नागपूर,ता.५ ऑक्टोबर २०२४:भारतीय जनता पक्षातर्फे उद्या रविवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दूपारी १२ वा.दरम्यान ‘महाजनसंपर्क’अभियान राबविला जाणार असून,एकाच वेळी १० वर्षात त्यांच्या सरकारने काय केले याची माहिती घरोघरी पोहोचवणार असल्याची माहिती, आज पत्रकार परिषदेत भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली.
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणक़ुळे यांच्या नेतृत्वात नागपूरातील एकूण २,१५८ बूथवरील मतदारांपर्यंत भाजपचे ३४ शक्ती केंद्र प्रमुख,प्रवासी प्रमुख,प्रभावी कार्यकर्ते,वॉर्ड प्रमुख,४६ प्रकोष्ठ,७ जनआघाड्या,५ हजार ३०० पदाधिकारी,२ हजार १५८ बूथ प्रमुख,३ हजार कार्यकर्ते हे या महाजनसंपर्क अभियानामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली.आतापर्यंंत केलेला विकास पत्रकाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवला जाईल.या शिवाय शत-प्रतिशत मतदानासाठी जनजागृती केली जाईल तसेच लोकसभेत मतदान केलं का?लोकसभेच्या निवडणूकीत किती नावे मतदार यादीतून डिलिट झाली?याचा देखील मागोवा या महाजनसंपर्क अभियानातून घेतला जाईल,असे कुकडे यांनी सांगितले.
पूर्व नागपूर व मध्य नगपूरात गडकरी या महाजनसंपर्क अभियानात सहभागी होतील.दक्ष्ण व दक्ष्ीण-पश्चिममध्ये फडणवीस,पश्चिम नागपूरात कैलास विजयवर्गीय संपर्क करतील तसेच बावणकुळे व ॲड.धर्मपाल मेश्राम हे उत्तर नागपूरात मतदारांसोबत घरोघरी जाऊन संपर्क करतील अशी माहिती त्यांनी दिली.या अभियानात भाजपचे आमदार प्रवीण दटके,कृष्णा खोपडे,विकास कुंभारे,मोहन मते,माजी आमदार गिरीश व्यास,मिलिंद माने,अनिल सोले आदी हे देखील आपापल्या बूथवर संपर्क करतील.या सर्व ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित वकील,डॉक्टर,अभियंते,स्वयंसेवी संस्थांचे संचालक,सामाजिक क्षेत्र,क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठितांशी संपर्क साधल्या जाईल.निवडणूका हा लोकशाहीचा उत्सव असतो त्यामुळेच येत्या विधान सभा निवडणूकीत शत-प्रतिशत मतदानासाठी मतदारांना प्रोत्साहित केले जाईल,असे त्यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याच्या विधान सभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नेते व पदाधिका-यांसोबत बैठकींचा धडाका लावला आहे,बैठकीत बूथवर कॅटेगिरीनिहाय मतदान वाढवा,भाजपचा मतदार जिथे-जिथे आहे तिथे मतदान वाढवा,असा सल्ला त्यांनी दिला आहे,त्याची ही अंमलबजावणी आहे का?असा प्रश्न केला असता,बी,ए,ए प्लस,सी अशी बूथची वर्गवारी असते.नागपूरात ४५८ बी ग्रेडचे बूथ आहेत,ते ए प्लस बनू शकतं,आम्ही मतदारांना परत संपर्क करु,असे उत्तर त्यांनी दिले.
लोकसभेच्या निवडणूकीत भाजपने असेच ‘घर चलो’अभियान राबवले होते मात्र,याचे अपेक्षीत यश मिळाले नाही,याकडे लक्ष वेधले असता,त्या अभियानातून आम्ही १३ लाख नागरिकांचे मोबाईल क्रमांक जमा केले,या अभियानात आम्हाला त्याचा लाभ होईल,असे उत्तर त्यांनी दिले.एका बूथवर ३१ जणांची समिती,बूथ अध्यक्ष,मंत्री,महामंत्री,त्यांचे प्रत्येकी पाच कार्यकर्ते,भाजपची महिला आघाडी,युवा आघाडी,अनुसूचित जाती-जमाती आघाडी,ओबीसी मोर्चा असे सर्व ‘चोवीस बाय सात’ काम करतात,भाजप हा ‘चोवीस बाय सात ’काम करणारा आणि जनतेच्या संपर्कात राहणारा राजकीय पक्ष असल्याची पुश्ती त्यांनी जोडली.
