फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeराजकारणया कारणाने हरल्या केंद्रिय मंत्री स्मृति इराणी....

या कारणाने हरल्या केंद्रिय मंत्री स्मृति इराणी….

Advertisements

अमेठीचे खासदार किशोरीलाल शर्मा यांनी सांगितले कारण
नागपूर,ता.६ ऑक्टोबर २०२४: अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ असे आहेत की जिथे गांधी परिवाराविषयी तेथील जनतेचे भावनिक नाते आहे.मी स्वत: गेल्या चाळीस वर्षांपासून संघटनेचे काम करीत आहे.२०१९ च्या निवडणूकीत पहिल्यांदा गांधी परिवारातील राहूल गांधींचा पराभव झाला मात्र,यानंतर तेथील जनतेच्या मनात या विषयी खूप अपराध भाव होता,त्यात तेथील जनतेला निवडून अालेल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला खासदार स्मृति इराणी यांचे मला ‘बडबोलपण’करणारा असे बोलणे रुजले नाही, त्यामुळे त्यांनी २०२४ मध्ये झालेली चूक सुधारली असे विधान,अमेठीचे खासदार किशोरीलाल शर्मा यांनी आज प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

हा मतदारसंघ स्वातंत्र्य पूर्व काळात १९२१ पासूनच गांधी परिवाराविषयी ऋणानुबंध जपणारा असल्याचे त्यांनी सांगितले. गांधी परिवाराचा नातं अमेठी व रायबरेलीसोबत १०३ वर्षाचं आहे.७ जानेवरी १९२१ मे रायबरेलीत शेतक-यांवर गोळीबार झाला त्यावेळी मोतीलाल नेहरु यांनी पं.नेहरु यांना तिथे पाठवलं.यानंतर फिरोजशहा गांधी,इंदिरा गांधी यांनी आपली पहीली निवडणूक रायबरेलीतून लढली.त्यांच्या कुटूंबातील शीला कौल,कॅप्टन सतीश शर्मा यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढली.यानंतर सोनिया गांधी व आता राहूल गांधी त्या मतदारसघांचं प्रतिनिधित्व करतात.हे नातं तब्बल १०३ वर्षांचं आहे.राहूल गांधी यांनी २००४,२००९ आणि २०१४ ची निवडणूक अमेठीतून जिंकली.२०१९ मध्ये चार लाख ६० हजारच्या जवळपास राहूल गांधींना मते मिळाली होती.५३ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला.याचे कारण भाजपचे सरकार उत्तर प्रदेशात सत्तेत आले होते.

