फक्त..बातमीशी बांधिलकी

फक्त..बातमीशी बांधिलकी

Homeदेश-विदेशबिश्‍नोई यांची कुश्‍ती संदर्भातली सूचना ऐकली असती तर...

बिश्‍नोई यांची कुश्‍ती संदर्भातली सूचना ऐकली असती तर…

सात वर्षांपूर्वीच केला होता आग्रह:कारवाई ही भोगली
नागपूर,ता.८ ऑगस्ट २०२४: अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीगीर आणि नामवंत प्रशिक्षक कृपाशंकर बिश्‍नोई यांनी भारतीय कुस्तीगिरांना दोन दिवसांच्या लढतीसाठी तयार करण्याची सूचना केली होती.त्याकडे भारतीय कुस्ती महासंघाने दुर्लक्ष केले.आंतरराष्ट्रीय महासंघाने नियमांत केलेले बदल,भारतीय कुस्ती महासंघाने ‘अर्धवट‘ अमलात आणले.बिश्‍नाेई यांची सूचना भारतीय कुस्ती महासंघाने अमलात आणील असती,तर विनेश फोगटवर कदाचित अपात्र होेण्याची वेळ आली नसती,असे आता बोलल्या जात आहे.
बिश्‍नोई कित्येक वर्षांपासून पदकाच्या लढती स्पर्धेच्या दुस-या दिवशी घेण्याची सूचना करीत आहे.कुस्ती लोकप्रिय होण्यास या मुळे मदत होईल,असे त्यांचे मत आहे.दिग्गज कुस्ती प्रशिक्षक महावीर फोगाट यांच्या जीवनावर आधारित ‘दंगल‘चित्रपटासाठी आमीर खानला मागर्दर्शन केल्यामुळे बिश्‍नोई अधिकच प्रसिद्ध झाले,हे विशेष.
बिश्‍नोई यांच्या सूचनेची अंमलबजावणी भारतीय कुश्‍ती महासंघाने केली नाही.त्यामुळे चिडलेल्या बिश्‍नोई यांनी समाज माध्यमावरुन कुश्‍ती महासंघाला लक्ष्य केले होते.त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई देखील झाली होती.
जागतिक कुस्ती महासंघाने २०१७ मध्ये गटात बदल केले.त्यानुसार,पदक ठरवणा-या लढती दुस-या दिवशी घेण्याचे ठरविण्यात आले.या पूर्वी सर्व लढती एकाच दिवशी होत होत्या.भारतीय कुस्ती महासंघाने राष्ट्रीय स्पर्धेपासून नव्या गटात स्पर्धा घेण्याचे ठरवले,पण प्रत्येक गटातील अंतिम लढाई दुस-या दिवशी घेण्याचे टाळले!अद्याप ही राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेतील सर्व गटाच्या लढती एकाच दिवसात संपवण्यात येतात.यावर बिश्‍नोई यांनी आक्षेप घेतला होता.‘नवे वजनी गट स्वीकारलेत पण,दोन दिवसांची लढत नाकारली,हे म्हणजे घोडा आणि गाढव यांच संगम साधण्यासारखे झाले’.असे म्हणत खेचराचा फोटो समाज माध्यमांवर पोस्ट केला.महासंघाने त्यावेळी बिश्‍नोई यांच्यावर बंदी घातली होती.
कुस्तीप्रेमींना ही घटना पुन्हा एकदा विनेश फोगाट यांच्या अपात्रतेच्या कारणामुळे आठवली.विनेश या पूर्वी कोणत्याही स्पर्धेत वजन कमी करुन दोन दिवस खेळली नाही.भारतात या प्रकारची स्पर्धाच आपण कधी घेतली नाही,तिला याची सवयच आपण देशातील स्पर्धांमध्ये दिली नाही.आता तिने पहील्या दिवशी वजन कमी ठेवले,पण दुस-या दिवशीही वजन कमी ठेऊन खेळण्याची आपण तिला या पूर्वी कधी संधीच दिली नाही,तिचे शरीर यासाठी कधीही तयार होईल याकडे आपण लक्षच दिले नाही,असे कुस्ती अभ्यासकाचे मत आहे.या नव्या घडामोडीवर बिश्‍नोई यांनी अधिक बोलणे टाळले.‘इतिहास काय आहे तो आपल्याला माहितीच आहे,माझी पुन्हा बडतर्फ होण्याची ईच्छा नाही’अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महत्वाचे म्हणजे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरणसिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणाच्या घटनेविरोधात विनेश हिने देखील फार मोठा लढा आंदोलनात दिला होता.त्यामुळे यात कटकारस्थाना विषय असल्याची देखील चर्चा समाज माध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली.
………………………
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Latest बातम्या