फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeनागपूर मनपामुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी संलग्न करा 

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी संलग्न करा 

मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांचे आवाहन
नागपूर ता,१६:महाराष्ट्र शासनाद्वारे सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड  बँके खात्याशी संलग्न करावे असे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील एकूण २,१२,४३२ लाभार्थ्यांना सदर योजनेसाठी  पात्र करण्यात आले असून, त्यापैकी ४३,३६५ लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँक खात्या सोबत संलग्न नसल्याचे महाराष्ट्र शासनामार्फत पडताळणी केले असता निदर्शनास आले आहे.
सदर लाभार्थ्यांनी बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन आधार कार्ड बँक खात्यासोबत संलग्न करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत  लाभार्थ्यांच्या भ्रमणध्वनीवर मॅसेज आणि व्हॉईस मॅसेज करण्यात येत आहेत.तसेच सर्व बँक आणि शाखेला लाभार्थ्यांचे आधार बँक खात्यासोबत संलग्न करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
सद्यस्थितीत १५००० लाभार्थ्यांचे आधार कार्ड त्यांच्या खात्यासोबात संलग्न करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बँकेला प्रत्यक्ष भेट देऊन आधार कार्ड बँक खात्यासोबत संलग्न करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आवाहन केले आहे.
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या