काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्ता रागिनी नायक यांची घणाघाती टिका
मोदींचे ‘बेटीयो ’विषयीचे नारे तकलादू
अल्पवयीन मुलींविराेधात गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक
शिंदेंची अंतरात्मा मेली आहे:महाराष्ट्रात दररोज २१ बलात्कार
देशासाठी हा अमृतकाल की अन्याय काल?नायक यांचा सवाल
बदलापूरसाठी मोदींचे ट्टीट कोणी पाहिले का?
नागपूर,ता.२३ ऑगस्ट २०२४: बदलापूर येथील एका नामांकित शाळेत १३ ऑगस्ट रोजी चिमुकल्यांसोबत जे घडले त्या विरोधात शाळेत होणा-या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी एका मराठी दैनिकांची महिला वार्ताहर मोहिनी जाधव जात असताना, माजी नगराध्यक्ष आणि शिंदे सेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी मोहिनी यांना अडवून,तुम्ही पत्रकार बातम्या करतात,आग लावतात आणि निघून जाता,अश्या भाषेत बोलले,आम्ही काय असं केलं,असे विचारले असता,तुम्ही शहानिशा करायला हवी होती बातमीची की खरंच चिमुकल्यांवर बलात्कार झाला की विनयभंग झाला,असे ते बोलले.आम्ही शहानिशा करुनच बातमी केली,असे मोहिनी यांनी सांगितल्यानंतर ते आणखी चिडले व खरं तर पत्रकारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे असे बोलून,पत्रकारांना अटक करायला हवी असे म्हणाले.यावर मोहिनी यांनी सांगितले की तसं तुम्ही सांगा पोलिसांना तर आणखी चिडून ,तुझ्यावर बलात्कार झाला आहे का?तू बातमी करायला आली,अश्या शब्दात महिला पत्रकाराशी असभ्य भाषेत वामन म्हात्रे बोलले.ही घटना फक्त लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर घाव घालणारीच नव्हे तर महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात, महिलांविषयीची निम्नस्तराची मानसिकता ठलकपणे अधोरेखित करते.यावर आज नागपूरात प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या रागिनी नायक यांना प्रश्न विचारला असता,याला विकृत मानसिकता ही नाही म्हणू शकत,ही घटना सत्ताधा-यांचे चाल,चरित्र आणि चेहरा समोर आणते,असे त्या म्हणाल्या.त्यांची तर मानसिकताच महिला विरोधी असल्याची टिका त्यांनी केली.
जोपर्यंत दुस-या महिलेवर बलात्कार होत नाही तोपर्यंत त्या बलात्कार पिडीतांवर झालेल्या अन्याया विरोधात बाेलू ही शकत नाही का?हा कश्याप्रकारचा माहोल आहे महाराष्ट्रात?प्रश्न विचारण्याचा जो संवैधानिक अधिकार आहे,भारताच्या नागरिकांकडे,त्या अधिकारांचा गळा घोटणारी कृती असल्याचे त्या म्हणाल्या.तसेही भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राजकारण ही ‘अंगुठा टेक’राजकारण आहे,याचा अर्थ ,मी जे म्हणालो ते म्हणालो,यालाच ‘हूकूमशाही’म्हणतात,तीच वृत्ती प्रादेशिक नेत्यांमध्ये देखील आली असल्याची टिका नायक यांनी केली.प्रश्न विचारल्याने लोकशाही मजबुत होत असते.सरकारला सातत्याने प्रश्न विचारले गेले पाहिजे.त्यांचे सातत्याने उत्तरदायित्व निश्चित झाले पाहिजे.आता या देशातील महिलांना कळून चुकले आहे त्यांना एकत्रित येत,एकमेकींची मदत करावीच लागेल.त्या महिला पत्रकाराने खूप चांगले केलं,तिने प्रश्न विचारल्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांची मानसिकता जनतेसमोर आली,असे नायक म्हणाल्या.
