Advertisements


अनिल देशमुख यांचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
नागपूर,१० ऑक्टोबर २०२४: काटोल – नरखेड विधानसभेच्या अनेक विकासकामांच्या आदेशावर नागपूरचे जिल्हाधिकारी हे सही करण्यास तयार नाही. त्यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडुन सही करण्यासाठी मनाई करण्यात आले असल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आमदार अनिल देशमुख यांनी केला.
ही सर्व विकास कामे सर्वसामान्य नागरीकांच्या सोईसाठी असून माझ्या घरची नाही,असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी जर देवेंद्र फडणवीस यांच्या दबावाखाली विकास कामासाठी सत्ताधाऱ्यांचे ऐकून काम करीत असेल तर हे चुकीचे आहे. जिल्हाधिकारी यांनी जर विकास कामांच्या आदेशावर सही केली नाही तर उद्या शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची इशारा अनिल देशमुख यांनी दिली.
काटोल व नरखेड तालुक्यातील अनेक विकास कामांच्या फाईल या जिल्हाधिकारी यांच्याकडे गेल्या वर्षभरापासून करीता प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने पांधण रस्ते, खनीकर्म विकास निधी, जनसुविधा, नागरीसुविधा, ३०५४ तिर्थक्षेत्र, पर्यटन विकास निधी, अनेक प्रकल्पांची भुसंपादन प्रकरणे या सह इतर विभागाच्या कोटयावधी निधीच्या फाईल या जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी प्रलंबीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी त्यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. परंतु असे असतांनाही देवेंद्र फडणवीस यांनी ही सर्व विकास कामे जिल्हाधिकारी यांना रोखण्यास सांगीतले आहेत. भाजपाचे जेथे आमदार आहेत त्या विधानसभा क्षेत्रात मात्र अनेक विकास कामे मंजुर करण्यात येत आहे. त्यांनाही निधी द्यावा यात गैर नाही. परंतु ‘काटोल – नरखेडला विकास निधी देऊ नये ’यासाठी दवेंद्र फडणवीस हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहे हे चुकीचे असल्याचेही अनिल देशमुख यांनी सांगितले.
……………………………
Advertisements

Advertisements

Advertisements
