फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइमएमडी तस्कराकडून पोलिसाचीच वसूली!

एमडी तस्कराकडून पोलिसाचीच वसूली!

पोलिस उपनिरीक्षक सिद्धार्थ पाटील निलंबित
राजकीय दबावाचीही चर्चा!
नागपूर,ता.२०  सप्टेंबर २०२४: एमडी तस्कराशी संबंध ठेवणे व त्याच्याकडून वसुली करणे पोलिस उपनिरीक्षकाला चांगलेच भाेवले.याप्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी एएसआय सिद्धार्थ पाटील याला निलंबित केले.ते पोलिस मुख्यालयात तैनात आहेत.
पाटील या पूर्वी गुन्हेशाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकात तैनात होते.या कारवाईमुळे गुन्हेशाखेत तैनात अधिकारी व कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार,२० ऑगस्ट रोजी गोपनिय माहितीच्या अाधारे ॲन्टी नार्कोटीक्स सेलने कपिल गंगाधर खोब्रागडे,अक्षय बंडू वंजारी व राजेश अनंतराव गिरी या तिघांनाही अटक केली.त्यांच्याकडून ९० लाख रुपये किमतीचे एमडी जप्त केले.या प्रकरणी ताजनगर टेकानाका येथील रहिवासी मकसूद अमिनोद्दीन मलिक, हिवरीनगर येथील रहीवासी गोलू बोरकर,हिंगणा येथील रहीवासी अक्षय बोबडे,सारंगपूरचा रहीवासी सोहेल व अल्लारखा एक फरार झाले होते.
पोलिसांनी चौकशी केली असता अक्षय हा नंदनवनमधील गुन्हेगार गोलू याला एमडी विकत होता,असे समोर आले.पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी फास आवळले असता कारवाई न करण्यासाठी सिद्धार्थ पाटील ,गोलूकडून वसुली करीत असल्याचे समोर आले.गोलूला अटक़ न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली नंतर ७० हजार रुपयांमध्ये प्रकरण निकाली काढण्यात आले.
यानंतर गोलूच्या आईने पोलिस अायुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडे खंडणीची तक्रार केली.पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतर पाटील यांची चौकशी करण्यात आली.तपासादरम्यान गोलू व सिद्धार्थ यांच्यात पैशांचा व्यवहार झाल्याची पुष्टी झाली.त्यानंतर सिद्धार्थला पोलिस मुख्यालयात पाठवण्यात आले.
चौकशीत दोषी आढळल्याने पाटील याला निलंबित करण्यात आले असून विभागीय चौकशीचे आदेश दिले.पाटील याच्याविरुद्ध कारवाई न करण्यासाठी राजकीय दबावही आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता,अशी चर्चा पोलिस विभागात आहे.
…………………..
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या