सत्तेच्या खूर्चीवर बसण्यासाठी निर्भया घटनेनंतर याच मोदींनी नारे दिले होते ’बहोत हूआ नारी पर वार’,‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ते नारे किती कुचकामी होते हे बदलापूरच्या घटनेने देशासमोर सिद्ध केले.बेटी वाचेल तरच शिकेल ना,असे म्हणायची वेळ आली आहे.खरे तर ‘भाजपा पासून बेटिया बचाओ’म्हणायची वेळ आली असून गेल्या दहा वर्षांपासून रक्षकच भक्षक झाल्याचे दिसून पडत असल्याची टिका त्यांनी केली.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो(एनसीआरबी)चे आकडे सांगतात आपल्या देशात दररोज ८६ बलात्कार होतात. २०१९ ते २०२३दरम्यान लहान-लहान मुलींच्या लैंगिक शोषणात ९६ टक्के वाढ झाली आहे.महाराष्ट्रात २० हजार ७६२ घटना अल्पवयीन मुलींसोबत घडल्या असून देशात अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या गुन्हात महाराष्ट्राचा पहीला क्रमांक आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात महिलांविरुद्ध ४७ हजार३८१ गुन्हे घडले.२०२१ मध्ये महाराष्ट्रात ७,५२१ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली,याचा अर्थ महाराष्ट्रात दररोज २१ बलात्काराच्या घटना घडतात.
बदलापूरच्या घटनेने राज्य हादरले असतानाच अकोलामध्ये शिक्षकानेच सात लहान-लहान शालेय
विद्यार्थिनींचे ,पोर्न व्हिडीयो दाखवून लैंगिक शोषण करण्याची धक्कादायक घटना समोर आली.मुंबईत आणखी ४ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाले.अकोलामध्ये दहा वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या करुन मृतदेह शेतात फेण्यात आला या सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी काय केले?असा प्रश्न नायक यांनी विचारला.
आपले पंतप्रधान तर प्रज्जवल रेवण्णा सारख्या बलात्का-यासाठी भर सभेत टाळ्या वाजवून-वाजवून त्याच्यासाठी मत मागत होते.एकनाथ शिंदे यांना १५ ऑगस्ट रोजी मुंबईत मनपाच्या नव्या इमारतीचे उद् घाटन करायचे असल्याने १३ ऑगस्ट रोजी अवघ्या साढे तीन वर्षांच्या मुलींसोबत घडलेल्या बलात्काराच्या घटना दाबून टाकण्यात आल्या.बदलापूरच्या रेल्वे रुळावर आंदोलन करणा-या ४०० लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम शिंदेंनी केले.४० आंदोलनकर्त्यांना अटक झाली.तुरुंगात डांबण्यात आले.आंदोलनकर्त्यांना सामोरे जाण्या ऐवजी राज्याचे गृहमंत्री फडणवीस बीडमध्ये मतांचा जोगवा मागत होते.त्यांच्याकडे दिल्लीला जाऊन मोदी-शहा यांची चाटूकारिता करण्यासाठी वेळ असतो मात्र,त्यांच्याच राज्यात न्यायासाठी लोक रसत्यावर उतरले आहे,याची ते फिकिर करीत नाही.पोक्सोचा गुन्हा घडला असताना,कायदे धाब्यावर बसवून बदलापूरची पोलिस, पिडीत चिमुकल्यांच्या पालकांना १२ तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवते.त्यातील एक आई गर्भवती होती.एवढी देखील माणूसकी राज्यातल्या सत्ताधा-यांमध्ये उरली नसल्याची कठाेर टिका याप्रसंगी नायक यांनी केली.
