फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजजात-धर्मा पलीकडे केला पश्चिम नागपुरचा विकास:आ.विकास ठाकरे

जात-धर्मा पलीकडे केला पश्चिम नागपुरचा विकास:आ.विकास ठाकरे

शाश्वत पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर
नागपूर,ता.१० नोव्हेंबर २०२४: अनेक वर्ष प्रलंबित असलेल्या कामांना सर्वात आधी हातशी धरून ते पूर्णत्वास आणण्याचे काम  केले. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पश्चिम नागपुरात कोट्यावंधीचा निधी मंजूर करून केलेली विकास कामे ही आज सर्व प्रभागातून दिसून येत आहे. यातील बहुतांश कामे झाली असून अनेक कामे प्रगतीपथावर आहेत. पश्चिम नागपुरातील प्रत्येक प्रभागात सिमेंट रस्ते, डांबरीकरण, खडीकरण, विद्युत खांब, विद्युत दिवे, आयब्लॉक, ड्रेनेज वॉटर कामे करण्यात आली. विकास कामे करताना कधीही जात-पात धर्म ,पंथ याचा विचार केला नाही. त्यामुळे मतदारांचा आपल्यावरील विश्वास आणखीनच दृढ झाला असल्याचे विधान पश्चिम नागपुरचे विद्यमान आमदार, नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी केले .या विकास कामांच्या पार्श्वभूमीवरच  पुन्हा पाच वर्षासाठी निवडून देण्याचा निर्णय येथील मतदारांनी घेतला ,असा विश्वास  देखील त्यांनी व्यक्त केला.

रविवारी सायंकाळी जन-आशीर्वाद यात्रेदरम्यान सुरेंद्रगढ भवानी माता मंदिरात एका छोटेखानी सभेत विकास ठाकरे म्हणाले की, बदलत्या काळात विकासाच्या बदलत्या संकल्पना आत्मसात करीत ,सामान्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी मागील पाच वर्षांत मी काम केले. जनसामान्यांच्या विश्वासामुळेच काम करण्याचे मला बळ  मिळत आहे. महाविकास आघाडीने मूलभूत समस्या आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी यांसारख्या मुद्द्यांवर विशेष लक्ष दिले. सर्वसामान्यांना लक्षात ठेवून पाच वर्षाचे कामे पश्चिम नागपुरात करण्यात आले. प्रभागातील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्यांना सतत भेडसावणाऱ्या समस्येला प्राधान्य देऊन त्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.
काँग्रेसच्या ‘हात’ला ज्वालाताई धोटेंची साथ –
विदर्भवीर जांभुवतराव धोटे यांची कन्या तसेच विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वालाताई धोटेंनी यांनी मविआचे विकास ठाकरे यांना समर्थन जाहिर केले आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या ५ वर्षांच्या काळात पश्चिम नागपुरात विद्यामन आमदार विकास ठाकरेंच्या विकास कामातून त्यांना जनसमर्थन हे पश्चिम नागपुरात दिसून येत आहे. त्यांनी पश्चिम नागपुरातील प्रत्येक प्रभागात प्रश्नांना सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विदर्भ अन्याय निवारण समिती विकास ठाकरेंच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभी राहणार. शहरातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता विकास ठाकरे यांच्या समर्थनात नागरिकांपर्यंत पोहोचणार असल्याची ग्वाही ज्वालाताई धोटे यांनी दिली. रविवारी विदर्भ अन्याय निवारण समितीचे समर्थन पत्र धोटे यांनी विकास ठाकरेंना दिले. त्यामुळे काँग्रेसच्या चुनाव चिन्ह हाताला ज्वालाताई धोटेंची साथ म्हणजे विकास ठाकरेंच्या विजयाकडे पडलेले आणखी एक भक्कम पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
जन-आशीर्वाद यात्रेत नागरिकांचा जल्लोषात स्वागत-
महाविकास आघाडीचे पश्चिम नागपुरचे लोकप्रिय उमेदवार विकास ठाकरेंच्या जन-आशीर्वाद यात्रेची रविवारी सुरुवात नवीन फुटाळा येथील मनपा मैदानातून करण्यात आली. सकाळी आठ वाजता परिसरातील प्रमुख देवस्थाळांचे पूजन करून प्रारंभ झाले. जन-आशीर्वाद यात्रा पुढे जुना फुटाळा, भरत नगर, तेलंगखेडी, मरारटोली, वाल्मिकी नगर मार्गाने मुख्य चौकात पोहचली. यात्रेत महाविकास आघाडीचे सर्व पक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येत प्रचारार्थ उपस्थित होते.

गोकूळपेठ परिसरातील बुद्ध विहारांना विकास ठाकरे यांनी भेट देत तथागत बुद्ध आणि परम पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करून त्यांनी अभिवादन केले.  यावेळी स्थानिक नागरिकांशी विकास ठाकरे यांनी संवाद साधात त्यांनी गेली पाच वर्ष आपला मतदार क्षेत्रा केलेल्या कामांवर प्रकाश टाकला. ठाकरे यांनी सांगितले की, शहराला पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी आपण वारंवार प्रयत्न करीत आहोत. यंदा महाविकास आघाडीकडे सत्तेच्या दिशेने पाऊल ठेवत आहे. त्यामुळे आगामी काळात आपला पश्चिम नागपुरसह शहराचे नावलौकिक करण्याचा आपला निर्धार असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले.

यानंतर धरमपेठ झोन येथे यात्रेचे समापन झाले. तर सायंकाळी पाचच्या दरम्यान जन-आशीर्वाद यात्रेच्या दुसरा टप्पा माऊंट एवरेस्ट शाळा परिसरातून करण्यात आली. जन आशिर्वाद यात्रेत विकास ठाकरे यांनी जाहिर केलेल्या वचननामाचे वाटप नागरिकांना करण्यात आले. भव्य असलेली प्रचार रैली पुढे बजरंग सोसायटी, मानवसेवा नगर, व्हेटनरी कॉलेज चौक, गांधी पुतळा, सुरेंद्रगढ, भुवनेश्वरी माता मंदीर, सुरेंद्रगढ भवानी माता चौक, देशराज नगर, गुप्ता चौक, न्यू जागृती कॉलनी, मानवता सोसायटी येथे यात्रेचे समापन झाले. नागरिकांच्या प्रचंड उत्साहातून त्यांनी ठाकरे यांना प्रचंड मताधिक्याने विधानसभेत पाठविण्याचा निर्धार केल्याचे दिसून आले. जन-आशीर्वाद यात्रेत महाविकास आघाडीमधील सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी स्वंयफूर्तीने यात्रेचे जागोजागी जल्लोषात स्वागत करुन विकास ठाकरेंना विजयाचा आशिर्वाद दिला.

………………………….

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या