उद्याच्या महाजनसंपर्क अभियानात आम्ही सूचना पुस्तिका देखील जनतेला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यात जनतेच्या सूचनांची दखल घेतली जाईल,असे ते म्हणाले.यावर मतदारांनी जर सांगितले की ते राहूल गांधीच्या पक्षाचे मतदार आहेत तर?असा प्रश्न केला असता,आम्ही त्यांना ‘नमस्कार’म्हणू,अशी कोटी याप्रसंगी बंटी कुकडे यांनी केली.
उद्याच्या महाजनसंपर्क अभियानावर भाजपचे विधान सभेचे आमदार,मंडळ अध्यक्ष,निवडणूक प्रमुख,संयोजक हे लक्ष ठेवणार असल्याचे,एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.
नागपूरात आम्ही सहाच्या सहा विधानसभेच्या जागा लढणार असल्याचे त्यांनी सांगितले.युतीतील एका पक्षाच्या उमेदवाराची ईच्छा आहे पूर्व नागपूरातून लढण्याची मात्र,भाजप नागपूरात युतीला एक ही जागा सोडणार नसल्याचे बंटी कुकडे यांनी सांगितले.राष्ट्रवाादी अजित पवार गटाच्या नेत्या आभा पांडे या पूर्व नागपूरातून लढण्यास इच्छूक आहेत,हे विशेष.
नागपूरातील सहा ही जागा भाजप लढणार आहे मात्र,यावेळी एका तरी महिला उमेदवाराला भाजपकडून संधी मिळेल का?असा प्रश्न केला असता,भाजपमध्ये सामुहिक निर्णय प्रक्रिया राबविली जाते,या विषयीचा निर्णय सामुहिकरित्या पक्ष श्रेष्ठी घेतील असे उत्तर त्यांनी दिले.
नागपूरात भाजपला कोणत्याही प्रकारचा ‘फटका’बसणार नाही उलट बाकीच्यांना ‘फटाके’लागतील,असे उत्तर एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी दिले.
]चे महेश बावणकुळे यांनी त्यांच्या ३०० कार्यकर्त्यांसोबत भाजप प्रवेश केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
पूर्व नापूरात भांडेवाडी येथील डंपिंग यार्डचा विरोधकांनी मोठा मुद्दा केला आहे,याकडे लक्ष वेधले असता,विरोधकांकडे एकच मुद्दा आहे,शहराचा कचरा जाणार कुठे?असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
लोकसभेत भाजपला नागपूरात ५४.६० टक्के मते मिळाली असून ३३ हजार मते डिलिट करण्यात आली होती.दोन लाख मतदारांची नावे गायब झाली होती अन्यथा गडकरी यांना ५ ते ६ लाखांची लीड मिळाली असती,असा दावा त्यांनी केला.
याप्रसंगी आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपूरात दोनशे कोटींच्या विकास कामाचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती दिली.येत्या पाच दिवसात पूर्व नागपूरातील ४५ एकर जागवेर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नरसिंह पुंजी शाळेचे भूमिपूजन होणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले.गुंठेवारीअंतर्गत पूर्व नागपूरातील नागरिक जेव्हा कब्जा पत्र मागायला जात होते त्यांच्याकडून दोन-दोन,पाच-पाच लाख रुपये मागितले जात होते,मात्र,ज्या प्लॉट धारकांनी,घर मालकांनी तीन हजार रुपये नासुप्रमध्ये भरले आहेत,त्यांना फक्त स्टॅम्प ड्यूटी भरुन कब्जा पत्र केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिले जाणार असल्याचे खोपडे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत भाजप आमदार कृष्णा खोपडे,विकास कुंभारे,राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड.धर्मपाल मेश्राम,संजय बंगाले,चंदन गोस्वामी आदी उपस्थित होते.