फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर न्यूजमहर्षी वाल्मिकी जयंती निमित्त भाजपतर्फे अभिवादन

महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त भाजपतर्फे अभिवादन

नागपूर. महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे अभिवादन करण्यात आले. भाजप प्रदेश प्रवक्ते व उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी धरमपेठ वाल्मिकी धाम येथील महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन वंदन केले.

याप्रसंगी अशोक मेंढे, सुभाष पारधी, डॉ. मिलिंद माने, संदीप जाधव, संजय बंगाले, विनोद कन्हेरे, दिलीप गोईकर, अनंत जगनीत, उषा पायलट, इंद्रजीत वासनिक, बबलू बक्सरिया, अजय करोसीया, किशोर बेहाडे, सुनील तुर्केल, शरद पारधी, वत्सला मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी समाजबांधवांनी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातील आदर्शांचे पालन करून समाजाने एकसंघ राहण्याचे आवाहन केले.

नवनियुक्त अध्यक्ष सतीश डागोर यांचे स्वागत

ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी सफाई कर्मचारी आयोग महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त अध्यक्ष सतीश डागोर यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. मंचावर माजी महापौर राजेश तांबे, श्री मेहरोलिया, सुनील हिरणवार, उमेश पिंपरे उपस्थित होते.
……………………….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या