हे मी सांगत नसून ‘महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स’(एमएससीपीसीआर)च्या मुख्य सूसीबेन शाह यांच्या अहवालात नमूद आहे.राहूल गांधी यांनी हेच तर विचारले आहे,पिडीतांची एफआयआर दाखल होण्यासाठी आता आंदोलने करावी लागेल का?न्यायासाठी पिडीतांना पोलिस ठाण्यापर्यंत जाण्यासाठी ही इतकी वेदना भोगावी लागते?असा सवाल त्यांनी केला.मुख्यमंत्री शिंदे,फडणवीस,शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची अंतरआत्मा मेली आहे का?शाळेच्या शौचालयात दोन निरागस मुलींसोबत बलात्कार होतो पण,शाळेसोबतच संपूर्ण पोलिस विभाग पिडीतांना न्याय देण्या ऐवजी प्रकरण दाबण्यासाठी साम,दाम,दंड,भेदाची नीती अवलंबितात?कारण ती शाळा भाजपची आहे म्हणून !शाळेतील विश्वस्तांमधील सदस्य तुषार आप्टे याचा भाऊ चेतन आप्टे बदलापूर शहर भाजपचा उपाध्यक्ष आहे.आणखी एक विशवस्त नंदकिशोर पाटकर हा देखील भाजपचाच कार्यकर्ता आहे.
कुलदीप सेंगरपासून तर बृजभूषण शरण सिंह यासाररख्या आरोपींना वाचवण्यासाठी भाजप सतत तत्पर दिसून पडते.उत्तरप्रदेशात तर मुख्यमंत्री योगीने चिंमयानंद यांच्यावर लागलेले बलात्कार व अपहरणाचे सर्व आरोप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.ज्या पक्षाचा सर्वोच्च नेता हा कोणाच्या बायकोला ‘५० करोड की गलफ्रेंड‘ म्हणतो,सोनिया गांधींसाठी ‘काँग्रेस की विधवा’असे शब्द वापरतो,जो प्रज्वल रेवण्णासारख्या बलात्का-यांसाठी मते मागतो,त्या पक्षाच्या नेत्यांकडून काय अपेक्षा ठेवणार?असा सवाल त्यांनी केला.
नागपूर संघाचा गड आहे असे सांगून,महिला विरोधी मानसिकतेमध्ये संघ देखील कुठेही कमी नसल्याची जळजळीत टिका त्यांनी केली.‘ढोल,गंवार,शुद्र,पशु,नारी,सकल ताडन के अधिकारी’ही यांची खरी मानसिकता असल्याचे त्या म्हणाल्या.सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वत: अनेक वेळा महिलांविषयी वादग्रस्त विधाने केली आहेत.त्यांच्या मतानुसार बलात्कार फक्त शहरात होतात,ग्रामीण भागात नाही,त्यामुळेच बदलापूरच्या घटनेमुळे त्यांच्या तोंडात दही जमले असावे.२०१३ मध्ये याच भागवतांनी नवरा-बायको संबधांविषयी बोलताना,नव-याला खुश ठेवणे हे बायकोचे सामाजिक उत्तरदायित्व असल्याचे सांगून, ज्या बायका नव-याला खुश ठेवीत नाही त्यांना सोडून दिले पाहिजे,असे वादग्रस्त विधान केले असल्याची आठवण नायक यांनी करुन दिली.
