फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeक्राइम‘कलाकार’पोलिस निलंबित

‘कलाकार’पोलिस निलंबित

स्वातंत्र्य दिनी‘खईके पान बनारस वाला’ गाण्यावर नाचणे पडले महागात
कारवाई चुकीची:पोलिस विभागात हळहळ
डॉ.ममता खांडेकर
(Senior Journalist)
नागपूर,२१ ऑगस्ट २०२४: ‘संगीत’ही माणसाला वेड लावणारी कला आहे,मूळात भगवान श्री गणेशांना अवगत असणा-या १८ विद्या ६४ कलांपैकी ‘संगीत‘ ही कला सर्वाधिक ‘प्रिय ’आणि ‘लोकप्रिय’ असून भारत सारख्या देशात तर संगीताच्या चाहत्यांची संख्या कोट्यावधीमध्ये आहे.भारतासह अनेक देशात संगीताचा वापर अनेक मेंदू संबंधित उपचारासाठी केला जातो,यावर बरेच संशोधन देखील झाले आहे.त्यात स्वातंत्र्यदिनसारख्या उत्सव असेल,समोर माईक असेल,गळ्यात सुरेल स्वर असेल,अंगात भिनलेली लय असेल तर कोणालाही गाण्याचा व त्यावर थिरकण्याचा मोह आवरणार नाही,फक्त पोलिसांना असा ‘आनंद’कायद्याच्या भाषेत वर्ज्य आहे.पोलिस महासंचालकांचा अध्यादेश आहे वर्दीवर असताना गाणे,नृत्य असा प्रकार पोलिसांनी करु नये,मात्र,मूळात कलाकार असणा-या तहसील पोलिस ठाण्यातील पोलिसांना संगीताचा आंनद लृटण्याचा मोह आवरला नाही,शिस्त मोडल्याचा आरोपाखाली निलंबनाला त्यांना सामोरे जावे लागले.
अर्थात,पोलिस आयुक्त हे कठोर शिस्तीचे असले तरी मूळात खूप संवेदनशील मनाचे असल्याची चर्चा ही ऐकू आली.काही काळाने निलंबित पोलिस पुन्हा कर्तव्यावर दिसतील,अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.पोलिस विभागात आधीच कर्मचा-यांच्या पदभरतीची वाणवा आहे त्यात,आहे त्याच पोलिसांना गाणी व नाचणे यासारख्या शिस्तभंगासाठी नोकरीवरुन काढून टाकणे हे नागपूरातीलच काय तर जगातील कोणत्याही पोलिस विभागाला परवडणारे नाही,त्यामुळे निलंबित पोलिस कर्मचारी पुन्हा कर्तव्यावर दिसतील यात शंका नाही.
 स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानंतर तहसील पोलीस ठाण्याच्या आवारात ‘खईक पान बनारस वाला’ हे गीत गाणारे पोलिस कर्मचारी व त्या तालावर ठेका धरीत नाचणारे पोलिस हे पट्टीचे गायक आहेत,अशी माहिती समोर आली आहे. जे नृत्य करीत होते ते देखील उत्तम गायक असून पोलिस विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी आपली कला सादर करुन,पोलिसांची व श्रोत्यांची दाद मिळवित आले आहे,त्यामुळे ‘मौका भी है,दस्तूर भी है‘या न्यायाने त्यांच्या हातात अनायसे माईक आला व आपल्या कंठातील सुरेल स्वरांना त्यांनी वाट मोकळी करुन दिली.या गीतावर नृत्याचा ठेका धरणारे दोन पोलीस कर्मचारी आणि दोन महिला अंमलदार यांनीही उत्तम नृत्य केले,यात शंका नाही.
