला आहे.
उत्तर नागपूरात बापा नंतर मूलाला आम्ही आमदार होऊ देणार नाही,असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला.उत्तर नागपूरात काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षाचे उमेदवार आम्हाला नको असून ,एका फोनवर २४ तास सेवा देणारे बसपाचे मनोज सांगोळे यांनाच भारी मतांनी विजयी करण्याचे आवाहन याप्रसंगी जनार्दन मून यांनी केले.
…………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या