माझे महाराष्ट्रातील सत्ताधा-यांना पाच प्रश्न आहेत,ज्या शाळेत चिमुकल्यांचे लैंगिक शोषण झाले त्या शाळेत सीसीटीव्ही कॅमरे व निरागस मुलींना शौचालयापर्यंत घेऊन जायला महिला कर्मचारी का नव्हती?महाराष्ट्रातील शाळांमधील ‘सखी सावित्री’समिती कुठे गायब आहे?केंद्राकडे गेल्या चार वर्षांपासून पडून असणारा शक्ती कायदा आतापर्यंत का संमत नाही झाला? एवढ्या संवेदनशील घटनेवर आंदोलनकर्त्यांना रस्त्यावर उतरुन रेल्वे रोखून ठेवणे,मुंबई हायकोर्टाने यावर सुमोटो घणे,राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने तसेच राष्ट्रीय बाल हक्क समितीद्वारे नोटीस पाठवून अहवाल मागेपर्यंत, राज्यातील महायुतीची सरकार झोपेत का राहीली?वरुन विरोधकांवर ते राजकारण करीत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष करीत आहे,५०० आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करुन ७२ आंदोलनकर्त्यांना तुंरुंगात डांबण्यासाठी जी तत्परता महायुती सरकारने दाखवली तीच तत्परता पिडीतांना न्याय मिळवण्यासाठी का नाही दाखवली?असे सवाल त्यांनी केले.वास्तवतेत सत्तेची नशा आणि मगरुरी डोक्यात भिनली असून,महिलांविषयीच्या तुच्छतेच्या मानसिकतेत संघ देखील कमी नसल्याचा आरोप त्यांनी केला.फक्त विजयादशमीच्या दिवशी ते नारी शक्तीला वंदन करतात,मात्र देशात हा अमृतकाल सुरु आहे की अन्यायकाल?हे सांगत नाही,असा टोमणा त्यांनी मारला.
२०१२ साली दिल्लीत दूर्देवी निर्भया घटना घडली त्यामुळे आधी दिल्लीत त्यानंतर देशात आमची सत्ता गेली,मात्र तरी देखील आम्ही निर्भया घटनेनंतर न्यायमूर्ती वर्मा समिती गठीत केली,निर्भया फंड सुरु केला,महिलांविरोधात कायदे कठोर केले मात्र,सतत ‘बेटीयो‘साठी काळजी वाहणारे देशाचे पंतप्रधान यांनी निर्भया फंड देखील ‘अखर्चित‘ ठेवला असल्याचा आरोप नायक यांनी केला.मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते,त्यांच्यावर बलात्कार होतो त्यावेळी ५६ इंच छातीवाल्याचं मन दगडाचा होतो,अशी टिका त्यांनी केली.
कंगना रनौत यांचे एक बयाण पुढे आले असून त्यात मोदी यांनी लाल किल्यावरुन माता भगिनींना उद्देशून,’मुलींना नाही आपल्या मुलांना विचारा ते कुठे जात आहे’असे म्हटले होते,याची आठवण रनौत यांनी करुन दिली आहे,यावर प्रश्न विचारला असता,‘मोदी की बातो पर मोदी को ही विश्वास नही‘,असे सांगून रनौत यांच्या राजकारणात गांर्भीय नसल्याचे नायक म्हणाल्या.आपल्या देशात महिलांच्या सुरक्षेविषयी अनेक कायदे आहेत मात्र,देशातील अनेक सरकार ते गुन्हेगारांच्या संरक्षणासाठी वापरतात तेव्हा त्या राज्यात महिलांविषयीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असते.महिलांविरुद्ध गुन्हे करणारे तुरुंगातून सुटल्यावर त्यांना हारतुरे घालून सत्कार करणारे भाजपचेच लोक असल्याचा आरोप याप्रसंगी नायक यांनी केला.
आम्हाला गर्व आहे ‘इंडिया‘ गठबंधनमध्ये असताना देखील राहूल गांधींनी सोशल मिडीयावर पं.बंगाल सरकारच्या विरोधात कठोर टिका केली.आम्ही प.बंगाल व महाराष्ट्रात आंदोलन ही केले.पोलिसांच्या लाठ्या ही खालल्या मात्र,पंतप्रधान मोदी यांचे बदलापूरच्या घटनेवर एक तरी ट्टीट आहे का?असा सवाल त्यांनी केला.
येणा-या निवडणूकीत जनतेने मन बनवले आहे,सत्ताधा-यांना पुन्हा लोकसभेसारखेच ‘वोट की चोट’देंगे,असा दावा नायक यांनी केला.