आम्ही देखील कधीकाळी सत्तेत होतो,आता ३५ वर्षांपासून उत्तर प्रदेशात सत्ते नाही तरी देखील कधी पण आम्ही अश्‍या रितीने सत्तेचा दुरुपयोग केला नसल्याचे त्यांनी सांगितले.प्रधान,शासकीय अधिकारी यांना प्रचंड दबावात ठेवण्यात आले होते.रायबरेली व अमेठीचे मतदान एकाच दिवशी होते.निकालानंतर आम्ही या पराभवाचे समीक्षण केले.लोकांमध्ये ज्या प्रकारे १९७० मध्ये इंदिरा गांधींचा पराभव केला त्याच स्वरुपाची अपराधीपणाची भावना अमेठीच्या जनतेमध्ये जाणवली की आमच्यापासून काय चूक झाली?प्रत्येक बूथवर आम्ही दहा मते जरी दिली असती तरी राहूल गांधी विजयी झाले असते,असे त्यांना वाटत होते.त्यांना ही जणू २०२४ च्या निवडणूकीची प्रतिक्षा होती,असे त्यांनी सांगितले.
मी नाव देखील घेणार नाही मात्र,अमेठीच्या भाजपच्या खासदाराने गावाचे प्रधान ज्यांना विकासासाठी पैसा केंद्र शासन देते मात्र,अमेठीच्या खासदारांनी हे सांगण्यास सुरवात केली की,हा पैसा मी दिला आहे,हे तेथील जनतेला रुजले नसल्याचे त्यांनी सांगितले.
स्मृति इराणी यांनी दावा केला होता अमेठीमध्ये ७० वर्षात विकासच झाला नाही त्यामुळे तेथील जनतेने राहूल गांधीचा पराभव केला,याकडे लक्ष वेधले असता,जे हे म्हणतात की अमेठीचा विकासच झाला नाही त्यांनी अमेठीत १९८० मध्ये यायला हवे होते,असे ते म्हणाले.१९८० मध्ये अमेठीत आले असते तर लक्षात आलं असतं अमेठी कुठे होती,कुठे पोहाचली आहे.मुंबईत राहणा-या व्यक्तीला कसे माहिती होणार खेडे गावात काय बदल होत आहे.तिथे मल्टीस्टोरेज इमारती नाहीत.अगदी पहीली मल्टीस्टोरेज इमारत अमेठीत राहूल गांधीनी ७ मजली बनवली होती.मात्र,शंभरच्या वर अनेक लहान मोठे कारखाने अमेठीत सुरु असून लाखो लोकांना त्यातून रोजगार मिळाला असल्याचे शर्मा यांनी सांगितले.एचएएल,गन फॅक्टरी,बीएचएएल,इंडोरामा,वेस्पा स्कूटीची फॅक्टरी,हिंदूस्थान ऐरोनॉटिक्स,पशुशी संबंधित मोठा उद्योग देखील अमेठीत असल्याचे ते म्हणाले.
१९८१ साली संजय गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी हे अमेठीत मतदारसंघात फिरुन जनतेसोबत बोलायचे की या मतदारसंघात त्यांना काय हवे आहे?त्यावेळी तेथील शेतक-यांनी सांगितले की वर्षातून ८ महिने शेतीचे उतपन्न होते मात्र,४ महिने रिकामे राहवे लागते.यानंतर राजीव गांधींना कळले की १२ महिने शेतक-यांनाच काम नाही याचा अर्थ ४ महिने ते मजुरी करतात,त्यामुळे त्यांच्या पुढाकरातून अनेक उद्योगधंदे अमेठीत आले.मी माझ्या डोळ्यांनी अमेठीला बनताना पाहिले आहे.
स्मृति इराणी यांनी खासदार असताना अमेठीत काय विकास केला?असा प्रश्‍न केला असता,त्यांनी जो विकास केला,त्याचे उत्तर त्यांना निवडणूकीत मिळाले असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
अमेठीमध्ये मी गेल्या ४० वर्षांपासून आहे,यंदा माझे ४१ वे वर्ष आहे.वयाच्या २२ व्या वर्षी मी एका ट्रेनिंग प्रोग्रामसाठी अमेठीत आलो होतो.१९८३ पासून मी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत जुळलो.तेव्हा पासून आतापर्यंत मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे.मला काँग्रेसतर्फे आमदारकीची तिकीट तेव्हा मिळाली होती जेव्हा मी वयाची पंचवीसी देखील पूर्ण केली नव्हती.यंदा देखील लोकसभेत मी अमेठीतून वेगळे नाव सूचवले होते पण,त्याने लढण्यास नकार दिला.यानंतर गांधी परिवाराचा ‘आदेश’ आला मलाच अमेठीतून लढावे लागेल.मी अमेठीत तिन पिढ्यांना बदलताना पाहिले आहे.त्यामुळे माझे त्या मतदारसंघात प्रत्येकाशी घनिष्ठ नातं जुळले आहे.राजीव गांधी,साेनिया गांधी व आता राहूल व प्रियंका गांधी यांचा खूप विश्‍वास राहीला आहे माझ्यावर.मी अमेठी आणि रायबरेली निवडणूकीचा प्रभारी देखील राहीलो आहे.
२०१९ मध्ये माझे थोडे लक्ष अमेठीत कमी पडले कारण मी रायबरेलीत व्यस्त होतो त्यामुळे राहूल गांधींचा फक्त ५२ हजार मतांनी पराभव झाला.या दोन्ही मतदारसंघात आमचा लढा खूप प्रभावी नेत्यांच्या विरुद्ध होता,तरी देखील आजपर्यंत आम्ही जी कोणती निवडणूक लढतो ती ‘गरिमापूर्ण’अशीच लढलो.विरोधकांना कधीही वाईट बोललो नाही,ना त्यांच्या उमेदवारांना ना त्यांच्या पक्षाला,आम्हाला ते काहीही बोलत होते मात्र,ते त्यांचे संस्कार होते.मला स्मृति इराणी ‘बडबोले’म्हणाल्या,त्या माझ्या पेक्षा लहान वयाचा असल्याने मी त्यांना माफ केले मात्र,जनतेनी तिला माफ केले नाही,असे किशोरीलाल शर्मा यांनी सांगितले.
आज डॉ.जाकीर यांच्या विचार मंचच्या कार्यक्रमासाठी मी नागपूरात आलो असल्याचे त्यांनी सांगितले.नागपूरमध्ये मी १९९१ साली सर्वात पहिल्यांदा आलो.दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या बलिदानानिमित्त त्यांची कर्मभूमी,बलिदानभूमीचे संयोजन करण्यात आले असताना मी नागपूरमधून पण प्रवास केला होता. काँग्रेस नेते अविनाश पांडे यांच्या मुलाच्या लग्नात मी नागपूरात दुस-यांदा आलो होतो,आज तिस-यांदा नागपूरात कार्यक्रमासाठी आलो आहे.मी कालच नागपूरात येणार होतो मात्र,माझ्याच मतदारसंघात अमेठीमध्ये चार लोकांची हत्या झाली ज्यामध्ये एक चार व एक सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.त्या हत्याकांडामुळे मला संपूर्ण तपास होईपर्यंत आपल्याच मतदारसंघात राहणे गरजेचे होते,असे त्यांनी सांगितले.
नागपूरात पत्रकार परिषद पहिल्यांदाच घेत असल्याचे त्यांनी सांगितले.मला नागपूरात पत्रकार परिषद घेण्याचा अनुभव नाही.अमेठीत महाराष्ट्राचे देखील पत्रकार येतात.त्यांना योग्य तो सन्मान मी देतो.आमच्या विषयी लिहा किवा लिहू नका,मात्र, मी त्यांना ‘News‘लिहा ‘ Viwes‘लिहू नका एवढेच सांगतो,असे एका प्रश्‍नाच्या उत्तरात ते म्हणाले.

