फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeब्रेकिंग न्यूजउत्तर नागपूरात काँग्रेसने एमआयएमला समर्थन द्यावे!

उत्तर नागपूरात काँग्रेसने एमआयएमला समर्थन द्यावे!

एमआयएमच्या उमेदवार ॲड. किर्ती डोंगरे यांनी साधला निशाना
एमआयएमचे काँग्रेसला समर्थन हा खोटा प्रचार बंद करा:डोंगरे यांची काँग्रेसवर परखड टिका
नागपूर,ता.१५ नोव्हेंबर २०२४: उत्तर नागपूरात निवडणूकीची रंगत वाढत असतानाच आज दिवसभर एका वेगळ्याच चर्चेने जोर धरला.काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांच्या समर्थनार्थ एमआयएमने माघार घेतली असून राऊत यांना आपले समर्थन, पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्याची चर्चा उत्तर नागपूरात रंगली मात्र,एमआयएमच्या उमेदवार ॲड.किर्ती डोंगरे यांनी आपल्या प्रचार रॅलीत काँग्रेसच्या उमेदवाराचा चांगलाच समाचार घेत, त्यांचे आव्हान अद्याप कायम असल्याचे बजावले.
यावेळी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी उत्तर नागपूरातून काँग्रेसचे जे उमेदवार उभे आहेत ते एमआयएमविषयी फसवा प्रचार करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.आम्ही पत्रकार परिषद घेऊन राऊत यांना समर्थन दिले असल्याची अफवाह काँग्रेस उत्तर नागपूरात पसरवित आहे मात्र,आम्ही संपूर्ण ताकदीने त्यांच्या विरोधात लढत असल्याचा इशारा किर्ती डोंगरे यांनी प्रचारादरम्यान दिला.
काँग्रेसचे उमेदवार हे घाबरले आहेत,त्यांना आमच्या विजयाची खात्री झाली आहे,ते आमच्या खूप मागे चालत आहेत,उत्तर नागपूरात परिवर्तनाची लहर जोमाने वाहत असून, एक सशक्त पर्याय म्हणून एमआयएम उत्तर नागपूरात संपूर्ण ताकदीनिशी लढत देत असल्याचे किर्ती डोंगरे यांनी सांगितले.
एमआयएमचे कोणतेही समर्थन काँग्रेसच्या उमेदवाराला नाही,ही अफवाह ते मुद्दामून पसरवित आहेत.आमच्या सोबत असलेली गर्दी पाहून ते घाबरले आहेत.उत्तर नागपूरात ‘पंतग’चाच जोर आहे.थोड्याच वेळात आमची यशोधरा नगरमध्ये जनसभा होत आहे,मग काँग्रेसच्या उमेदवाराला कशाचे समर्थन आहे?असा सवाल करीत,ते घाबरले असतील तर त्यांनी निवडणूकीतून माघार घ्यावी,त्यांनी आपले समर्थन एमआयएमला जाहीर करावे,असे खुले आव्हान डोंगरे यांनी केले.
याप्रसंगी त्यांच्या समर्थकांनी ‘अभी तो ये अंगडाई है,आगे और लढाई है’असे जोरदार नारे दिले.
……………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या