फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइममनपा कर्मचारी ’एमडी’रॅकेटचा सूत्रधार!

मनपा कर्मचारी ’एमडी’रॅकेटचा सूत्रधार!

९० लाखांचे ‘एमडी’जप्त

नागपूर,ता.२२ ऑगस्ट २०२४: शहरात मोठ्या प्रमाणात मेफोड्रोन(एमडी)या अमली पदार्थांची जप्ती वाढली असून शहरातील त्याचे नेटवर्कही शोधण्यास पोलिस सज्ज झाली आहे.धक्कादायक बाब म्हणजे या रॅकेटमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एक कर्मचारी देखील सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांनी बुधवारी या कर्मचा-याकडून व त्याच्या सहका-यांकडून ९० लाखांची एमडी पावड जप्त करीत त्याला अटक केली.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बुधवारी सकाळी नंदनवर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई पार पडली. पोलिसांनी सापळा रचून हिवरीनगर बगिच्या समोरील लोहाना भवनाजवळ कपिल गंगाधर खोब्रागडे(वय ४०,राजेंद्रनगर झोपडपट्टी,आंबेडकर चौक)राकेश अनंतराव गिरी(वय ३१,नंदनवन झोपडपट्टी) व अक्षय बंडू वंजारी(वय २५,जुना बगडगंज,बजरंगनगर)यांना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ ९०.७० लाख रुपये किमतीची ९०७ ग्रॅम पावडर आढळली.पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाईल व वजनकाट्यासह ९१.१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

यातील कपिल हा मनपाच्या आरोग्य विभागाता सुपरवायझर म्हणून कार्यरत असल्याचे समोर आले आहे.तो वर्ग-तीन चा कर्मचारी असू शकतो,असे सांगितले जात आहे.कपिल विरोधात एनडीपीएस अंतर्गत या पूर्वीसुद्धा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच राकेश व अक्षय यांच्या विरोधातही गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने,मनोज नेवारे,पवन गजभिये,शैलेश डोबोले,रोहित काळे,राहूल पाटील,शेषराव रेवतकर,सुभाष गजभिये व सहदेव चिखले यांच्या पथकाने केली.
या खरेदी-विक्रीच्या टोळीमध्ये मध्य प्रदेशातील सारंगपूर येथील सोहेल,टेका-ताजनगरमधील मकसूद अमीनुद्दीन मलिक,गोलू बोरकर(हिवरीनगर)अक्षय बोबडे(हिंगणा)अल्लारखा(हिंगणा)हे देखील सहभागी आहेत.त्यांंच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरु आहे.यातील मकसूद हा सराईत ड्रग डिलर असल्याचे वास्तव समोर आले आहे.
……………….

- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या