फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूज'वारसा संघर्षाचा, मार्ग संविधानाचा' : गुडधेंनी साधला मतदारांशी संवाद

‘वारसा संघर्षाचा, मार्ग संविधानाचा’ : गुडधेंनी साधला मतदारांशी संवाद

दक्षिण-पश्चिम विधानसभेत काँग्रेसला मिळतेय नागपूरकरांची साथ
नागपूर, ता. ३० ऑक्टोबरः काल उमेदवारी अर्ज दाखल करताच राज्यात चर्चेत असलेल्या नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघ पिंजून काढण्यास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल गुडधे यांनी सुरुवात केली आहे. ‘वारसा संघर्षाचा, मार्ग संविधानाचा’ उपक्रमाअंतर्गत नागरिकांशी संवाद साधण्याच्या अभियानाला आज, बुधवारी ता. ३० ऑक्टोबर  रोजी सकाळी ८ वाजता पासून चिंचभवन येथील दत्त मंदिर जुनी वस्ती येथून सुरुवात झाली.
त्यानंतर स्वामीपुरम, काचोरे कॉलनी, मेहरबाबा नगर, शांतिनिकेतन नगर, राजाराम नगर, वैशाली नगर, प्रभूनगर, गणेश मंदिर न्यू मनिष नगर, सोनेगाव येथील मतदारांशी संवाद साधला. तसेच मतदारांनीही गुडधे यांचे स्वागत केले. या दरम्यान मोठ्यासंख्येत दरम्यान मोठ्या संख्येत काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना प्रफुल्ल गुडधे म्हणाले, ‘मतदारांनी संधी दिल्यास खरा विकास काय असतो ते नागरिकांना दाखवणार, तसेच नागरिकांच्या अडचणी दूर करणार’ असा शब्द दिला. यावेळी प्रामुख्याने अमर मेंढे, प्रणित मोहोड, अभी राऊत, महेश बोडे, रोहित खैरवार, शुभम मांढरे, राजेश खवले. प्रसन्ना जिचकार, पंकज दळवी, कुमार बोरकुटे यांच्यासह मोठ्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.
………………………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या