मात्र,एकच ‘लोचा’ झाला,ते सर्व पोलिसांच्या वर्दीवर होते आणि पोलिसांची असो किवा सैन्याची,वर्दीला संविधानातच एक उच्च कोटीची गरिमा प्राप्त आहे.वर्दीसोबत काही नैतिक मूल्ये जुळली आहेत,त्यामुळे वर्दीवर गाणे व नाचणे यांचे समर्थन करता येत नाही.सामान्य जनतेला ते न पटण्यासारखेच आहे.परिणामी,पोलिसांच्या या निखळ आनंदाचा व्हिडीयो व्हायरल होताच ‘हंगामा’बरपणे स्वाभाविक होते आणि तो बरपला. ‘वर्दी घालून कोणत्याही प्रकारची  गैरवर्तवणूक खपवून घेतल्या जाणार नाही. खाकी वर्दीची प्रतिमा मलीन होईल, असे कृत्य कुणीही करू नये अन्यथा कारवाई केल्या जाईल,असा इशारा देत,  राहुल मदने (पोलीस उपायुक्त)यांनी चारही पोलिस कर्मचा-यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटणकर, पोलीस हवालदार अब्दुल गणी, पोलीस शिपाई डॉली उर्फ भाग्यश्री गिरी आणि निर्मला गवळी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करीत देशभक्ती गीतानंतर ,मूळात कलाकार असणा-या गायक पोलिस कर्मचा-याला हातात माईक असताना,गीत सादर करण्यापासून स्वत:ला आवरता आले नाही.मोबाईलवर करोकेवर गाणे लाऊन त्यात आपल्या गळ्यातील सुरेल स्वर त्यांनी मिसळले.उत्तम गायकीसोबत उत्तम नृत्य देखील जनतेला व्हिडीयोच्या माध्यमातून बघायला मिळाले.सर्व काही उत्तम होतं मात्र,अंगावरील शासकीय वर्दी ही नजरेला बोचत राहीली.तक्रारी,निंदेचा पाऊस कोसळला,ज्याची दखल मदने यांना घ्यावीच लागली.
‘खईके पान बनासर वाला’ऐवजी ‘मै खाकी वर्दीवाला हूँ इस देश का रखवाला हूँ,चाहे ईद हो दिवाली हो,चाहे जलसा या समारोह हो,हर वक्त तुम्हारे साथ हूँ,मै देश का रखवाला हूँ,मै खाकी वर्दीवाला हूँ’असे काही माईकवर सुरात गुणगुणले असते तर त्यांचे ‘गुण’आयुक्तांच्या नजरेत वाढून निलंबना ऐवजी बढती मिळाली असती,अशी देखील मिश्‍किली वाचायला मिळते.
थोडक्यात,कोणत्याही प्रशासकीय व्यवस्थेचे यश हे शिस्तीवरच टिकून असतं मात्र,सण,उत्सव तसेच स्वातंत्र्य दिनी अहोरात्र तनावात असणा-या पोलिसांच्या नोकरीत गाणी व नृत्याचा आनंद लृटण्याची ‘सुट’मिळावी,किंवा हा आनंद  लृटत असताना अल्पकाळासाठी वर्दी बदलण्याची ‘संधी’मिळावी,अशी मागणी होणे यात काही गैर नाही.‘गीतो के रंग ना हो तो सूना है ये जीवन,सरगम के सूर ना छेडे तो,सूना मन का आंगन’या उक्तीप्रमाणे पोलिस हे देखील शेवटी ‘मन’ असणारी माणसे आहेत आणि त्या मनात भाव-भावना,कला,ईच्छा,प्रेम,उल्लहास असणे स्वाभाविक आहे.त्याच्या प्रकटीकरणावर निदान सण,उत्सव व स्वातंत्र्य दिनी,गणतंत्र दिनी बंधने अयोग्य असून,दीडशे वर्षांपूर्वीचे इंग्रजांचे कायदे आपण बदलले मग माणूस म्हणून अश्‍या उत्सवांच्या वेळी पोलिसांना आनंद घेण्याची थोडीशी सूट का मिळू नये?
…………………….
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या