ईडीचा दुरुपयोग होत आहे का?यावर बोलताना,आमच्या सहका-यांवर ईडीची कारवाई झाली,त्यांना भाजपमध्ये येण्यास सांगण्यात आले मात्र,त्यांनी नकार दिला,ईडीच्या कारवाईला सामोरे जाऊ पण भाजपात येणार नाही,असे त्यांना सांगितले,असे उत्तर खा.शर्मा यांनी दिले.

मोदी सरकारच्या तिस-या टर्मला शंभर दिवस झाले,कसा हिशेब घ्याल? यावर,आम्ही त्यांचा हिशेब संसदेत घेतो,असे उत्तर त्यांनी दिले.
राहूल गांधीनी कोल्हापूरमध्ये विधान केले की जात गणनेसोबतच आरक्षणाचा कोटा ते ५० टक्क्याहून जास्त करतील,यावर सोशल मिडीयावर कठोर टिका होत असून,खुल्या वर्गाने काँग्रेसला मत का द्यावं?असा प्रश्‍न केला असता,ते आर्थिक दुर्बल घटकाविषयी देखील बोलत असल्याचे शर्मा म्हणाले.संसदेत व संसदेच्या बाहेर राहूल गांधी हेच सांगत आहेत आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणात सगळेच सामावून जातात.संसदेत त्यांचे हे बोलणे तर पटलावर आले आहे,असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला हैदल अली,संजय दुधे,रमण पैगावार आदी उपस्थित होते.
………………………………..
Advertisements
Advertisements
Advertisements
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या