नागपूर मनपात इलेक्ट्रीक बसेसचा व्यवहार
विकास ठाकरे यांच्या प्रयत्नातून नागपूरकरांच्या पंचाहत्तर कोटींची बचत
नागपूर,८ ऑक्टोबर २०२४: मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या दोन कंपन्या अशा आहेत ज्यांनी भारतीय जनता पक्षाला कंपनी सर्वाधिक रक्कम निवडणूक रोखेंद्वारे दिली. महाराष्ट्र सरकारच्या MSRTC ने पाच हजार इलेक्ट्रिक बसेससाठी मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या उपकंपनीला ८ रुपये प्रति किमी दराने करार दिला होता.
पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी हा निविदा घोटाळा उघड केला आणि नवीन निविदा काढण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत अनेक मुद्दे उपस्थित केले, त्यापैकी एक मुद्दा २५० स्टँडर्ड आकाराच्या इलेक्ट्रिक बसेसच्या खरेदी आणि संचालनासाठीच्या निविदेबाबत होता. त्यांनी या मुद्द्यावर तक्रारही नोंदवली आणि आंदोलनाचा इशारा दिला. परिणामी,नागपूर महानगरपालिकेला नवीन निविदा काढण्यास भाग पाडले, त्यांच्या या प्रयत्नातून ७५.५ कोटी रुपयांची,नागरिकांच्या पैशांची बचत करण्यात आली आहे.
ठाकरे यांच्या वतीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, नवीन निविदेमुळे नागपूर महानगरपालिकेस अनेक यश मिळाले आहेत, कारण त्यांनी भारताच्या इतिहासातील सर्वात कमी दरात इलेक्ट्रिक-चालित बसेसच्या खरेदी आणि संचालनासाठी निविदा मिळवली आहे. इका मोबिलिटी आणि हंसा ट्रॅव्हल्सच्या संयुक्त उपक्रमाने प्रति किमी ₹(२.९)एकूण करारासाठी ₹ (१४८ कोटी) रुपयांचा भरणा केल्यामुळे या नवीन निविदेमध्ये सर्वात कमी दर मिळाला आहे.
नागपूर महानगरपालिकेने मेघा इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या उपकंपनीला ८ प्रति किमी (एकूण करारासाठी ₹,४२३.५ कोटी) दरावर करार देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. एकच बोली प्राप्त होऊनही नागपूर महानगरपालिका या करारावर सह्या करण्याच्या तयारीत होती, हे लोकसभा निवडणुकींच्या आचारसंहितेसह अनेक नियमांच्या विरोधात होते. ठाकरे यांच्या पुढाकाराने नागरिकांच्या पैशांची बचत झाली आहे.
नागपूरकर नागरिकांना नवीन २५० शहर बसेस मिळणार आहेत, त्या देखील स्टँडर्ड आकाराच्या इलेक्ट्रिक बसेस यासाठी आनंद व्यक्त करुन ठाकरे यांनी आपल्या या यशाचे श्रेय नागपूरकरांना दिले.
…………………………..