नागपूर, दिनांक ४ ऑगस्ट २०२४: मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन, नागपूरतर्फे जेष्ठ रंगकर्मी गजानन सगदेव यांना श्रद्धांजली देऊन काल रविवार रोजी मानव कौल लिखित व कुणाल टोंगे दिग्दर्शित ‘पार्क’ नाटक संध्याकाळी ६:३०वाजता विदर्भ राष्ट्रभाषा प्रचार समिती, रामदासपेठ, नागपूर येथे सादर झाले. नाटकात दुर्गेश कुहिके, निश्चय बेलानी व सिद्धांत पटेल यांच्या प्रमुख भूमिका होत्या तर प्रकाश योजना शुभम गौतम यांची होती.
नाट्य सादरीकरणाला तरुण मंडळीने मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शविली सोबतच नाटक झाल्यानंतर सगळ्यांनी उभे राहून सहभागी कलाकारांचे उभे राहून कौतुक केले. नाट्य सादरीकरणानंतर सहभागी कलाकारांची उपस्थित प्रेक्षकांशी चर्चा झाली.
कार्यक्रमाचे आयोजन मेराकी परफॉर्मिंग आर्टस् ऑर्गनायझेशन, नागपूर यांचे होते. कार्यक्रमाला अक्षय खोब्रागडे यांचे सहकार्य लाभले.
…………………………..